शेळी पालन हा एक फायदेशीर पैसे मिळवून देणारा व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात शेळीपालन वाढले आहे. कमी कष्टात यामध्ये चांगले पैसे मिळत आहेत. सरकारही अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहन देत आहे. आता सर्वात लहान जातीची शेळी पाळण्याची प्रथा शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे.
यामध्ये शेळ्यांना जास्त चारा देखील लागत नाही, तसेच जास्तीचे कष्ट देखील करावे लागत नाहीत. या शेळीच्या जातीचे नाव नायजेरियन ड्वार्फ (nigerian dwarf) आहे. हे दिसायला अगदी लहान असले तरी नफा देण्याच्या दृष्टीने इतर जातीच्या शेळ्यांपेक्षा खूपच चांगले आहे. यामुळे शेतकऱ्यांना हे फायदेशीर आहे. या शेळ्यांसाठी तुम्ही बांधलेले आवार अतिशय स्वच्छ असावे. वेंटिलेशन प्रणाली (ventilation system) आणि सांडपाण्याचा प्रवाह चांगला असावा. शेळ्यांना पुरेशा प्रमाणात पोषक आहार देण्याचा प्रयत्न करा.
या शेळ्यांना हिरव्या भाज्या (green vegetables) खाऊ घालणे खूप फायदेशीर आहे. पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करावे. या शेळ्यांचा प्रजनन दर इतरांपेक्षा जास्त असतो. ते वर्षभर प्रजनन करू शकतात. एक शेळी सरासरी 2 ते 4 पिलांना जन्म देते. ते साधारण ६ ते ७ महिन्यांत परिपक्व होतात आणि दूध देऊ लागतात. यामुळे इतर जातींपेक्षा ही जात फायदेशीर ठरते. या शेळ्या खूप मजबूत आणि कठोर प्राणी आहेत आणि त्यांची सहसा थोडी काळजी घ्यावी लागते.
बिग ब्रेकींग! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, भाजप आता राष्ट्रवादी फोडणार..
शेतकऱ्यांना कमी खर्चात या शेळ्यांचे संगोपन करून चांगला नफा मिळू शकतो. ही शेळी ही मांस आणि दूध उत्पादनासाठी (milk production) शेळीची सर्वोत्तम जात मानली जाते. दिवसभरात इतर जातीच्या शेळ्यांना जेवढा चार लागतो, त्यापेक्षा कमी चारा या शेळ्यांना लागतो. यामुळे अगदी कमी खर्चात कष्टात कमी गुंतवणूक करून तुम्ही तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.
एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी 5 कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश
इतर शेळ्यांच्या शरीराच्या आकाराच्या तुलनेत जास्त दूध उत्पादक आहेत. याशिवाय त्याचे मांसही बाजारात चांगल्या दराने विकले जाते. त्यांचे पालन करून शेतकरी बांधव दर महिन्याला बंपर नफा मिळवू शकतात. सध्या बाजारात मांसची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे यामध्ये शेतऱ्यांना कधी तोटा देखील सहन करावा लागणार नाही.
महत्वाच्या बातम्या;
१४ चा उतारा बसला आणि १० चा बसला तरी समान बाजारभाव का? कष्टकरी ऊस उत्पादकांवर होतोय अन्याय
रामराजे नाईक निंबाळकर भाजपमध्ये जाणार? सातारा जिल्ह्यातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
आता कांदा काढणी मशील ठरतेय फायदेशीर, शाहू अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची कमाल
Published on: 26 July 2022, 01:41 IST