Health

सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. बऱ्याच लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. याची नेमकी कारणे कोणती? याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Updated on 22 September, 2022 11:28 AM IST

सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम (health) होत असतो. बऱ्याच लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. याची नेमकी कारणे कोणती? याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

आपल्या सवयी किती चांगल्या आहेत आणि किती वाईट याविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे असते. धावपळीच्या जगात प्रत्येकजण आपल्या परीने आपल्या आरोग्याची काळजी घेत असतात. आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग्य आणि सकस आहाराची गरज असते तसेच पुरेश्या झोपेची सुद्धा गरज असते.

मात्रा वेळी अवेळी किंवा दिवसा झोप घेतल्याने तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. निरोगी आणि सुधृढ आरोग्यासाठी आयुर्वेदामधल्या काही गोष्टींचा अवलंब केल्यास त्याचा नक्कीच चांगला परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल.

दिवसा झोपणं हे आयुर्वेदामध्ये चुकीचं आहे असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शरीरावर चुकीचा परिणाम होण्याची शक्यता असते.आयुर्वेदानुसार(ayurveda) दिवसा झोपल्याने कफ वाढतो आणि वात कमी होतो. अश्याने कफामुळे होणाऱ्या आजारांचा त्रास वाढतो. पण वात असलेल्या लोकांना दिवसा झोपल्याने फायदा होऊ शकतो.

LIC च्या नवीन पेन्शन योजने संबंधित खास 10 महत्वाच्या गोष्टी; जाणून घ्या

या लोकांनी दिवसा झोपू नये

जर तुमचे वजन जास्त असेल तुम्हाला कमी करायचे असेल, तुम्हाला बरीक व्हायचे असेल तर अश्या व्यक्तींनी दिवसा झोपू नये. ज्या व्यक्तींना तेलकट किंवा मैद्यापासून बनविलेले पदार्थ खायला आवडत असतील किंवा अश्या पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात होत असेल तर अश्या व्यक्तींनी दिवसा झोपणं टाळावं.

तुम्ही जर का फिटनेस फ्रीक आहात आणि त्याचबरोबर भावनिक, मानसिक आरोग्या बाबतही जागरूक आहात तर त्यांनी दिवसा झोपणं टाळावं. ज्या लोकांना कफाचा त्रास आहे अश्या व्यक्तींनीही दिवसा झोपू नये. ज्यांना डायबेटीस किंवा हायपोथायरॉईडची (Hypothyroid) समस्या आहे अश्या व्यक्तींनीही दिवसा झोपू नये. 

फक्त 50 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीत मिळवा चांगला नफा; ग्रामीण पोस्टल योजना करतेय मालामाल

हे लोक दिवसा झोपू शकतात

खूप बारीक आणि कमकुवत लोक दिवसा झोपू शकतात. ज्या व्यक्तींवर शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा ज्या व्यक्ती आजारी असतील अशी लोकं दिवसा झोपू शकतात. तसेच काही मेहनतीचे काम झाले आहेत किंवा प्रवासादरम्यान तुम्ही शारीरिक आणि मानसिक स्तरावर थकले असाल तर तुम्ही दिवसा आराम मिळेपर्यंत झोपू शकता.

महत्वाच्या बातम्या 
ऑक्टोबरमध्ये 'या' राशींचे नशीब ताऱ्यांसारखे चमकणार; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
शेतकरी मित्रांनो 12 व्या हप्त्याची स्थिति घरी बसून एका कॉलवर तपासा; जाणून घ्या
शेतकऱ्यांना शेती यंत्रे खरेदी करण्यासाठी मिळणार 80 टक्यांपर्यंत अनुदान; असा घ्या लाभ

English Summary: daytime sleep really harmful Read Important Ayurveda
Published on: 22 September 2022, 11:28 IST