जर तुम्हाला चांगल्या भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एलआयसीच्या अशा अनेक योजना (scheme) आहेत ज्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळतो. आपण आज अशाच एका योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
जर एखाद्या व्यक्तीने पॉलिसीची (policy) मुदत 21 वर्षे निवडली, तर त्यासाठी पॉलिसी घेताना त्याचे वय 54 वर्षांपेक्षा कमी असावे. कारण 25 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी व्यक्तीची वयोमर्यादा 50 वर्षे आहे. पॉलिसीच्या मॅच्युरिटीसाठी कमाल वयोमर्यादा 75 वर्षे ठेवण्यात आली आहे.
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजेच एलआयसीवर देशातील करोडो लोकांचा विश्वास आहे. या विश्वासाचे कारण म्हणजे एलआयसीच्या योजनांमधील सुरक्षित गुंतवणूक आणि परिपक्वतेवर चांगला परतावा.
अपघाती विमा योजनेत फक्त 299 रुपये गुंतवा आणि मिळवा 10 लाखांचा फायदा
LIC ची अशीच एक पॉलिसी म्हणजे 'जीवन लाभ योजना' (jeevan labh yojna). ही योजना मृत्यूनंतर पॉलिसीधारकाच्या कुटुंबासाठी आर्थिक सहाय्य आणि हयात असलेल्या पॉलिसीधारकासाठी परिपक्वतेच्या वेळी एकरकमी रक्कम प्रदान करते. LIC जीवन लाभ पॉलिसी तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते.
शेतकरी मित्रांनो 'या' औषधी पिकाची फक्त 10 रोपे लावा आणि मिळवा 20 लाखापर्यंत उत्पन्न
जीवन लाभ योजनेविषयी
तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी जीवन लाभ पॉलिसी घेतल्यास, तुम्हाला तिच्या मॅच्युरिटीवर 54 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. यासाठी तुम्हाला २५ वर्षांच्या मुदतीची पॉलिसी घ्यावी लागेल. यामध्ये तुम्हाला विम्यासाठी 20 लाख रुपयांची रक्कम निवडावी लागेल. तुम्हाला दरवर्षी 92,400 रुपये प्रीमियम म्हणून जमा करावे लागतील.
तुम्हाला दरमहा 7,700 रुपये आणि दररोज 253 रुपये गुंतवावे लागतील. यानंतर, जीवन लाभ पॉलिसी परिपक्व झाल्यावर तुम्हाला ५४.५० लाख रुपये मिळतील. पॉलिसीच्या मॅच्युरिटीसाठी कमाल वयोमर्यादा 75 वर्षे ठेवण्यात आली आहे. दुर्दैवाने, पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला लाभ मिळतो.
महत्वाच्या बातम्या
पुढील 7 दिवस सावधानता बाळगण्याची गरज; जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशीभविष्य
घरबसल्या सुरू करा 'हा' लोकप्रिय व्यवसाय; दरमहा 2 लाख रुपयांची होईल कमाई
कृषी अभियांत्रिकी करून मिळवा सरकारी नोकरी; महिना 50 ते 70 हजार रुपये मिळतो पगारकॉर्पोरेट कंपनीतील नोकरी सोडून इंजिनिअरींगचा तरुण शेतात कमवतोय लाखों रुपये
Published on: 19 September 2022, 09:47 IST