Education

​​Jobs 2022: कोरोना काळात अनेकजणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातील काही जण नोकरीच्या शोधात आहेत तर काही जण शेतीकडे वळले आहेत. मात्र तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. UPSC मध्ये काही जागा निघाल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

Updated on 13 October, 2022 5:41 PM IST

​​Jobs 2022: कोरोना काळात अनेकजणांच्या नोकऱ्या (Jobs) गेल्या आहेत. त्यातील काही जण नोकरीच्या शोधात आहेत तर काही जण शेतीकडे वळले आहेत. मात्र तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. UPSC मध्ये काही जागा निघाल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही अर्ज (application) करू शकता.

UPSC ने यापूर्वी अधिसूचना जारी केली होती आणि अनेक पदांवर रिक्त जागा (vacancy) काढल्या होत्या. त्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. या भरती मोहिमेअंतर्गत 52 पदांची भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

रिक्त जागा तपशील

अधिसूचनेनुसार, अभियोजकाच्या 12 पदांसाठी, तज्ञांच्या 28 पदांसाठी, पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या 10 पदे आणि सहाय्यक प्राध्यापकाच्या 2 पदांसाठी ही भरती मोहीम राबविण्यात येणार आहे.

धक्कादायक! महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढला; २ महिन्यात तब्बल २६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पात्रता

1.अभियोक्ता: उमेदवार कायद्यातील पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला एक वर्षाचा अनुभव असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

2.स्पेशलिस्ट कॅडर: उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी, पीजी पदवी किंवा पीजी डिप्लोमा असावा. याशिवाय अर्जदाराला तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

3.असिस्टंट प्रोफेसर: उमेदवाराकडे आयुर्वेद मेडिसिनची पदवी किंवा पीजी पदवी असावी. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ५० वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

कार खरेदी करायचीय तर गोंधळून जाऊ नका; अशी निवडा सीएनजी किंवा पेट्रोल कार

अर्ज फी

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शुल्क भरावे लागेल. अर्जदाराला 25 रुपये शुल्क भरावे लागते. उमेदवार SBI च्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा व्हिसा/ मास्टर क्रेडिट/ डेबिट कार्ड वापरून अर्ज फी भरू शकतात.

तर SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. या भरती मोहिमेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या:
हिवाळ्यात टोमॅटोच्या शेतीपासून मिळेल बक्कळ पैसा; करा या अस्सल जातींची लागवड
परतीच्या पावसाचे राज्यात थैमान! सोयाबीनसह, मूग, उडीद पिकं पाण्याखाली; शेतकरी अडचणीत

English Summary: Jobs 2022: The dream of a government job will come true! Apply for this UPSC Recruitment today; Know more
Published on: 13 October 2022, 05:41 IST