1. आरोग्य सल्ला

त्वचा विकारापासून दूर ठेवणारा आरोग्यदायी राजगिरा

राजगिर्‍यामध्ये कॅलरिज, कार्बोदके, प्रोटिन,आयरन,फॅट,फायबर, कॅल्शिअम स्टार्च ही पोषणमूल्ये आहेत,

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
आरोग्यदायी राजगिरा

आरोग्यदायी राजगिरा

‘राजगिरा’ हा खास करुन आपल्याला नवरात्री, एकादशी अशा उपवासांना आठवतो. या अगदी छोट्याशा दिसणार्‍या राजगिर्‍याचे आरोग्यदायी फायदे जर तुम्हाला माहीत झाले तर तुम्ही उपवासा व्यतिरिक्तसुद्धा हमखास याचा आहारात समावेश कराल. राजगिरा ही अत्यंत गुणकारी वनस्पती असून जागतिक दर्जावर सुपरफूड म्हणून घोषित झाला आहे. राजगीर्‍यास रामदाना,अमरनाथ म्हणूनही ओळखले जाते.

राजगिर्‍यातील पोषणमूल्ये

राजगिर्‍यामध्ये कॅलरिज, कार्बोदके, प्रोटिन,आयरन,फॅट,फायबर, कॅल्शिअम स्टार्च ही पोषणमूल्ये आहेत, तसेच बी१,बी५, व्हिटामिन सी, बी२, बी६, व्हिटामीन ई, बी३, बी ९ ही जीवनसत्वे आहेत. आता आपल्या लक्षात आले असेलच की राजगिरा ऊपवासाला का खातात? राजगिरा खाल्यास आपल्या शरिराला जवळपास सर्व आहारसत्वे मिळतात.

  • राजगिर्‍यायत कॅल्शिअम भरपूर असल्याने हाडे मजबूत होतात.

  • व्हिटामिन सी भरपूर मात्रेत असल्याने त्वचा, केस यासाठी ऊपयुक्त आहे. हिरड्याच्या विकारात ऊपयुक्त ठरते.

  • राजगिर्‍यातील प्रोटिनमध्ये इन्सुलिनवर नियंत्रण राखण्याचा विशेष गुणधर्म आढळतो. त्यामुळे डायबेटिकच्या रुग्णांमध्ये ऊपयुक्त ठरते.

  • राजगिरा ग्लुटेन फ्रि आणि फायबरने युक्त आहे. त्यामुळे वजन कमी करताना उपयुक्त ठरतो.

  • मॅग्नेशिअम अधिक असल्याने मायग्रेनमध्येही ऊपयुक्त ठरते.

  • यातील बायोअ‍ॅक्टीव्ह कंपाऊंड्स हे अँटिअ‍ॅलर्जीक असतात.

  • फायबर्स आणि अन सॅच्युरेटेड फॅट्स असल्यामुळे रक्तवाहिन्यातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. हृदयाचे स्वास्थ्य राखते.

राजगिर्‍याचे गुणधर्म-

आयुर्वेदामध्ये राजगिर्‍याला रूचीवर्धक,रक्तशोधक, स्तन्यवर्धक, मल:सारक म्हटले आहे.

  • रूचीवर्धकत्यामुळे पचनव्याधीनंतर येणारा nausea कमी करण्यास मदत होते.

  • रक्तशोधक त्यामुळे रक्तपित्त, त्वचा विकार, यात ऊपयुक्त ठरतो.

  • स्तन्यवर्धक-हा राजगिर्‍याचा गुणधर्म सांगितला आहे. म्हणजेच मातृत्वामध्ये स्तनदुग्धाची वृद्धी याच्या नियमित सेवनाने होते.

  • मल:सारक हा राजगीर्‍याचा गुण बद्धकोष्ठ, संग्रहणी या व्याधीत उपयुक्त ठरतो.

  • तसेच स्थौल्य कमी करण्यासाठी आयुर्वेदात रोज राजगिर्‍याचे सेवन सांगितले आहे. केस गळणे, केस पांढरे होणे हे विकार राजगिरा सेवनाने टळतात.

  • हे सर्व गुणधर्म राजगिर्‍याची पाने व बियांमध्ये असतात.त्यामुळे राजगिर्‍याच्या पानांची भाजी,रस आहारात समाविष्ट करावा. तसेच राजगिरा हा लाडू,पराठे,थालिपीठ, शिरा, खीर अशा अनेक स्वरूपात बनवता येतो. आठवड्यातून एकतरी नाष्ता राजगिर्‍याचा खावा. चॉकलेट्सची जागा राजगिर्‍याच्या लाडवांनी किंवा चिक्कीने घेतली तर ऊत्तमच!

  • राजगिऱ्याचे गुळातले लाडू तर शक्तिवर्धक, रक्तवर्धक आणि थंडीच्या दिवसांत तर खास करून बनवून खावेत. हे बनवायला अतिशय सोपे आहेत.

 

राजगिरा लाडू
 

साहित्य:

1 कप= २०० ग्रॅम्स राजगिरा

१/४ कप= ५० ग्रॅम्स शेंगदाणे

2-3 टेबलस्पून तूप

1 कप= २०० ग्रॅम्स चिक्कीचा गूळ

हेही वाचा : Health Tips: केळीसोबत चुकूनही पपई खाऊ नका नाहीतर…..!

कृती :

राजगिऱ्याच्या लाडवांसाठी आपण सारे साहित्य एकेक करून भाजून घेऊ. एका खोल बुडाच्या कढईला गरम करून मध्यम ते मोठ्या आचेवर शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यावेत नाहीतर लाडवांमध्ये त्यांचा कच्चेपणा जाणवतो!
३-४ मिनिटे शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर ते एका ताटलीत काढून घ्यावेत. थंड झाल्यावर त्यांच्या साली काढून फक्त दाण्याचे २ भाग होईपर्यंत कुटून घ्यावेत. फार बारीक कूट करू नये.

  • आता आपण राजगिरा फुलवून घेऊ. राजगिऱ्याचे दाणे कढईत घालण्यापूर्वी कढई चांगली तापवून घ्यावी. जर थंड कढईत दाणे घातले तर ते फुलत नाहीत. २-३ चमचे राजगिरा घालून ते फुलवून घ्यावेत. सगळे दाणे एकदम घालू नयेत.

  • गरम कढईत सतत हलवत राहत राजगिरा फुलवून घेऊ, गॅस कमी जास्त करून उष्णता नियंत्रित करत दाणे अजिबात करपू देऊ नयेत. अशाच प्रकारे राजगिरा फुलवून घ्यायचा आहे.

  • राजगिरा पूर्णपणे थंड झाल्यावर , जे दाणे फुलत नाहीत ते आपण चाळणीने चाळून वेगळे करू. न फुललेल्या दाण्यांचे मिक्सरमधून फिरवून पीठ करून घ्यावे . हे पीठ कणकेत मिसळून पोळ्या करता येतात किंवा थालीपीठासाठीही वापरता येते.

  • आता आपण गुळाचा पाक करून घेऊ. जितका बारीक गूळ चिरलेला असेल तितक्या लवकर तो वितळला जाईल.

  • मंद ते मध्यम आच ठेवून जवळजवळ ३ मिनिटांत आपण गुळाचा पाक शिजवून घेऊ. आपल्याला हे लाडू जास्त कडक न करता कुरकुरीत करावयाचे आहेत. जितका जास्त वेळ गूळ शिजला जातो तितका त्याचा पक्का पाक बनून लाडू कडक होऊ शकतात. म्हणून गुळाचा पाक शिजवताना वेळेकडे काटेकोर लक्ष असू द्यावे.

  • आता शेंगदाण्याचा जाडसर कूट आणि राजगिरा घालून मिश्रण एकसारखे करून घ्यावे. गॅस बंद करून कढई खाली उतरवावी.

  • हाताच्या तळव्यांना तूप चांगले चोपडून लाडवांचे मिश्रण गरम असतानाच लाडू वळायला सुरुवात करावी. थोडे हाताला चटके बसतात परंतु तूप हाताला लावले तर थोडे कमी जाणवतात .

  • आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू बांधून घ्यावेत. लाडू वळता वळता जर मिश्रण थंड होऊन कोरडे पडले तर परत मंद आचेवर फक्त ३० सेकंड गरम करून परत लाडू वळावेत. लाडू वळून झाले कि एका घट्ट हवाबंद झाकणाच्या डब्यात भरून ठेवावेत. एवढ्या साहित्यात १८ ते २० लाडू बनतात.


राजगिरा शिरा

 

साहित्य:
१) १ वाटी राजगिरा पीठ
२) २ वाटी साईसकट दूध
३) पाऊण वाटी साखर
४) पाऊण वाटी साजूक तूप
५) सुखा मेवा आवडीनुसार (बदाम, काजू, मनुका)
६) वेलची पूड

कृती:

  • एका जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करावे त्यात बदाम व काजू तळुन घ्यावे.

  • त्याच भांडयात  राजगिरा पीठ खमंग भाजून घ्याव.

  • दूध गरम करून  एक  उकळी काढून घ्यावी.

  • पीठ थोडेसे लालसर झाले की लगेचच त्यावर गरम दूध घालावे.

  • दूध घालताना हळुहळू घालावे म्हणजे हाथावर वाफ येणार नाही व सतत ढवळत रहावे.

  • ढवळत असताना पीठाचे गोळे होणार नाही याची काळजी घ्यावी.

  • झाकण ठेवून ५ मिनिटेवाफ आणावी.

  • साखर घालून शिरा होवू दयावा.

  • साखर मुरली की त्यात वेलची पूड व सुखा मेवा घालावा.

    गरमा गरम खावयास दया

लेखक - 

स्नेहल मुंढे, प्रा. दिलीप मोरे व शुभम पवार

अन्न व्यापार व्यवस्थापन विभाग, अन्नतंत्र महाविद्यालय, व.ना.म.कृ.वि. परभणी.

English Summary: Healthy amaranth to ward off skin disorders Published on: 18 March 2022, 09:47 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters