लसूण ही आपल्या स्वयंपाकघरातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मसाल्यांमध्ये लसुनची स्वतःची एक चव असून- लसुनशिवाय मसाल्याला महत्त्व राहत नाही.
भारताच्या अनेक भागांमध्ये लसणाची शेती केली जाते. आता सध्या लसनाचे उत्पन्न घेणारे शेतकरी लसणाची कापणी करतात. लसणाची कापणी करताना हार्वेस्टरचा उपयोग केला पाहिजे जेणे करून कमी खर्चात आपले काम पूर्ण होईल. लसणाच्या शेतीसाठी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब आणि मध्यप्रदेशातील वातावरण खूप उपयुक्त आहे. महाराष्ट्रातही लसणाचे पीक घेतले जाते. पण बऱ्याच वेळेस लसूण हा नाममात्र किंवा आपल्या वापरा पुरता लावला जात असतो. लसणाची काढणी एप्रिल व मे महिन्यात केली जाते.
उत्तर प्रदेशात त्याची काढणी एप्रिल आणि मे महिन्यातच होत असते. दरम्यान मजूर आणि अवजारांची कमतरता असल्याने लसणाची शेती करणे कमी झाले आहे. लसणाची काढणे करण्यासाठी अनेक तंत्र आहेत. परंतु शेतकऱ्यांना त्यांची माहिती नसल्याने या पिकाकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. लसुन काढणीसाठी जमीन खोदावी लागते किंवा त्याला दोन्ही हाताने खेचून काढावे लागते. यामध्ये खूप वेळ वाया जातो. यासाठी प्रति हेक्टरी 30 ते 35 मजुरांची गरज असते. काही जागेवर कल्टीवेटर लावून लसुन काढला जातो.
यामुळे पिकाचे नुकसान होत असते. दरम्यान ट्रॅक्टर 40 चा लसुन काढण्यासाठी वापर केला तर मजुरांची संख्याही कमी होते आणि पिकाचे नुकसान होत नाही. या मशीन मध्ये 1.5 मीटर अरुंड ब्लेड असते त्याच्या साह्याने जमीन खोदली जाते. लसुन उपट आल्यानंतर ते जायच्या मध्ये टाकले जाते. मशीन सुरू असल्याने जाळी मध्येच माती आणि लसूण वेगळे होत असतात.
त्यानंतर जाळीच्या मागील पट्टीत लसुन जात असतो. या मशीनचे कार्यक्षमता पंचवीस पॉईंट तीस हेक्टर प्रति घंटा आहे. या मशीनचा काढण्यासाठी खर्च हा तीन ते चार हजार रुपये प्रति हेक्टरी येत असतो. कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये हे मशीन उत्तम रित्या चालत असते. यामुळे लसुन हार्वेस्टर चा उपयोग शेतकऱ्यांनी करावा.
Share your comments