दुधाळ जनावरांना मध्ये बऱ्याच वील्यावर जार न पडणे, जनावरे वेळेवर माजावर न येणे, मुका माज, गाय भरल्यावर गाभण न राहणे इत्यादी प्रजनन संस्थेचे विकार पशुपालकांना आर्थिक नुकसान देणारे ठरतात.
जर या व्याधींचा विचार केला तर खनिज पदार्थांची कमतरता, आवश्यक संप्रेरकांचा अभाव अथवा कमतरता किंवा प्रजनन अवयवाची कमी वाढ इत्यादी कारणे यामागे असतात. काही वनौषधींचा उपयोग या व्याधींवर यशस्वीपणे करता येतो. या कोणत्या वनस्पती आहेत? याची माहिती या लेखात आपण घेऊ.
उपयुक्त वनौषधी
1- गोखरु -ही वनस्पती प्रामुख्याने मूत्र संस्थेवर उपयोगी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या काटेरी फळांमध्ये भाकड जनावर माजावर येणे साठी आवश्यक असलेले इंट्रोजीन या संप्रेरकाची निर्मिती करण्याची क्षमता असते.
2- पुत्रजीवा- या वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असून या वनस्पतीमुळे गर्भ काळात आवश्यक असणाऱ्या संप्रेरकांची निर्मिती होते व गर्भाच्या वाढीला सहकार्य करतात.
3- अश्वगंधा- अश्वगंधा ही शुक्राणूंच्या वाढीसाठी अत्यंत उपयोगी औषधी वनस्पती आहे. या वनस्पतींच्या वापरामुळे वीर्यातील शुक्राणूंची संख्या वाढते.
4- शतावरी- मादीच्या व नराच्या विविध प्रजनन संस्थेच्या रोगांवर शतावरी चे उपयोग केला जातो. शारीरिक दुर्बलता, वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी असणेआधी विकारांवर शतावरी उपयुक्त आहे.
नक्की वाचा:ऐकलं का ! ठिबकसाठी आता 80 टक्के सबसिडी, फक्त 13 दिवसांत मिळणार अनुदान
5- शिलाजित-शुक्राणू ची दुर्बलता, मूत्रसंस्थेचे विकार तसेच मधुमेह इत्यादी रोगांवर ही अत्यंत उपयुक्त औषध होय. याच्या सेवनामुळे शुक्राणू व वीर्य यात वाढ होणारे संप्रेरक जनावरास उपलब्ध होऊन त्यांची दुर्बलता कमी होते.
6- कोरफड- कोरफड ही वनस्पती बलवर्धक असून वेदनाशामक आहे. कोरफडीच्या रसाने सूज कमी होते तसेच ही सूक्ष्मजंतूना मारक आहे. कोरफडच्या गरास सुकल्यानंतर ती डिंका सारखी कडक होते. हिचा रंग काळसर असल्याने हीच काळबोळ असे म्हटले जाते. यामध्ये जनावर माजावर येण्यासाठी आवश्यक असलेले संप्रेरकांची निर्मितीवाढवण्याचे गुणधर्म आहेत.
7- अग्निशिका- ही वनस्पती जनावरांच्या प्रजनन साठी आवश्यक संप्रेरकाच्या स्त्रावासाठी उत्तेजक आहे.
Share your comments