केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल. आता शेतकऱ्यांना राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षिसे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
जिल्हृयातील सर्व शेतकऱ्यांनी भात, मका, तूर आणि सोयाबीन पिकासाठी अर्ज करुन पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी यांनी केले आहे. भात, मका, तुर, सोयाबीन पिकासाठी 31 ऑगस्ट मुदत राहणार आहे.
राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. यातून विजेता शेतकऱ्याला बक्षीस देण्यात येणार आहे. पिक स्पर्धेतील पिकांची निवड करतांना पिकनिहाय तालुक्यातील क्षेत्र किमान 1 हजार हेक्टर असावे, अशी अट ठेवण्यात आली आहे.
स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी असणाऱ्या अटी व शर्ती
1) पिक स्पर्धेसाठी सर्व शेतकऱ्यांना भाग घेता येईल. यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असून जमीन तो स्वत: कसत असला पाहिजे.
2) शेतकऱ्यांला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
3) स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये राहील.
4) तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 5 यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पीक स्पर्धा रद्द करण्यात येवून प्रवेश शुल्क परत देण्यात येईल.
5) स्पर्धा जाहिर झाल्यानंतर सहभागी शेतकऱ्यास प्रवेश शुल्क परत दिले जाणार नाही.
6) ज्या शेतकऱ्यांची पिकनिहाय उत्पादकता तालुक्याच्या सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा पट किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येऊन त्यांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येतील.
हे ही वाचा
Bater Rearing: अरे वा! अवघ्या 35 दिवसात मोठी कमाई; शेतकरी मित्रांनो 'या' लहान पक्षांचे करा पालन
पीक स्पर्धा विजेते व बक्षिसांचे स्वरुप
1) तालुकास्तरीय सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस याप्रमाणे प्रथम 5 हजार रुपये, द्वितीय 3 हजार रुपये, तृतीय 2 हजार रुपये.
2) जिल्हास्तर प्रथम 10 हजार रुपये, द्वितीय 7 हजार रुपये व तृतीय 5 हजार रुपये. विभागस्तर प्रथम- 25 हजार रुपये, द्वितीय- 20 हजार रुपये व तृतीय- 15 हजार रुपये
3) राज्यस्तर प्रथम-50 हजार रुपये, द्वितीय- 40 हजार रुपये व तृतीय-30 हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरुप रहणार आहेत.
4) पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यात(प्रपत्र-अ) मध्ये भरुन ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन व सातबाराच्या उताऱ्यासह कागदपत्रांची पूर्तता करुन तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे पाठवा.
महत्वाच्या बातम्या
Electric Car: काय सांगता! एका चार्जमध्ये जास्त रेंज देतेय 'ही' इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या 'या' कारबद्दल
Horoscope: 'या' राशीच्या लोकांसाठी आज धनलाभाचा योग; जाणून घ्या...
Almond Farming: बदामाच्या ‘या’ जातीची शेती शेतकऱ्यांना बनवणार करोडपती; जाणून घ्या 'या' शेतीबद्दल...
Share your comments