सध्या वातावरणामध्ये प्रचंड प्रमाणात असह्य असा उकाडा जाणवत आहे. त्यामुळे साहजिकच आपली पावले रसवंती गृह, थंडपेये स्टॉल कडे वळतात.
दुसरे म्हणजे या दिवसांमध्ये लालेलाल असे कलिंगड बाजारातून आणून मस्तपैकी रेफ्रिजरेटर मध्ये ठेवून भर दुपारच्या वेळी सगळे मिळून खायला सगळ्यांनाच आवडते. तसं कलिंगड हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. परंतु आपल्याकडे एक म्हण आहे ती म्हणजे 'अति तेथे माती' ही होय. या उक्तीप्रमाणे कलिंगड देखील जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीराला फायदा तर सोडाच परंतु त्रास होण्याची शक्यता जास्त असते. कलिंगड मध्ये पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियम, कॉपर तसेच मॅग्नेशियम, विटामिन ए, विटामिन बी वन,बी 6 असे अनेक प्रकारचे पोषकतत्वे असतात. या लेखामध्ये आपण कलिंगड खाण्याचे फायदे आणि नुकसान दोघी समजून घेणार आहोत.
कलिंगड खाण्याचे फायदे
1- कलिंगडमध्ये कॅलरीज आणि फॅट्स नसतात. परंतु पाणी 92% असते. ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांनी कलिंगड खाणे हे उत्तम आहे.
2- कलिंगड मध्ये जीवनसत्व ए आणि सी दोघे असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे कामी मदत होते तर विटामिन बी 6 आणि आयर्न पोषकतत्वे रक्तातील लाल पेशी वाढवण्याचे काम करते तसेच अँटीबॉडीज देखील बनवण्यासाठी मदत होते.
3- शरीराची पचनशक्ती देखील सुधारते. बऱ्याच जणांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो तो देखील दूर करण्यासाठी कलिंगडची मदत होते.
4- कलिंगडा मुळे खराब कोलेस्ट्रॉल ( एल डी एल ) कमी करते तसेच रक्त पेशींमध्ये फॅट्स जमा होणे थांबते. त्यामुळे हृदयाचे विकार होण्याचा धोका घटतो.
कलिंगड खाण्याचे नुकसान
1- एका दिवसांमध्ये 400 ते 500 ग्रॅम कलिंगड खाणे आरोग्यासाठी पुरेसे आहे. परंतु जर एका दिवसात यापेक्षा जास्त खाल्ले तर ओव्हर हायड्रेशन चा त्रास होऊ शकतो.तसेच जुलाब, गॅस, पोट फुगणे सारख्या समस्या होऊ शकतात.
2- जर कलिंगड खाल्ले तर त्यानंतर पाणी पिणे टाळावे. कारण या फळांमध्ये जास्त पाण्याचे प्रमाण असल्यामुळे कलिंगड खाल्ल्यावर परत पाणी प्यायला तर पचन संबंधित त्रास होऊ शकतो.
3- रात्रीच्यावेळी कलिंगड खाल्ले तर वजन वाढते. त्यामुळे रात्रीच्या वेळी कलिंगड खाणे वर्ज्य करावे.
4- ज्यांना ड्रिंक करायची सवय आहे म्हणजे दररोज ड्रिंक करतात अशा व्यक्तींनी कलिंगड खाऊ नये.
5- डायबिटीज असलेल्या लोकांनी कलिंगडाचे सेवन कमी प्रमाणात करावे नाहीतर शरीरात ग्लुकोजची पातळी वाढू शकते.
( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांना माहिती स्वरूपात देण्यात आली आहे. या माहितीशी व्यक्तिगत आणि कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही.)
Share your comments