सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. असे असताना मात्र त्यांना याचा फायदा अगदी थोड्या प्रमाणात मिळतो. अनेक शेतकरी यापासून वंचीत राहतात. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. यामुळे आता केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सहकारी बँकेच्या (Cooperative Bank) ग्राहकांना (Coustomer) शासनाच्या (Government) सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे.
आता सरकार सहकारी बँकांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर (DBT) शी जोडणार आहे. अमित शहा (Amit Shah) यांनी ही माहिती दिली. सध्या सरकारच्या 52 मंत्रालयांमार्फत चालवल्या जाणाऱ्या 300 योजनांचा लाभ डीबीटीद्वारे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे, म्हणजेच आता या सर्व योजनांचा लाभ सहकारी बँकांच्या ग्राहकांना मिळणार आहे. याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे.
दरम्यान, बँकिंग क्षेत्रात पूर्वीपेक्षा खूप सुधारणा झाली आहे, त्यामुळे नागरिकांना बँकिंग सेवेचा लाभ मिळत असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. तसेच जनधन योजनेमुळे 45 कोटी नवीन लोकांचे बँक खातेही उघडण्यात आले आहे. अशा 32 कोटी लोकांना रुपे डेबिट कार्डचा लाभही मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे सर्व पीएम मोदींच्या 'सहकार से समृद्धी का संकल्प'मुळे घडले असल्याचे ते म्हणाले.
भारीच की! शेतकरी मित्रांनो 'या' पिकाची करा शेती आणि 3 महिन्यात लखपती व्हा, जाणून घ्या..
बँकिंगसाठी जे पॅरामीटर्स बनवले आहेत त्या सर्व बाबींवर कृषी बँकेने स्वतःला सिद्ध केले आहे, असे अमित शहा म्हणाले. आधी बँकेकडून 12 ते 15 टक्के व्याजाने कर्ज मिळत होते, ते आता 10 टक्क्यांवर आले आहे. इतकेच नव्हे तर कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना दोन टक्के सवलतही दिली जाते, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
काय सांगता! खोदलेली विहीर गेली चोरीला, नंदुरबार जिल्ह्यातील प्रकार...
राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर बंदी, शिंदे सरकारची मोठी घोषणा
'नंदी ब्लोअर' ची कमाल, आता ट्रॅक्टरचे काम बैलजोडीच्या माध्यमातून, अनोख्या जुगाडाची राज्यात चर्चा..
Published on: 27 July 2022, 12:36 IST