उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता असल्याने जनावरे चरत असताना आजूबाजूच्या वनस्पती खातात व त्यातून विषबाधा होण्याची शक्यता असते. जनावरांत होणारी वेगवेगळ्या पद्धतीची विषबाधा तसेच त्यात आढळणारी प्रमुख लक्षणे तसेच विषबाधा झाल्यानंतर करावयाचे उपचार याबाबत माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे.
1) हायड्रोसायनिक आम्लामुळे होणारी विषबाधा
- कारणे:
ज्वारीची कोवळी रोपे (प्राथमिक अवस्थेतील) आणि जवसाची रोपे तसेच खुरटी भांगलेली व उन्हामुळे (दुष्काळामुळे) बाधित वनस्पती खाल्यामुळे. - लक्षणे:
त्रासदायक तीव्र श्वासोछवास, पोटफुगी, रक्त व अन्तत्वचा लाल गडद होणे, स्नायूमध्ये वेदना, झटके, जनावर बैचेन होणे, मन वाकडी करणे, डोळे वाकडे करणे, कोठीपोटातील द्रव्याचा कडवट वास येणे. तसेच उपचार न केल्यास १ ते २ तासात मृत्यू होतो. - उपचार:
गाई व म्हशीमध्ये: १५ ग्रॅम सोडियम थायोसल्फेट+३ ग्रॅम सोडियम नायट्रेट+विशुद्ध पाणी २०० मिली इ.मानेच्या शिरेतून द्यावे.
शेळी व मेंढ्यामध्ये: १ ग्रॅम सोडियम नायट्रेट+३ ग्रॅम सोडियम थायोसल्फेट+विशुद्ध पाणी ५० मिली इ.मानेच्या शिरेतून द्यावे. वरील सर्व १ ते २ तासांच्या अंतराने पुन्हा पुन्हा द्यावे. तसेच सोडियम थायोसल्फेट ३० ते ६० ग्रॅम तोंडावाटे द्यावे. केओलीनचे द्रावण १०० मिली मोठ्या जनावरांत व ५० मिली लहान जनावरांत तोंडावाटे द्यावे. गरजेनुसार ६ ते ८ तासांनी परत परत द्यावे.
2) नायट्रेटची विषबाधा
- कारणे:
नजरचुकीने खालेली नायट्रेटयुक्त खते व शेती ओषधे तसेच नायट्रेटयुक्त वनस्पती व पाणी पिल्याने, खोल विहरीतील पाणी पिल्याने. - लक्षणे:
लाळ सुटणे, पोटात वेदना होणे, हगवण लागणे, त्रासदायक श्वासोछवास, अन्तत्वचा तपकिरी रंगाची होणे, रक्ताचा रंग चोकलेटी रंगाचा होणे, स्नायूमध्ये तीव्र वेदना, झटके तसेच उपचार न केल्यास २ ते ६ तासात मृत्यू होतो. - उपचार:
मिथीलीन ब्लु प्रति ४ ते ८ दर किलो वजनामागे १% द्रावण मानेच्या शिरेतून द्यावे. केओलीनचे द्रावण १०० मिली मोठ्या जनावरांत व ५० मिली लहान जनावरांत तोंडावाटे द्यावे. गरजेनुसार ६ ते ८ तासांनी परत परत द्यावे.
3) ऑक्झेलेटसची विषबाधा
- कारणे:
ऑक्झेलेट असलेली वनस्पती खाल्याने उदा. धोरकाकडा, ऊसाचे वाढे तसेच काळ्या बुरशीयुक्त वैरण खाण्यात आल्यामुळे. - लक्षणे:
भूक मंदावणे, अशक्तपणा, कोठीपोटाची हालचाल थांबणे, बद्धकोष्टता, थेंब थेंब लघवी होणे, तसेच जननेन्द्रियाच्या भोवती व मागील दोन्ही पायांच्या मधील जागा सुजणे. - उपचार:
संशयित खाद्य देणे त्वरित थांबवणे, चुनखळीयुक्त पाणी प्रति १.५ लिटर तोंडावाटे दिवसातून तीनदा द्यावे. कॅल्शियमची इंजेक्शने मानेच्या शिरेतून द्यावीत तसेच पचन सुधारक व भूकवाढीची पावडर तोंडावाटे द्यावी. केओलीनचे द्रावण १०० मिली मोठ्या जनावरांत व ५० मिली लहान जनावरांत तोंडावाटे द्यावे. गरजेनुसार ६ ते ८ तासांनी परत परत द्यावे.
4) युरियाची विषबाधा
- कारणे:
युरीयायुक्त खते नजरचुकीने खाल्याने तसेच खाद्यावर युरिया प्रक्रिया करताना जास्त युरिया वापरल्यास. - लक्षणे:
तीव्र पोटदुखी, शरीराचा तोल बिघडणे, स्नायूमध्ये वेदना, त्रासदायक श्वासोछवास, पोटदुखी, कन्हणे, ओरडणे तसेच पोटावर लाथा मारणे व जनावरच्या श्वासाला अमोनियाचा वास येतो. उपचार न केल्यास जनावर ३ ते ४ तासात दगावते. - उपचार:
व्हिनेगार किवा ५% असेटिक आम्ल २ ते ४ लिटर गाई किंवा म्हशीमध्ये तोंडावाटे पाजणे तसेच शेळी किवा मेंढीमध्ये दर ०.५ लिटर प्रमाणे तोंडावाटे पाजणे. तसेच कॅल्शियम व मॅग्नेशियम क्षार मानेच्या शिरेतून द्यावेत. वेळप्रसंगी कोठीपोटातील साका बाहेर काढणे. केओलीनचे द्रावण १०० मिली मोठ्या जनावरांत व ५० मिली लहान जनावरांत तोंडावाटे द्यावे. गरजेनुसार ६ ते ८ तासांनी परत परत द्यावे.
5) शिशाची विषबाधा
- कारणे:
शिसे चाटणे, तेलरंग चाटणे, वाहनांची बटरी तसेच शिस्याच्या गोळ्या व चेंडू खाणे. धातू शुद्धीकरणात कारखान्यामुळे दुषित झालेले गवत खाल्याने. - लक्षणे:
लक्षणे खालील ३ प्रकारात दिसतात.
प्राथमिक अवस्था: ओरडणे, झटके येणे, स्नायूंत वेदना, अतिउत्साह, आंधळेपणा, गोल गोल फिरणे, डोके भिंतीवर किंवा दगडावर जोरात दाबने, मज्जासंस्था बाद होणे व शेवटी जनावर दगावते.
द्वितीय अवस्था: बद्धकोष्टता दिसते किंवा जोरात हगवण लागते, उलट्या होतात तसेच तीव्र पोटदुखी होते.
तृतीय अवस्था: दातांत व हिरड्यात काळे निळे रंग उमटतात, जनावरांना हालचाल करताना त्रास होतो. लोहाची कमतरता होते व मादी जनावरात गर्भपात होतो. - उपचार:
कॅल्शियम ईडीटीए चे ६.६% द्रावण दर ७० मिलीग्रॅम दर किलो वजनानुसार दररोज मानेच्या शिरेतून २ ते ३ डोसमध्ये विभागून ३ ते ५ दिवस द्यावे. तसेच डायझेपामसारखी वेदनाशामक औषधे स्नायूंत द्यावीत.
9004361784
डॉ. बाळकृष्ण मुखेकर, डॉ. ऋतुराज राठोड
Share your comments