आपण बघतो की आपल्याकडे मद्यपान करणारांची संख्या जास्त आहे. यामधून आपल्या राज्याला मिळणाऱ्या करावरून ते आपल्या लक्षात येईल. मद्यपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे माहित असूनही लोकं मद्यपानापासून लांब होत नाहीत. तसेच दारू प्यायल्यानंतर लोकांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होते. यावेळी ते काहीही करतात आणि काहीही बडबडत असतात. यामुळे अनेकदा ते त्यांच्या अंगलट देखील येते.
मद्यपान केल्यानंतर काय योग्य आणि अयोग्य हेही त्यांच्या लक्षात येत नाही. यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे मद्यपानानंतर मद्यपींचे इंग्रजी संभाषण वाढते. अनेकांना वास्तवात इंग्रजीचा काहीच पत्ता नसतो, मात्र पिल्यानंतर मात्र ते इंग्रजी बोलतात. काही जणांना तर दारू प्यायल्यानंतर इंग्रजी बोलण्याची सवय असते. आता याचे खरे कारण समोर आले आहे. हे ऐकून तुम्हालाही नवल वाटेल.
जर्नल ऑफ सायकोफार्माकोलॉजी' या सायन्स मॅगझिनमध्ये याचे कारण सांगल्यात आले आहे. संशोधकांनी याचा अभ्यास केला आहे. एखाद्या व्यक्तिचे दारू पिण्याचे प्रमाण कमी असते, मात्र दारू प्यायल्यामुळे येणारी नशा अशा व्यक्तिला दुसरी भाषा बोलण्यास उद्युक्त करते. म्हणजे, जर एखादी व्यक्ती हिंदी भाषेत बोलत असेल तर ती दारू प्यायल्यानंतर दुसऱ्या भाषेत म्हणजे इंग्रजीत बोलते.
भोपळ्याचा रस ठरला वरदान! अनेक रुग्णांना झाला फायदा, वाचा आश्चर्यजनक फायदे
कारण अशावेळी त्या व्यक्तीचा स्वत:वरील ताबा आणि आतून होणारा संकोच संपतो. यामुळे तो कोणतेही काम बिनदिक्कतपणे, न घाबरता करू लागतो. त्याला इंग्रजीमध्ये संवाद साधण्याची लाज वाटत नाही. त्यामुळे अशी व्यक्ती दारूच्या नशेत इंग्रजी बोलू लागते तसेच दारू प्यायल्यानंतर माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. तो त्याच्या स्मरणशक्तीपासून आणि ध्येयापासून भरकटतो. यामुळे आपोआप या सगळ्या गोष्टी घडत जातात.
ऊस शिल्लक असताना साखर आयुक्तांनी कारखाने बंदची परवानगी दिलीच कशी? राजू शेट्टींनी घेतला मोठा निर्णय
एखादी व्यक्ती मातृभाषा बोलताना ती अगदी सहजरीत्या आणि आरामात बोलते. त्या व्यक्तिला दुसरी एखादी भाषा येत असली तरी ती बोलायला तो मागेपुढे पाहत नाही. दारूचे व्यसन माणसाच्या मनातला संकोच दूर करते. यामुळे व्यक्तिला येणारी दुसरी भाषा तो स्वैरपणे बोलू लागतो. फक्त इंग्रजीच नाही, तर त्या व्यक्तीला ज्या भाषा मोडखळत जमतात, त्या भाषा पण तो दारू पिल्यावर न संकोच बोलू लागतो, यामुळे अनेकांना नवल वाटते.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो थांबा!! राज्यात केवळ एक टक्केच पेरणी, पावसाअभावी पेरण्या थांबल्या...
किसानपुत्रांनी पाळला काळा दिवस, घरावर काळे झेंडे लावून केला सरकारचा निषेध
लसणाची एक पाकळी झोपताना उशीखाली नक्की ठेवा, आयुष्यात होतील मोठे बदल..
Published on: 19 June 2022, 12:04 IST