Animal Husbandry

गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह देशात लम्पीच्या आजारामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत होते.

Updated on 09 November, 2022 12:17 PM IST

गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह देशात लम्पीच्या आजारामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत होते.

आता लम्पी चर्मरोगामुळे (Lumpy Diseases) मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3973 भरपाईची 10.23 कोटी इतकी रक्कम पशूपालकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. याबाबत पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी माहिती दिली. राज्यात बाधित पशुधनापैकी 14259 पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यामध्ये लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 97.88 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.

शेतकरी होणार करोडपती! महामार्ग शेतात आणि जमिनीला करोडोंचा भाव..

शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.

पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

लसीकरण न केलेल्या आणि लंपी चर्मरोगाने बाधित नसलेल्या गायींच्या वासरांना, तसेच लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. गोपालकांनी त्यांच्या गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पूर्वनिर्धारित केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही केले आहे.

महत्वाच्या बातम्या;
आता रेशनधारकांना अचूक धान्य मिळणार, मापात पाप होणार नाही, केंद्राचा मोठा निर्णय..
बातमी कामाची! आता पाचट जाळणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचे २ हजार
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार विहिरीसाठी वाढीव अनुदान

English Summary: Relief for farmers! 3973 deaths due to lumpy
Published on: 09 November 2022, 12:17 IST