छत्तीसगड म्हणजे तांदूळांचं कोटार म्हटलं जातं. येथील धान आणि तांदूळाच्या प्रकाराला देशासह परदेशातही मागणी आहे. येथे सर्वाधिक उत्पन्न हे धानाचे घेतले जाते. आता येथील न्यायधानी बिलासपूरच्या कोटा तालुक्यातील आदिवासी लोक आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं पीक घेत आहेत. जैविक पद्धतीने या पिकांचे उत्पन्न हे शेतकरी घेत आहेत. जैविक शेतीच्या माध्यमातून य़ेथील शेतकरी काळ्या तांदूळाचे उत्पन्न घेत आहेत.
करगीकला गावातील वनांचलमध्ये राहत असलेले शेतकरी आपल्या शेती बदल करत आहेत. शेतात रासायनिक औषधे आणि खतांचा वापर न करता अगदी सेंद्रीय पद्धतीने काळ्या तांदूळाची शेती करत आहेत. या शेतीत येथील शेतकरी दोन प्रकारे उत्पन्न घेत आहेत. काही शेतकरी सेंद्रीय पद्धतीने उत्पन्न घेत आहेत. तर काही जण अधिक उत्पन्न मिळवत आहेत. मुळात काळा तांदूळ मणिपूरमध्ये अधिक प्रमाणात पिकवला जातो. परंतु मणिपूरमधील तांदूळाचे वाण छत्तीसगडमध्ये पिकवले जात आहे. कृषी शास्त्रज्ञांच्या मते काळा तांदूळात ऑक्सीडेंटचे गुण आढळतात. मधुमेह आणि कॅन्सर सारखे आजार झालेल्या रुग्णांसाठी हे तांदूळ फार फायदेकारक आहेत.
सध्याच्या काळासाठी फायदेकारक आहे काळा तांदूळ
इतर तांदुळाच्या तुलनेत या तांदूळात अधिक रोगप्रतकारक शक्ती आहे. याच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यात कॉलेस्टरॉलचे प्रमाण यात काहीच नाही. यात फायबर आणि प्रॉटीनही आहे. सध्या देशात आणि जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या आजारापासून वाचण्यासाठी आपल्याकडे रोगप्रतिकारक शक्ती असली पाहिजे आणि या तांदुळात असलेल्या गुणांमुळे याची मागणी वाढली आहे.
हृदय विकार आणि स्ट्रोकची शक्यता होते कमी
लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे तांदूळ फार फायदेशीर आहे. यासह हृदयाचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी ही हे फायदेकारक आहे. हृदयातील अर्थो स्वलेरोसिस प्लेस इंफॉर्मेशनची शक्यताही कमी करतो. यामुळे हार्ट अॅटक येण्याची शक्यता कमी होते. अशा गुणकारी गोष्टींमुळे शेतकरी या तांदुळाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेत आहेत, आणि याची मागणीही वाढली आहे.
Share your comments