Government Schemes

मोदी सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत मोफत अन्नधान्य देणार असल्याचं आधीच जाहीर केलं. 'वन नेशन वन रेशन' (One Nation One Ration) ही केंद्र सरकारची महत्त्त्वकांक्षी योजना आहे. ही योजना देशभरात लागू झाली. यानंतर आता सर्व शिधादुकानांमध्ये ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक प्वाइंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस डिव्हाईस बंधनकारक केलं आहे.

Updated on 09 November, 2022 10:50 AM IST

मोदी सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत मोफत अन्नधान्य देणार असल्याचं आधीच जाहीर केलं. 'वन नेशन वन रेशन' (One Nation One Ration) ही केंद्र सरकारची महत्त्त्वकांक्षी योजना आहे. ही योजना देशभरात लागू झाली. यानंतर आता सर्व शिधादुकानांमध्ये ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक प्वाइंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस डिव्हाईस बंधनकारक केलं आहे.

याचे अनेक फायदे आहेत, यामुळे आता रेशनधारकांना अचूक अन्नधान्य मिळेल. यामुळे मापात पाप होणार नाही. (ration card news now online electronic point of sale ie pos device is mandatory at all shops) या निर्णयामुळे देशातील कोटी रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.दुकानदार शिधा देताना काटा मारतात.

अनेकदा यामुळे मोठ्या प्रमाणावर काळा बाजार देखील केला जातो. अनेकजण मापात पाप करतात, अशा अनेक तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्या आहेत. मात्र हा नियम लागू झाल्याने मापात पाप करण्याची शक्यताच नाहीशी झाली आहे, यामुळे सर्वांना नियमानुसार धान्य मिळणार आहे. यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार बदल करण्यात आला आहे.

"कारखान्याच्या वजनकाट्यात एक किलोचा फरक पडला तरी एक लाखाच बक्षीस देणार"

कायद्यानुसार योग्य अन्नधान्य मिळावं, यासाठी रेशन दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल इलेक्ट्रॉनिक तराजूसोबत जोडण्यात यावं, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात संशोधन करण्यात आलं आहे. यामुळे याचा सर्वांना फायदा होणार आहे.

शेतकरी होणार करोडपती! महामार्ग शेतात आणि जमिनीला करोडोंचा भाव..

याबाबत केंद्र सरकार अनेक दिवसांपासून विचार करत होते, यामुळे आता सर्व शिधादुकानांमध्ये ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक प्वाइंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस डिव्हाईस बंधनकारक केलं आहे. यामुळे धान्य देखील वाढेल आणि गरिबांना त्याचा फायदा होईल.

महत्वाच्या बातम्या;
बातमी कामाची! आता पाचट जाळणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचे २ हजार
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार विहिरीसाठी वाढीव अनुदान
पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

English Summary: ration holders get correct grain measurement, decision Centre..
Published on: 09 November 2022, 10:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)