आजकाल सेंद्रिय गुळाचे महत्व अनेकांना पटल्यामुळे सेंद्रिय गुळ खरेदी करण्याकडे लोकांचा कल अधिक आहे. पण गूळ खरेदी करताना तो सेंद्रिय आहे की सामान्य आहे हे कसे ओळखावे याविषयी अनेकांना माहिती नसते. यासाठी या ठिकाणी सेंद्रिय गुळ कसा ओळखायचा. याविषयी माहिती येथे दिली आहे.
- सेंद्रिय गुळ म्हणजे काय?
सेंद्रिय गुळाची निर्मिती करताना त्यात कोणतेही रसायने किंवा केमिकल्स वापरले जात नाही. सेंद्रिय गूळ हा रसायने असलेल्या सामान्य गुळापेक्षाआरोग्यासाठी अधिक चांगला असतो. तसेच अधिक गुणवत्तापूर्ण सेंद्रिय गुळ बनवण्यासाठी सेंद्रिय शेतीतील उसाचा वापर केला जातो ,
- सामान्य गुळात कोणत्या केमिकल्स घालतात…?
सामान्य गूळ हा आरोग्यासाठी फारसा चांगला नसतो. कारण सामान्य गूळ तयार करताना त्यात विविध केमिकल्स वापरले जातात, यामध्ये गंधक (सल्फर) सोडियम हायड्रोफॉस्फेट,कॅल्शियम ऑक्साईड,सोडियम कार्बोनेट,सोडियम बायकार्बोनेट या रसायनांचा वापर केला जातो.
- सामान्य गुळात केमिकल्स का वापरली जातात?
केमिकल्सचा वापर प्रामुख्याने गुळाची चव, रंग आणि गुळ अधिक काळ टिकावा यासाठी केला जातो. गुळाला अधिक पिवळा रंग येण्यासाठी गंधक पावडर (सल्फर ची पावडर)मिसळली जाते यामुळे गुळाच्या पिवळ्या रंगावर न भाळता थोडा काळसर असलेला सेंद्रिय गुळचखाण्यासाठी वापरला पाहिजे.
- सेंद्रिय गुळ कसा ओळखावा?
- सेंद्रिय गुळ चवीस अधिक गोड व स्पर्शास मऊ असतो.
- सेंद्रिय गुळाचा रंग तांबूस, काळसर किंवा तपकिरी असतो.
- केमिकल असणाऱ्या गुळाचा रंग पिवळा असतो.
- गुळाच्या पॅकिंगवरही उत्पादकाने गुळ केमिकलयुक्त आहे. की किंवा केमिकल फ्री आहे ते दिलेलेअसते.
- सेंद्रिय गुळ हा सामान्यगुळापेक्षा
थोडा महाग असतो.
- सेंद्रिय गूळ खाण्यामुळे होणारे फायदे:
अनेक पोषक तत्वे असतात.
सेंद्रिय गुळामध्ये आवश्यक असणारे अनेक पोषक घटक असतात.सेंद्रिय गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम,मॅगनीज, विटामिन बी, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखे अनेक महत्त्वाचे पोषक तत्वे असतात.
1) हिमोग्लोबिन वाढवते..
सेंद्रिय गुळातलोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढण्यास मदत होते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ॲनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी एनिमिया दूर करण्यासाठी सेंद्रिय गुळ खाणे फायदेशीर असते.
2)रक्तदाब नियंत्रित ठेवतो :-
सेंद्रिय गुळ खाण्यामुळे ब्लड प्रेशर योग्य ठेवण्यास मदत होते. कारण गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
3) मास पेशी बळकट बनवतो :-
सेंद्रिय गुळामध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियमचे प्रमाण असते. यामुळे मास पेशी बळकट होण्यासाठी मदत होते.
4) पचनशक्ती सुधारते :-
सेंद्रिय गुळ खाणे यामुळे पचन क्रिया सुधारण्यास मदत होते.तसेच नियमित पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
- लिव्हर डिटॉक्सीफिकेशन करते :-
सेंद्रिय गुळ खाण्यामुळे आपल्याला यकृताच्या यकृतातील अपायकारक विषारी घटक दूर होण्यास ( लिव्हर डीटॉक्सीफिकेशन होण्यास) मदत होते.
केमिकल्सचे अनेक वाईट दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. सेंद्रिय गूळ तयार करताना कोणतेही केमिकल्स वापरले जात नाही. त्यामुळे अशा केमिकल फ्री असणाऱ्या सेंद्रिय गुळाचे आरोग्यदायी महत्त्व पटल्यामुळे आज सेंद्रिय गुळाला प्रचंड मागणी आहे. सेंद्रिय गुळाबरोबरच आज त्याची पावडरही बाजारात आहे ती सुद्धा अशीच उपयुक्त असते.(source-healthmarathi.com)
Share your comments