चांगल्या भविष्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एलआयसीची आम आदमी विमा योजना (Aam Aadmi Bima Yojana) सुरक्षित गुंतवणुकीसह ग्राहकांना चांगला नफा देत आहे.
एलआयसीच्या आम आदमी पॉलिसी (policy) अंतर्गत, विमाधारकाच्या नैसर्गिक मृत्यूवर 30,000 रुपयांचे पॉलिसी कव्हर उपलब्ध आहे. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यावर ग्राहकाला हा लाभ दिला जातो.
याचा अर्थ असा की जर एखादी व्यक्ती या पॉलिसीचा लाभ घेत असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर नॉमिनीला 30,000 रुपये मिळतील. विशेष म्हणजे याशिवाय अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यासही ही एलआयसी पॉलिसी लाभ देईल.
ठरलं! पीएम किसान योजनेचा हप्ता 'या' तारखेला खात्यात जमा होणार
75,000 रुपयांचे विमा संरक्षण मिळेल
LIC आम आदमी विमा योजनेंतर्गत अपंगत्वाच्या बाबतीत, पॉलिसीधारकास 37,500 रुपये मिळतील. अपघाती मृत्यू झाल्यास, नॉमिनीला (nominee) या पॉलिसी अंतर्गत 75,000 रुपयांचे विमा संरक्षण मिळू शकेल. दोन सामाजिक योजना एकत्र करून विमा योजना तयार करण्यात आली आहे. या आम आदमी विमा योजना आणि जनश्री विमा योजना आहेत.
ग्रामीण भागातील गरीब वर्गाला त्याचा लाभ मिळावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत घरात कमावणाऱ्या व्यक्तीला त्याचे कव्हरेज मिळते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार (central and state government) मिळून या योजनेचा प्रीमियम भरतात. एलआयसीच्या या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाला अनेक सुविधा मिळतात.
Gauri Pooja 2022: शुभ मुहूर्तावर करा लाडक्या गौरीची पूजा; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि इतर खास गोष्टी
पात्रता आणि किती प्रीमियम भरावा लागेल?
18 ते 59 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती एलआयसी आम आदमी विमा योजनेचा लाभ घेऊ शकते. एलआयसी आम आदमी विमा योजनेचा प्रीमियम वार्षिक 200 रुपये आहे. यापैकी 50 टक्के म्हणजे 100 रुपये राज्य सरकार (state government) किंवा केंद्रशासित प्रदेश सरकार देणार आहेत. अशाप्रकारे, पॉलिसीधारकाला वर्षभरात केवळ 100 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल.
महत्वाच्या बातम्या;
या लोकांना आज मिळणार बाप्पाचा आशीर्वाद; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची उद्यापासून विक्री सुरू; जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये
पोस्ट ऑफिसची अफलातून योजना; 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतोय 35 लाख रुपयांचा नफा
Published on: 02 September 2022, 09:43 IST