पोषक आहार हा आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. सध्या सर्वसामान्य माणसे स्वत:च्या आरोग्याबाबत अधिक जागरूक झालेली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींचा ओढा सेंद्रीय पद्धतीने बनवलेल्या अन्नाकडे वळू लागला आहे. भारतीय लोकांचे जीवनमान बदलत असून नागरिकांची आरोग्यविषयक जागरूकता वाढू लागली आहे. रोजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात लोकांचं त्यांच्या तब्बेतीकडे आणि जेवणाकडे दुर्लक्ष होत आहे. बऱ्याचदा लोक भूक भागवण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी जंक फूडचा आधार घेतात.
परंतु हेच जंक फूड अनेक आजारांचं कारण बनतं. यामुळे लहान वयातच मधुमेह, ब्लड प्रेशर, कॅन्सर यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. या आजारांपासून वाचण्यासाठी अनेक जण सध्या सेंद्रिय फूडचा आधार घेताना दिसत आहेत. सेंद्रिय पदार्थांमध्ये, प्रथिने, धातू, विकरे ,कॅल्शिअम, लोह यांसारखे गुणधर्म असतात. हे सर्व गुणधर्म शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे सेंद्रिय पदार्थ खाणं शरीरासाठी फायदेशीर असतं.
सेंद्रिय फूड म्हणजे काय?
सेंद्रिय फूड तयार करण्यासाठी कोणत्याही केमिकल किंवा औषधांचा उपयोग केला जात नाही. तसेच या पदार्थांची शेती करताना कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. सेंद्रिय पदार्थ पूर्णतः नैसर्गिक पद्धतीनं उगवण्यात येतात. तरीही इतर पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ यांमध्ये फरक करणं थोडं अवघड असतं. कारण हे पदार्थ इतर पदार्थांसारखेच दिसतात. त्यांचा आकार, रंग इतर पदार्थांप्रमाणेच असतं.
सेंद्रिय पदार्थचे बोधचिन्ह असे असेल की हिरव्या वर्तुळामध्ये झाडाचे पान व त्यावर बरोबरची खुण असे या बोधचिन्ह चे स्वरूप आहे. त्यातील वर्तुळ हे जागतिक निर्मळ चांगुलपणाचे, तर झाडाचे पान हे निसर्गाचे आणि बरोबरचे चिन्ह हे संस्थेने प्रमाणित केल्याचे सुचवत आहे.
सेंद्रिय पदार्थ असे ओळखाल
सेंद्रिय पदार्थ आणि इतर पदार्थ एकसारखेच दिसतात. पण सेंद्रिय पदार्थांमध्ये सर्टिफाइड स्टिकर्स लावण्यात येत असून, त्यांची चवही इतर पदार्थांपेक्षा थोडी वेगळी असते. सेंद्रिय पदार्थांपासून तयार करण्यात आलेल्या मसाल्यांचा गंधही इतर मसाल्यांपेक्षा जास्त येतो. तसेच सेंद्रिय पद्धतीनं पिकवण्यात आलेल्या भाज्या शिजण्यासाठी जास्त वेळ घेत नाहीत, लवकर शिजतात.
सेंद्रिय पदार्थ जैवविविधता, मातीचे आरोग्य, रासायनिक मुक्त निविष्ठे इत्यादींवर केंद्रित असलेल्या समग्र कृषी पद्धतींचे उत्पादन आहेत आणि सेंद्रिय उत्पादन मानकांच्या अनुसार तयार केले जातात. सेंद्रिय खाद्यपदार्थांसाठी जैविक भारत बोधचिन्ह सेंद्रीय उत्पादनांमध्ये फरक करण्यासाठी ओळख बोधचिन्ह आहे. तळाशी असलेल्या "जैविक भारत" ठळक बोधचिन्हसह समर्थित आहे, जे भारतातील सेंद्रिय खाद्य दर्शवते. एखाद्या प्रभावी संदेशासंदर्भात संवाद साधण्यासाठी सोपा दृष्टीकोन वापरुन लोगोचा हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि हे स्पष्ट करते की हे पदार्थ रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर न करता पर्यावरणास अनुकूल पद्धतीने तयार केले जातात.
हे "जैविक खाद्य " या शब्दामध्ये वापरल्या जाणार्या "ओ" अक्षराला ठळकपणे दर्शविते तसेच जागतिक व्यासपीठावर संपूर्ण आरोग्याचा दृष्टीकोन दर्शविते. त्याच्याशी भक्कम नातेसंबंध दर्शविण्यासाठी, पाने मध्ये “ओ” अक्षराद्वारे दर्शविलेल्या वर्तुळाच्या आत चिन्हांकित स्वरूपात लोगो देखील वापरले गेले आहेत. लोगो असे दर्शवितो की त्याचे उत्पादन असलेले उत्पादन वापराच्या निवडीसाठी सेंद्रिय म्हणून प्रमाणित केले गेले आहे. पर्यावरणाचे सर्व घटक प्रभावीपणे मिसळत, लोगो राष्ट्रीय सेंद्रिय मानकांचे पालन करते. प्रत्येक प्रमाणित सेंद्रिय खाद्य वस्तू वर ‘जैविक भारत’ बोधचिन्ह असावा.
आजारांपासून बचाव करण्यासाठी सेंद्रिय पदार्थ फायदेशीर
- सेंद्रिय पदार्थांचे उत्पादन घेताना कोणत्याही केमिकल्सचा वापर करण्यात येत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये पोषक तत्वं ही इतर पदार्थांच्या तुलनेनं अधिक असतात. त्यामुळे त्यांच्या सेवनानं रक्तदाबशी निगडीत समस्या, मायग्रेन, मधुमेह आणि कॅन्सर यांसारख्या आजारांपासून बचाव होतो. तसेच यांचे सेवन केल्यानं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या पदार्थांमध्ये चरबीचे प्रमाणही फार कमी असतं. याव्यतिरीक्त दररोज सेंद्रिय पदार्थांचं सेवन केल्यानं त्वचेच्या समस्या दूर होतात आणि त्वचा तजेलदार होते.
- आजकाल लोकांमध्ये प्रतिजैविक प्रतिकार वाढत आहे. यासाठी आवश्यक नसतानाही प्रतिजैविक घेण्याव्यतिरिक्तचे कारण म्हणजे आपण खाल्लेल्या गोष्टींचा वापर बिघडण्यापासून वाचवण्यासाठी त्यांना प्रतिजैविक दिला जातो. जेव्हा आपण अशा गोष्टी खातो तेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. सेंद्रिय पदार्थांमुळे आपण हा तोटा टाळतो.
- सेंद्रीय पदार्थातून 40 टक्के जास्त ‘‘अॅन्टीऑक्सिडन्टस्’’ मिळतात. त्यामुळे ह्रदयविकार किंवा कर्करोग आदी रोगांपासून बचाव होऊ शकतो.
- सेंद्रीयपदार्थाच्या सेवनामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होवू शकते.
- सेंद्रीयशेतीमुळे पर्यावरणाचे रक्षण होते तसेच प्रदूषणालाही आळा बसतो. मातीचे संरक्षण होऊन पाणी मुरण्याची क्षमता वाढते.
- नसर्गिक खतांच्या वापरामुळे पदार्थाची मूळ चव, रंग, स्वाद टिकून राहतात.
- सेंद्रीय उत्पादने वाढवल्याने व्यापारार्थ वाढविण्यात येणाऱ्या प्राण्यांची प्रजोत्पादन क्षमता वाढते.
- सेंद्रिय पदार्थ घेताना त्या वर अन्न सुरक्षा आणि भारताचे मानके प्राधिकरण नुसार जैविक भारत चे चिन्ह ग्राहकांनी बघून घ्यावे.
- सेंद्रिय पदार्थ खरेदी करताना ते सर्टिफाइड असतील याची काळजी घ्या. सेंद्रिय पदार्थांचा वापर करताना पॅकेटवर देण्यात आलेली माहिती वाचून घ्या.
लेखक:
डॉ. अरविंद सावते
सुग्रीव शिंदे
(पीएचडी स्कॉलर, अन्न तंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Share your comments