कुठल्याही व्यवसायाचा किंवा उद्योगाचा विचार केला तर तो व्यवसाय आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी व्यवसायातील संधी कोणत्या आहेत, विक्रीचे व्यवस्थापन आणि व्यवसायाच्या उपयुक्ततेबद्दल सखोल आणि तंतोतंत माहिती असेल तर विक्रीचे व्यवस्थापन ठेवणे सोपे जाते. हेच तत्व शेळीपालन व्यवसायालाही लागू पडते. या व्यवसायामध्ये जर आपण योग्य आणि अचूक विक्री व्यवस्थापन केले तर आपल्याला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. या लेखात आपण शेळी पालनाच्या विक्री व्यवस्थापनाविषयी माहिती घेऊ.
शेळी पालनातील विक्री व्यवस्थापन
शेळीपालनातील विक्री व्यवस्थापनातील विविध संधी.
- मांसाची निर्यात
- बकरी ईद साठी बोकड तयार करणे
- फक्त मांसा साठी शेळीपालन
- दूध व दुधाच्या वेगवेगळ्या पदार्थांसाठी शेळी पालन करणे.
- शेळीच्या पैदाशीसाठी अथवा प्रदर्शनासाठी
- तसेच धुलीवंदन, गटारी अमावस्या, 31 डिसेंबर सारख्या दिवसांमध्ये मटणाला चांगली मागणी असते. पर्यायाने शेळ्यांना मागणी येते.
- तसेच लेंडी खतासाठी देखील शेळीपालन फायदेशीर ठरते.
शेळी पालन व्यवसाय मध्ये आपल्याला दिसून येते की ईद साठी बोकड विक्रेते शेळीपालन करताना दिसून येतात. पाण्यामध्ये होते उलटे की ईदच्या बाजारात बोकड यांची आवक वाढल्याने अपेक्षित भाव मिळत नाही व दुर्दैवाने बर्याचदा तोट्यात व्यवसाय येतो. जर आपण शेळी पालन करत असताना बाजारपेठेचा व्यवस्थित अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येते की, स्थानिक बाजारात एक वर्षाच्या आतले व 20 ते 25 किलोग्रॅम वजनाच्या बोकडाच्या मांसासाठी मागणी आहे. याचा उलट पाहिले तर ईदसाठी एक वर्षाच्या पुढच्या व जास्तीत जास्त वजन असणाऱ्या बोकडांची खरेदी केली जाते. याचा अर्थ इद साठी तयार केलेला बोकड ईदच्या बाजारात विकला गेला नाही तर पुढच्या इदपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते आणि याच ठिकाणी शेळी पालकाचा निर्णय चुकतो.
त्यामुळे आपल्याकडे जन्माला येणाऱ्या करडापैकी विक्री करण्यासाठी खालील प्रकारे नियोजन करावे.
- दहा ते 15 टक्के बोकड पैदाशीसाठी विकावेत.
- दहा ते 15 टक्के बोकड ईद साठी तयार करावे.
- 40 ते 50 टक्के बोकड स्थानिक बाजारात विक्रीसाठी तयार करावेत.
- बोकडांची विक्री करताना शक्यतो वजनानुसार अकरावी त्याकरता बोकडाचे वजन × प्रचलित मटणाचा दर/2 या सूत्राचा अवलंब करावा.
फायदेशीर शेळीपालनाचा मूलमंत्र
- शेळी पालन व्यवसाय सुरुवात करतांना सुरुवातीस जास्तीत जास्त वीस शेळ्या व एक बोकड
- दोन करडे देणारी गाभण स्थानिक शेळी निवडावी.
- चारा हा घरचा असावा व त्यासाठी योग्य नियोजन करावे.
- बकरी ईद व पैदास बोकड उत्पादन विक्री नियोजन
- बोकडाचे वजन वाढीवर विशेष लक्ष देणे.
- नियमित लसीकरण व जंतांची निर्मूलन करणे.
- स्वच्छ मटण निर्मिती व निर्यातीवर भर देणे.
- शेळ्यांचा विमा काढणे उपयुक्त असते.
- उपयोगी नसलेल्या शेळ्या कळपातून काढून टाकणे.
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या गॉट फार्मर स्वतः लक्ष ठेवणे.
Share your comments