1. पशुधन

महत्वाचे!बैलांमधील खांदे सूज आणि त्यावरील उपाय

शेती कामांमध्ये बैलांकडून जास्त प्रमाणात काम करून घेतल्यास त्यांना खांदेसूजहा आजार होतो.खांदे सूजी ही प्रमुख्याने मानेवरील जुमानेससतत घातल्यामुळे होते. शेतीमध्ये काम करीत असताना मानेचे कातडी जु व जू वाला असणारी खीळ यामध्ये दाबली जातेआणि खांदे सूजी होते. आपल्याकडे असणारी बैलजोडी ही अनेकदा कमी-जास्त उंचीची असते. त्यामुळे जनावरांच्या मानेवर ठेवले जाणारे जू हे समांतर राहत नाही. परिणामी जु हे तिरके सोडण्यात येते. त्यामुळे दोन्ही बैलांना खांदे सुजीचा आजार होतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
ox

ox

शेती कामांमध्ये बैलांकडून जास्त प्रमाणात काम करून घेतल्यास त्यांना खांदेसूजहा आजार होतो.खांदे सूजी ही प्रमुख्याने मानेवरील जुमानेससतत घातल्यामुळे होते. शेतीमध्ये काम करीत असताना मानेचे कातडी जु व जूवाला असणारी खीळ यामध्ये दाबली जातेआणि खांदे सूजी होते. आपल्याकडे असणारी बैलजोडी ही अनेकदा कमी-जास्त उंचीची असते. त्यामुळे जनावरांच्या मानेवर ठेवले जाणारे जू हे समांतर राहत नाही. परिणामी जु हे तिरके सोडण्यात येते. त्यामुळे दोन्ही बैलांना खांदे सुजीचा आजार होतो.

खांदेसूज ची लक्षणे

  • खांद्यावरील भागावर भयंकर सूज येते.
  • सुज ही खांद्याची कातडी व त्याखाली त्वचेच्या भागावर येते.
  • जु ओढताना खांद्याचे कातडी ही मागच्या बाजूस जोराने ओढली गेल्यामुळे कातडी खालील पडदा वेगळा होऊन त्वचेखाली रक्त साचते.
  • खांद्यावरील सूज गरम व अत्यंत वेदनादायी असते.
  • सुजेचा आकार हा लिंबू किंवा फुटबॉल एवढा असतो.
  • सुज मउ, पाणी असणारी ते कडक लागणारी असू शकते.
  • सुजे तून फुटून पाणी येऊ शकते.
  • खांदेस सूज आलेल्या बैलाला आराम दिल्यास सूज कमी होते कामाला जुपल्यास पुन्हा वाढते.
  • खांदे शूज झालेला बैल उपचाराविना कामास जुपल्यासकेल्यास कातडीवर लहान-लहान जखम होऊन बेंड तयार होते.

 

खांदे सुजीवर उपचार

  • खांदेसुजीची लक्षणे जनावरात दिसल्यास पशुवैद्यकाकडून उपचार करावा.
  • नुकत्याच झालेल्या खांदे सुजित सुजलेल्या भागावर चार ते पाच दिवस खांदे सूज कमी करणारे मलम लावावे.
  • ताज्या सुजीस बर्फाने तीन ते चार दिवस शेकावे.
  • मॅग्नेशियम सल्फेट, ग्लिसरीन मिसळून खांद्यावर लावल्यास नुकतीच आलेली सूज कमी होते.
  • जुन्या सुजी साठी गरम वाळू कपड्यात गुंडाळून चार ते पाच दिवस शेक द्यावा. गरम पाण्याने सुद्धा शेक दिला तरी चालतो.
  • शेख देताना जनावरास भाजणार  नाही याची खात्री करून घ्यावी. अन्यथा त्वचा भाजण्याची शक्यता अधिक असते. गरम पाणी किंवा भुस्सा यांचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा थोडे जास्त असावे. यासाठी गरम पाणी, वाळू, भुशाचा प्रथम आपण स्पर्श करून पहावा त्याचे तापमान कमी आहे याची खात्री होईल.
  • खांद्यावर आलेल्या गाठी मधून पु येत असेल तर पशुवैद्यकाकडून छोटी शस्त्रक्रिया करून घेऊन त्यातील पुकाढून टाकावा.आणि त्याचे रोज ड्रेसिंग करावे.
  • उपचार करत असणाऱ्या जनावरास कामात जुंपू नये आणि पूर्ण आराम द्यावा.
  • औषधोपचाराने जर खांद्यावरील गाठी कमी होत नसतील तर खांद्यावर पशुवैद्यकाकडून छोटीशी शस्त्रक्रिया करून त्या काढून टाकाव्यात त्यानंतर योग्य औषधोपचार व काळजी घ्यावी.
English Summary: shoulder swelling in ox symptoms and remedy Published on: 22 October 2021, 12:40 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters