1. पशुधन

गुरांना लसीकरण करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

पशुपालनांने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पशुपालन हा महत्त्वाचा मार्ग आहे. जर आपल्याला अधिकचा नफा हवा असेल तर आपल्याला जनावरांची योग्य काळजी आणि निगा ठेवावी लागते.

KJ Staff
KJ Staff


शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पशुपालन हा महत्त्वाचा मार्ग आहे. जर आपल्याला अधिकचा नफा हवा असेल तर आपल्याला जनावरांची योग्य काळजी आणि निगा ठेवावी लागते. योग्यवेळी जनावरांना लस देणे आवश्यक असते.  लसीकरण करताना आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आज आपण आपल्या या लेखात याचीच माहिती घेणार आहोत.

गाई,  म्हशी व शेळ्या मेंढ्या हे पाळीव प्राणी घटसर्प,  फऱ्या व आंत्रविषार सारख्या साथीच्या रोगांमुळे तडकाफडकी मरण पावतात.  या रोगांची लागण झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नाही.  परिणामी मोडले व जनावरे दगावतात व पशुपालकाचे फार मोठे नुकसान होते.

लाळ्या खुरकूत या रोगामुळे सहसा जनावरे मृत्युमुखी पडत नाहीत परंतु या रोगामुळे विशेषतः संकरित गाई व म्हशी अनुत्पादक होतात किंवा त्यांची क्षमता घटते.  या सगळ्या परिस्थितीमुळे पशुपालकास फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो.

 


लसीकरणापूर्वी काय करावे

कोणत्याही जनावरास लसीकरण करण्याच्या एक आठवडा अगोदर आंतर जीवांच्या नायनाटासाठी जंतुनाशक औषध देऊन द्यावीत.

जनावरांचे शरीरावरील बाह्य परोपजीवी चा( उदा. गोचीड, गोमाशा, उवा, पिस्वा) नायनाट करण्याकरिता जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या किटकनाशक औषधांची फवारणी करून घ्यावी.

         लसीकरण करताना कोणती काळजी घ्यावी

  • जनावरांना दिली जाणारी लस ही चांगल्या नामांकित कंपनीच्या असावी.
  • लस खरेदी करताना त्यावरील औषध कालबाह्य होण्याची तारीख पाहून घ्यावी व त्या लसीचा बॅच नंबर नोंदवून ठेवावा.
  • काही लसी ( खुरी, श्वानदंश, धनुर्वात) औषधी दुकानातून आणत असताना थर्मासमध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये बर्फावर ठेवून आणाव्यात व जनावरास देईपर्यंत बर्फात ठेवाव्यात, पण बाहेर काढुन ठेवू नयेत.
  • लस घरी आणल्यानंतर फ्रिज असेल तर लस फ्रिजमध्ये ठेवावी किंवा लस बाजारातून आणलेल्या बरोबर लगेच वापरून टाकावी.
  • लसीकरण शक्‍यतो दिवसातील थंड वेळेत म्हणजे सकाळी किंवा सायंकाळी करावे.
  • लसीकरण हे निरोगी जनावरांना करावे.
  • लसीकरण करताना लसीकरणाची सुई प्रत्येक वेळी पाण्यात उकळून निर्जंतुक करून घ्यावी.
  • फोडलेल्या बाटलीतील लस तसेच साठवून पुन्हा वापरू नये.

 


लस योग्य जागेत व योग्य मार्ग द्वारे द्यावी, शक्यतो एकाच दिवशी सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.

          लसीकरणानंतर 'ही'दक्षता घेणे महत्त्वाचे

  • बैलांना लसीकरणानंतर एक आठवडा हलके काम द्यावे जेणेकरून शरीरावर ताण पडणार नाही.
  • उत्तम रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी चांगला आहार द्यावा.
  • लसीकरणानंतर जनावरांचे अति उष्ण व थंड वातावरणापासून संरक्षण करावे. तसेच त्यांची लांबवर वाहतूक टाळावी.
  • लसीकरणानंतर ताप अथवा प्रतिक्रिया काही अपाय घडू शकतात मात्र ते तात्कालिक व सौम्य स्वरूपाच्या असतात.  म्हणून वरील प्रकारे लसीकरण करताना जर काळजी घेतली तर लसीकरणाचे फायदे जास्तीत जास्त प्रमाणात दिसून येतात व त्याद्वारे होणारा अपाय ही टाळता येतो.

English Summary: Take care of these things while vaccinating cattle Published on: 09 August 2020, 04:24 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters