1. यांत्रिकीकरण

एकाच यंत्राने होतील पीक काढणीनंतरची कामे, जाणून घ्या या यंत्राची माहिती

अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन हार्वेस्टर (Harvester)चा वापर वाढत आहे. त्यामुळे वेळेवर आणि वेगाने काढणी करणे शक्य झाले आहे. मात्र या यंत्राद्वारे काढणी केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पेंढा किंवा भुशाचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये करण्यामध्ये अडचणी येतात.

KJ Staff
KJ Staff
पेंढा कापणी, गोळा करणारे ‘स्ट्रॉ कंबाईन यंत्र

पेंढा कापणी, गोळा करणारे ‘स्ट्रॉ कंबाईन यंत्र

अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन हार्वेस्टर(Harvester)चा वापर वाढत आहे. त्यामुळे वेळेवर आणि वेगाने काढणी करणे शक्य झाले आहे. मात्र या यंत्राद्वारे काढणी केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पेंढा किंवा भुशाचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये करण्यामध्ये अडचणी येतात.

अनेक ठिकाणी पिकाचे हे अवशेष जाळून टाकले जात असल्यामुळे प्रदूषणात वाढ होते. यागोष्टी टाळण्यासाठी पिकाचा शिल्लक राहिलेला पेंढा कापणी, आवश्यकता असल्यास त्याचे बारीक तुकडे करणे व गोळा करणे ही तिन्हीही कामे एकत्रितरीत्या करणारे यंत्र उपयोगी ठरते. या तिन्ही कामांसाठी उपयोगी आहे, स्ट्रॉ कंबाइन य यंत्र. हे यंत्र ३५ ते ५० एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवले जाते. अशा प्रकारचे स्वयंचलित स्ट्रॉ कंबाइन यंत्रही उपलब्ध आहे. यंत्राच्या मागे जोडलेल्या ट्रेलरमध्ये भुस्सा गोळा केला जातो.

संरचना :

या यंत्रामध्ये पेंढा कापणी घटक, पेंढा गोळा करणारा घटक, फिडिंग युनिट(Feeding unit), स्ट्रॉ ब्रुइझिंग म्हणजेच पेंढ्यांचा भुगा करणारा घटक आणि स्ट्रॉ ब्लोईंग युनिट (भुस्सा बाहेर टाकणारा घटक) इ. मुख्य कार्यरत घटक असतात.पेंढा एकत्र करण्यासाठी स्पाइक-टूथ प्रकार, चाफ कटर प्रकार आणि सेरेटेड सॉ अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणांचा उपयोग या यंत्रामध्ये केला जातो.या यंत्राचे प्रमुख घटक रील, कटर बार, ऑगर, फीडर, स्ट्रॉ ब्रुइझिंग सिलिंडर, कॉन्केव्ह अ‍ॅस्पिरेटर ब्लोअर, चाळण्या आणि गिअर बॉक्स हे आहेत. कापणीनंतर उरलेला पेंढा स्ट्रॉ कंबाइन (Straw combine machine )द्वारे गोळा केला जातो. कॉन्केव्ह सिलिंडर विभागात नेऊन तिथे त्याचे तुकडे केले जातात. कंबाइन हार्वेस्टर(combine Harvester) ने न कापता सोडलेल्या पेंढ्याची कापणी करण्यासाठी रेसिप्रोकेटिंग कटर बारचा वापर केला जातो. कॉन्केव्हमधून जाणारा पेंढा ब्लोअरद्वारे वेगळा केला जातो. मागील बाजूस वायरच्या जाळीने झाकलेल्या ट्रॉलीमध्ये पाठवला जातो. पेंढ्यापासून राहिलेले धान्य पुन्हा मिळवण्यासाठी कॉन्केव्हच्या खाली एक चाळणी दिली आहे.

 

यंत्राची काही वैशिष्ट्ये :

एकूण परिमाण (सें.मी.) ः ४६८ × १६० × १९७

ऊर्जेचा स्रोत ः ३५ एचपी किंवा त्याहून अधिकचा ट्रॅक्टर

कटर बार रुंदी, (सें.मी.) ः २००

ब्लोअर आकार (सें.मी.) ः ५० × ७०

कॉन्केव्ह ओपनिंग (सें.मी.) ः २

कटची उंची (सें.मी.) (पेंढा कापण्याची उंची) ः २

 

उपयुक्तता

१) स्ट्रॉ कंबाइनची कार्यक्षमता ०.४ ते ०.५ हेक्टर प्रति तास एवढी आहे. सुमारे १ ते २ टन भुस्सा प्रति हेक्टरमध्ये मिळू शकतो.

२) पारंपरिक पद्धतीने मळणी करण्याच्या तुलनेत हे यंत्र ५५-६५ टक्के पेंढा यशस्वीरीत्या पुन्हा उपलब्ध होऊ शकते.

३) वाया जाण्याची शक्यता असलेले धान्य प्रति हेक्टरी ७५-१०० किलो पुन्हा मिळू शकते.

English Summary: Straw combine machine is useful for harvesting work Published on: 22 April 2021, 06:59 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters