गव्हाला शास्त्रीय भाषेत Triticum aestivum असेही म्हटले जाते. गहू गवतला दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी मध्ये wheat grass (गव्हाचे गवत) असेही संबोधले जाते. गहू गवत हे पावडर व रस या दोन रूपात मिळते आपण या लेखामध्ये गहू गवताचा रस कसा बनवला जातो आणि त्याचे आपल्या आरोग्यावर कसे परिणाम होतात याविषयाची माहिती देणार आहोत.
गहू गवताची लागवड कशी करतात?
- गव्हाची लागवड घरात कुंडी मध्ये करावी.
- स्वच्छ किडमूक्त्त आणि भरलेल्या गव्हाच्या बियांची निवड करावी.
- त्या नंतर या निवडलेल्या बियांना पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवावे.
- दुसर्या दिवशी जास्त असलेले पाणी काढून टाकावे.
- त्या उरलेल्या बियांची पेरणी करावी.
- बियांची 8-14 दिवस व्यवस्थित मशागत करावी.
- गवताची उंची 7 इंच झाल्यानंतर पहाटे 3-4 च्या वेळेतच त्याची कापणी करावी.
टीप: गहू गवतामध्ये अँटीऑक्सिडंट (Antioxidants) असतात आणि ते सूर्यप्रकाशाला सवेदनशील असतात त्यामुळे त्याची कापणी पहाटे केली जाते.
गहू गवतचा रस बनवण्याची पद्धत:
- 7 इंच वाढलेल्या गवताची कापणी करून त्याला बारीक तुकड्यामध्ये कापावे आणि गरजेनुसार पाणी टाकून ग्राइंडर मिक्सर मधून काढून मऊ आणि बारीक पेस्ट करावी.
- त्या मिश्रणाला एक-दोन वेळेस गाळणीने गाळून रस बाजूला काढून घ्यावा.
- या बनविलेल्या रसाचे पुरेपूर फायदे घेण्यासाठी त्वरित काहीही न खाता पहाटेच सेवन करावे.
- या बनविलेल्या रसाची चव वाढवण्यासाठी चवीनुसार साखर आणि लिंबाचा रस मिश्रित करून सेवन करावे.
(डायबेटिस मेलीटीसने ग्रस्त असलेल्या रोग्यांनी साखर न वापरता फक्त लिंबाचा रस वापरावा)
पौष्टिक घटक:
- प्रथिने- 860 मिग्रॅ
- B- कॅरोटीन- 920 IU
- विटामीन E- 880 MCG
- विटामीन C- 9 मिग्रॅ
- विटामीन B 12- 0.30 MCG
- फॉस्फरस- 29 मिग्रॅ
- मॅग्नेशिअम- 8 मिग्रॅ
- कॅल्शियम- 7.2 मिग्रॅ
- लोह- 0.66 मिग्रॅ
- पोटॅशियम- 42 मिग्रॅ
(हे घटक इनडोअर पेरणी केलेल्या गव्हाचे आहेत)
आरोग्यदायी फायदे:
- हा रस डायबेटीस, मेलीटीस असलेल्या रुग्णासाठी खुप फायदेशीर आहे.
- रसाच्या सेवनामुळे कर्करोग ग्रस्त असलेल्या व्यक्तिमध्ये केमोथेरेमुळे झालेले वाईट परिणाम कमी होण्यास मदत होते कारण या रसामध्ये B-carotene अधिक प्रमाणात आहे.
- या रसाचा उपयोग लाल पेशीचे विघटन रोकण्यासाठी होतो.
- त्यामुळे रक्ताचे आजार उद्भभवत नाहीत.
दुष्पपरिणाम:
- या रसाचे सेवन दुसर्या अन्नासोबत केल्यास मळमळ होण्याची शक्यता आहे.
- या रसाचे त्वरित सेवन न केल्यावर (खुप वेळ ठेवून सेवन केल्यावर) टॉक्झिन्स निर्माण होऊन डोकेदुखी व मळमळ होऊन चक्कर येण्याची शक्यता आहे.
लेखक:
प्रा. देशमुख एस. एच.
सहाय्यक प्राध्यापिका
क्वीन्स कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी अँड रिसर्च फाऊंडेशन, औरंगाबाद
9763333574
Share your comments