Health

सध्या हृदयविकाराच्या झटक्याच्या प्रमाणात वाढ होत असताना दिसून येत आहे. हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

Updated on 07 September, 2022 11:13 AM IST

सध्या हृदयविकाराच्या झटक्याच्या प्रमाणात वाढ होत असताना दिसून येत आहे. हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या (Heart disease) झटक्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

जेव्हा जेव्हा आपल्या हृदयात कोणतीही समस्या सुरू होते तेव्हा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी,अचानक कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढणे यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात. कालांतराने हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

मात्र हृदयविकाराचा झटका किती वेळा येऊ शकतो? याची माहिती अनेकांना माहिती नसते. याविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

शेतकरी मित्रांनो 'या' फुलाची लागवड करून ३० वर्षांपर्यंत घ्या कमाई; मिळेल चांगला नफा

हृदयविकाराचा झटका या कारणाने येतो

जेव्हा हृदयातील रक्तप्रवाह कमी होतो किंवा त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होतो. तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. रक्तवाहिन्यांमधील चरबी किंवा कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो.

हृदयविकाराची लक्षणे कोणती?

डॉक्टरांच्या मते, हृदयविकाराचा (heart) झटका येण्यापूर्वी आपले शरीर अनेक संकेत देते. ज्यामध्ये सर्वात मोठे लक्षण म्हणजे छातीत दुखणे. दात किंवा जबडा दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, जोरदार घाम येणे, गॅस निर्मिती, गरगरल्यासारखे वाटणे, अस्वस्थ वाटणे, मळमळ आणि मळमळ वाटणे इ.

आनंदाची बातमी: शेतकऱ्यांना शेळीपालनासाठी सरकार देतंय 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान

हृदयविकाराचा झटका किती वेळा येऊ शकतो?

एखाद्या व्यक्तीला तीनपेक्षा जास्त वेळा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराचा झटका कोणत्याही वयोगटातील लोकांना येऊ शकतो. मात्र, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना आणि 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.

हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी उपाय

1. वजन नियंत्रणात ठेवा.
2. धुम्रपान, दारू इ.चे सेवन करू नका.
3. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी, साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहा.
4. फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.
5. रोज व्यायाम आणि योगासने करा.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोयाबीन दरात होणार 1 हजार रुपयांनी वाढ
एलआयसीने लॉन्‍च केली नवीन पॉलिसी योजना; आयुष्यभर पेन्शनचा मिळणार 'इतका' लाभ
24 सप्टेंबरपर्यंत 'या' लोकांच्या धनात होणार प्रचंड वाढ; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

English Summary: Health Tips heart attack occur average
Published on: 07 September 2022, 11:00 IST