Government Schemes

सर्वसामान्य लोकांसाठी पोस्ट ऑफिसच्या योजना फायदेशीर ठरत आहेत. मात्र आता आणखी सेवा सुखकर बनविण्यासाठी इंडिया पोस्ट आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी नवीन योजना बनवत आहे.

Updated on 28 August, 2022 12:07 PM IST

सर्वसामान्य लोकांसाठी पोस्ट ऑफिसच्या (post office) योजना फायदेशीर ठरत आहेत. मात्र आता आणखी सेवा सुखकर बनविण्यासाठी इंडिया पोस्ट आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी नवीन योजना बनवत आहे.

इंडिया पोस्ट सरकारी सेवा लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रोजेक्ट (project) आणि तंत्रज्ञानावर काम करत आहे. यावर्षी इंडिया पोस्ट 10,000 नवीन पोस्ट ऑफिस उघडण्याच्या योजनेवर काम करत आहे. याचा लोकांना फायदाच होणार आहे.

Astro tips: 'या' गोष्टींच्या पालनाने नशीब चमकते; पैशांची कमी राहत नाही

टपाल आणि विविध सरकारी सेवा लवकरच लोकांच्या दारात पोहोचवल्या जाणार आहेत. आता लोकांना पोस्ट ऑफिसमध्ये येण्याची गरज भासणार नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या दारात सेवा पोहोचवल्या जाणार आहेत.अशी माहिती टपाल विभागाचे सचिव अमन शर्मा यांनी एका सीआयआय (Aman Sharma) परिषदेत दिली आहे.

भारीच की! आता शेतकरी घरबसल्या विकू शकणार आपला शेतीमाल; अशी आहे प्रक्रिया

"आयटीच्या मदतीने नागरिकांना सेवा देण्यासाठी सरकार उत्सुक आहे आणि त्यावर काम करत आहे. इंडिया पोस्टने महामारीच्या काळात 20,000 कोटी रुपयांहून अधिक घरपोच केले आहेत. सरकार (government) आम्हाला आमची पोहोच वाढवण्यास आणि अधिक पोस्ट ऑफिस उघडण्यास सांगत आहे. आणखी 10,000 पोस्ट ऑफिस उघडण्याची परवानगी मिळाली आहे. लोकांना त्यांच्या घरापासून 5 किमीच्या परिघात बँकिंग आणि वित्तीय सेवा पुरवल्या जाव्यात अशी सरकारची इच्छा आहे. चालू आर्थिक वर्षात 10,000 नवीन टपाल कार्यालये उघडली जाणार आहेत", असेही शर्मा म्हणाले.

महत्वाच्या बातम्या  
Onion Prices Increased: कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; कांद्याच्या दरात वाढ
Agriculture Scheme: कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना करावे लागणार 'हे' एक काम
Incentive Grant: आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबरपर्यंत जमा होणार 50 हजार रुपये
पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याबद्दल कृषी मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले हप्ता...

English Summary: Post Office big decision scheme
Published on: 28 August 2022, 11:16 IST