अकोला - सध्या अनेक शेतकरी आणि उच्च शिक्षित युवक शेळीपालनाकडे वळत आहेत. मांस आणि दूधाची वाढणारी मागणी पाहता अनेकजण या व्यवसायात गुंतवणूक करत आहेत. दरम्यान या व्यवसायाला अजून भरभराट येणार आहे. कारण आता शेळीमध्येही टेस्ट ट्युब बेबी करता येणार आहे.
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथील पशुप्रजनन,, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागामध्ये टेस्ट ट्यूब बेबी (इन व्हिट्र फर्टिलायझेशन) तंत्राचा वापर करुन शेळीमध्ये शरीरबाह्य फलन आणि भ्रूण निर्मितीबाबत यशस्वी संशोधन करण्यात आले. संस्थेच्या प्रक्षेत्रावर नुकताच एक शेळीने तीन करडांना जन्म दिला. सध्याच्या काळात शेळ्यांची उत्पादकता आणि आनुवंशकिता वेगाने वाढवायची असेल तर जैविक तंत्रज्ञानाचा वापर हा चांगला पर्याय आहे. या संशोधनाबाबत प्रकल्पाचे प्रमुख संशोध डॉ. चैतन्य पावशे यांनी सांगितले की शरीरबाह्य फलन आणि आणि भ्रमणनिर्मिती प्रयोगासाठी कत्तलखान्यातून शेळ्यांची बिजांडे आणली. त्यातील स्त्रीबीजकोषातून स्त्रीबीजे बाहेर काढली. त्यांना प्रयोगशाळ योग्य माध्यमातून परिपक्व करुन फलन माध्यमातून शुक्राणू सोबत फळवली गेले.
फलन माध्यामातून शुक्राणू टाकण्याआधी वीर्यातील नको असलेले घटक काढून त्यावर उपचार केल. योग्य तेच शुक्राणू फलन माध्यमातून स्त्रीबीजासोबत सोडण्यात आले. भ्रूण प्रत्यारोपक्षम होईपर्यंत दोन ते तीन दिवस प्रयोगशाळेत योग्य माध्यमातून इन्क्यूबेटरमध्ये ठेवण्यात आले. साधारणपणे ६० ते ७२ तासानंतरत ४ ते ८ पेशी असलेले भ्रूण शस्त्रक्रिया करुन प्रत्यारोपण भ्रूण दाई शेळीमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. भ्रूणाचा उर्वरित विकास हा शेळी मातेच्या गर्भाशयात करण्यात आला. भ्रूण प्रत्यारोपण करण्यासाठी दाई शेळ्यांची निवड पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराब देशमूख विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरुन करण्यात आली. प्रत्यारोपित केलेल्या शेळ्यांची गर्भ तपासणी करण्यात आली.
यामध्ये सहापैकी एका शेळीने १४ दिवसानंतर तीन करडांना जन्म दिला. शेळ्यांमधील शरीरबाह्य भ्रूणनिर्मिती मानकीकरणाचे संशोधन डॉ. चैतन्य पावशे आणि विद्यार्थी करत आहेत. या संशोधन प्रकल्पामध्ये पशु प्रजनन, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील विद्यार्थी डॉ. मेघा अम्बालकर डॉ. रुचिका सांगळे तसेच प्राध्यापक डॉ. श्याम देशमूख, डॉ. महेश इंगवले शस्त्रक्रिया वैजनाख काळे, प्रमोद पाटील, आदींनी या संशोधनात आपले योगदान दिले.
Share your comments