मित्रांनो आपल्या देशात कांद्याचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. काही लोक भाज्यांची चव वाढवण्यासाठी करीमध्ये वापरतात, तर काहींना कच्च्या सॅलडमध्ये कांदा खायला आवडतो. आपल्याकडे तर नॉनव्हेज असलं म्हणजे कांदा लागतोच त्याशिवाय जेवणाला चव तरी कशी येणार बरं.
कांद्याचा वापर बहुतेक घरांमध्ये केला जात असला तरी काही लोक कांद्याच्या तामसिक गुणधर्मामुळे ते सेवन करत नाहीत. कांदा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते मात्र फायद्यांसोबतच याचे जास्त प्रमाणात सेवन आरोग्याला हानी देखील पोहचवू शकते.
महत्वाच्या बातम्या:
Health News : रात्री हे पदार्थ चुकूनही खाऊ नका; नाहीतर आरोग्य येणार धोक्यात
Health: नेहमी वाढतो का ब्लड प्रेशर? मग करा हे योग आणि मिळवा कायमचा आराम
चला तर मग मित्रांनो जास्त कांदा खाल्ल्यास काय होतात आपल्या आरोग्यावर परिणाम?
ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो
मित्रांनो आहार तज्ञांच्या मते, कांद्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोजचे प्रमाण जास्त असते. यासोबतच यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, यामुळे याचे पचन व्यवस्थित होतं नाही. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो असा तज्ज्ञांचा दावा आहे.
रक्तातील साखर असंतुलित होऊ शकते
याशिवाय आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कांद्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोजचे प्रमाण जास्त असल्याने ते मधुमेहाच्या रुग्णांना हानी पोहोचवू शकते. त्यामुळे साखरेच्या रुग्णांनी कांद्याचे सेवन संतुलित प्रमाणात करावे असा सल्ला आहार तज्ञ नेहमीच देत असतात. निश्चितच कांद्याचे संतुलित सेवन करणे अनिवार्य आहे.
छातीत जळजळ होऊ शकते
आहार तज्ञांच्या मते, कांद्यामध्ये आढळणारे पोटॅशियम हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीसाठी समस्या बनू शकते. त्यामुळे कांद्याचे सेवन केल्याने छातीत जळजळ देखील होऊ शकते.
श्वासाची दुर्गंधी त्रास देऊ शकते
साधारणतः कच्चा कांदा सॅलडमध्ये वापरला जातो. जर तुम्ही त्याचे जास्त सेवन केले असेल तर समोरच्या व्यक्तीला बोलताना खूप त्रास होतो. कांद्याच्या अतिसेवनामुळे माणसाला तोंडाची दुर्गंधी यांमुळे लाजीरवाणे वाटू शकते.
Disclaimer: ही माहिती आयुर्वेदिक माहितीच्या आधारे लिहिली गेली आहे. Krishi Jagran Maharashtra या दाव्यांची किंवा त्याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. या सल्ल्यावर अंमल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला निश्चित घ्या.
Share your comments