1. पशुधन

पशुपालक शेतकऱ्यांना थंडीच्या दिवसात 'ह्या' पद्धतीने ठेवा पशुची निगा, पशुधनाचे नुकसान होणार कमी

पशुपालन हे फार पूर्वीपासून करण्यात येत आहे. भारतात देखील अल्पभूधारक व भूमिहीन शेतकरी पशुपालन करून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत. पशुपालन व्यवसायात जर चांगले यश संपादन करायचे असेल आणि यातून चांगली कमाई करायची असेल तर पशुची काळजी घेणे फार महत्वाचे ठरते. थंडीच्या दिवसात पशुची विशेष काळजी घ्यावी लागते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
animal

animal

पशुपालन हे फार पूर्वीपासून करण्यात येत आहे. भारतात देखील अल्पभूधारक व भूमिहीन शेतकरी पशुपालन करून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत. पशुपालन व्यवसायात जर चांगले यश संपादन करायचे असेल आणि यातून चांगली कमाई करायची असेल तर पशुची काळजी घेणे फार महत्वाचे ठरते. थंडीच्या दिवसात पशुची विशेष काळजी घ्यावी लागते.

भारतात साधारणपणे नोव्हेंबर लागला की गुलाबी थंडीची चाहूल हि जाणवायला लागते. थंडीच्या ह्या दिवसात पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या पशुकडे विशेष लक्ष दयावे लागते. दुधाळू गाई म्हशीना स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी सभोवतालच्या तापमानाशी जुळवून घ्यावे लागते. थंडीत देखील गाई म्हशी स्वतःला थंडीशी जुळवून घेतात. हिवाळ्यात थंडीचा सामना करण्यासाठी, गाई, म्हशी तसेच इतर सर्व प्राणी त्वचेखाली चरबी साठवतात आणि त्यांच्या शरीरातील उष्णता हि वाढवत असतात. यासाठी पशु आपल्या हृदयची गती आणि श्वासोच्छ्वास वाढवतात, व आपल्या शरीरातील उष्णता हि वाढवत असतात. पशु हे आपल्या शरीरातील रक्त प्रवाह हा वाढवतात जेणेकरून थंडीमुळे त्यांचे शरीर हे गोठणार नाही. जरी पशु हे नैसर्गिकरीत्या करू शकतात तरी सुद्धा हे नैसर्गिक कार्य व्यवस्थित पणे चालू राहावे म्हणुन अतिरिक्त आहाराची गरज हि भासत असते. पशु विशिषज्ञ तसेच डॉक्टर असे सांगतात की, थंडीत तापमान मेंटेन करण्यासाठी पशुला 20 टक्के अतिरिक्त आहाराची गरज भासत असते.हिवाळ्यात अनेकदा थंडी हि अनावर होते आणि अशा जास्तीच्या थंडीमुळे दुग्धजन्य प्राण्यांच्या दुध उत्पादक क्षमतेवरही परिणाम होतो कारण शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी जास्त शारीरिक ऊर्जा हि वापरली जाते. जे पशु हे चांगल्या गोठ्यात अथवा शेडमध्ये ठेवले जातात अशा  पशुना हा थंडीचा एवढा फटका बसत नाही, म्हणजे त्याच्या दुध उत्पादन क्षमतेवर अथवा शरीरावर काही विपरीत परिणाम हा घडत नाही.

परंतु ज्या पशुपालक शेतकऱ्यांकडे चांगला सुसज्ज गोठा नसतो आणि त्यांचे पशु हे उघड्यावर राहतात अशा पशुना थंडीच्या दिवसात विशेष सोय हि करावी लागते. थंडीपासून अशा पशुना संरक्षण द्यावे लागते ह्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज असते. अशा उघड्यावर राहणाऱ्या पशुना त्यांना मानवेल असे आरामदायी वातावरण प्रोवाईड करावे लागते. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात आणि वर्षाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तापमान हे 0 ते 40 °C दरम्यान असते आणि पशुसाठी योग्य तापमान हे 18 ते 27 °C दरम्यान असावे असे सांगितलं जाते. त्यामुळे पशुला आवश्यक तापमान मेंटेन करावे लागते.

 थंडीतील दिवसात पशुसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना

»पशुच्या गोठ्यातील तापमान वाढवा.

»चांगले व्हेंटिलेशन सुनिश्चित करण्यासाठी आर्द्रता कमी करा, शेडमध्ये जास्त ओलावा, छताला गळती आणि जमीन गोठवण्यापासून रोखा.

 

»व्हेंटिलेशन हे दुपारी केले पाहिजे.

»हिवाळ्याच्या दिवसात, गोठ्यातील जमीन धुण्यासाठी कमी पाणी वापरले पाहिजे आणि साफसफाई हि कोरड्या पद्धत्तीने केले पाहिजे.

»दुपारच्या वेळी जनावरांना गोठ्याबाहेर उन्हात ठेवावे.

»पशुना पिण्यासाठी कोमट पाणी द्यावे

»थंडीच्या काळात गायीं, म्हशीना चाऱ्याची गरज वाढते त्यामुळे त्यांना हिवाळ्यात अतिरिक्त चारा द्यायला पाहिजे.

English Summary: take precaution of animal in winter session and save from calamaties Published on: 20 November 2021, 09:30 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters