1. आरोग्य सल्ला

औषधी गुणांमुळे शेवगा झाला महत्वाचा ; जाणून घ्या! काय आहेत फायदे

शेवगाविषयी आपण जाणून असला. आपल्या औषधी गुणांमुळे शेवगा जगविख्यात झाला आहे. शेवग्याला इंग्रजीत ड्रमस्टिक म्हणतात, आज आपण शेवग्याचे औषधे गुण काय आहेत याची माहिती घेणार आहोत. मध्य भारतात शेवग्याला मुनगा या नावाने ओळखले जाते. शेवग्याचे विविध अंग हे औषधी गुणांनी परिपुर्ण आहेत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


शेवगाविषयी आपण जाणून असला. आपल्या औषधी गुणांमुळे शेवगा जगविख्यात झाला आहे. शेवग्याला इंग्रजीत ड्रमस्टिक म्हणतात, आज आपण शेवग्याचे औषधे गुण काय आहेत याची माहिती घेणार आहोत. मध्य भारतात शेवग्याला मुनगा या नावाने ओळखले जाते.  शेवग्याचे विविध अंग हे औषधी गुणांनी परिपुर्ण आहेत.  शेवग्याच्या बियांपासून खाद्यतेलम मिळते, त्याला बेनऑईल म्हटलं जातं. या तेलात भरपूर एंटीऑक्सिडेंट आढळून येतात. पण इतर तेलांच्या तुलनेत हे तेल अधिक काळ टिकून राहते. 

पालकच्या भाजीत लोहाचे प्रमाण अधिक असते मानले जाते, परंतु पालकच्या तुलनेत शेवग्याच्या पानांमध्ये ३ टक्के जास्त लोह असते. शेवग्याच्या पानांची चाय घेतली तर आपल्याला दिवसभर ताजेपणा वाटू लागतो. शेवग्यात गाजराच्या तुलनेत ४ पट जास्त व्हिटॉमिन - ए मिळते.  यामुळे डोळ्यांसाठीही शेवग्या चांगले आहे.  जर आपण मल्टी व्हिटॉमिन कॅप्सूल घेत असाल तर आपण शेवग्याची पाने, खोडाची साल, बिया यांना वाळवून घ्या. त्यानंतर एकत्र करून त्याचं मिश्रण तयार करा. दररोज सकाळ - सायंकाळी याचे सेवन केल्यास आपल्याला मल्टीव्हिटॉमिन घेण्याची गरज नाही.

 

जर आपण शेवग्याच्या पानांचा काढा केला तर आपल्याला दहीतून मिळणाऱ्या प्रोटिन्सपेक्षा जास्त प्रोटीन्स मिळतात.  यासह शेवग्यातून व्हिटॉमीन-सी मिळते. संत्रामधून मिळणाऱ्या व्हिटॉमीन पेक्षा ते सात पट अधिक असते. एका ग्राम दुधात जितके कॉल्शिअम मिळते त्यापेक्षा ४ पट अधिक कॉल्शिअम शेवग्यातून मिळते.

इतकेच काय कॅन्सरसारख्या आजारावरही शेवगा प्रभावी औषध आहे. शेवग्यामध्ये कॅमफेरोल, रॅहमनेटिन आणि आइसो क्वेरसेटिन सारखे एंटी कॅन्सर कंपाऊंड मिळतात. आता पर्यंत करण्यात आलेल्या अभ्यासातून ही माहिती मिळाली आहे की, शेवगा ओवरी, यकृत, फफ्फुस आणि मेलानोमा सारख्या घातक कॅन्सरवर हे प्रभावी आहे.

English Summary: drumstick is become important due to these medicine qualities , to know benefit read this Published on: 23 July 2020, 06:01 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters