व्यायला आलेल्या शेळ्यांसाठी गोठ्यामध्ये वेगळी जागा उपलब्ध असावी.
शेळी व्यायल्यानंतर व्यायलेली जागा स्वच्छ करून जंतुनाशकाची फवारणी करावी.
वार पडलेली असल्यास वारेची व्यवस्थित विल्हेवाट लावावी.
व्यायल्यानंतर शेळीचा मागचा भाग कोमट पाण्याने स्वच्छ धुवून काढावा त्यासाठी पाण्यामध्ये पोटॅशियम परमग्नेटचा वापर करावा.
लहान पिल्लांना शेळी जवळच ठेवावे लहान पिल्ले एकाचवेळी जास्त दुध पीणार नाहीत याची काळजी घ्यावी, जेणेकरून करडांना जुलाब होणार नाही.
व्यायल्यानंतर शेळीला ३ ते ४ दिवस गूळ पाणी द्यावे.
थंडीच्या काळामध्ये थंडीपासून शेळीचा बचाव करता येईल यासाठी उपाय योजना कराव्यात.
पशुपालक मित्रांनो शेळी व्यायल्यानंतर साधारणतः १२ ते १८ तासात वार आपोआप पडायला हवी.
शेळी व्यायल्यानंतर वार पडण्यास अधिक काळ लागल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा.
व्यायल्यानंतर शेळ्यांना ऊर्जेची आवश्यकता असते त्यामुळे शेळ्यांच्या आहारामध्ये ऊर्जायुक्त घटकांचा समावेश असावा.
त्यामध्ये कडधान्य, गूळ, मीठ, खनिज मिश्रण मिक्स करून खायला द्यावे.
व्यायलेल्या शेळ्यांचा आहार साधारणता इतर शेळ्यां पेक्षा अधिक असावा, त्यात खुराकाचे प्रमाण वाढवावे परंतु खुराक अचानक पणे वाढवू नये
खुराकाचे प्रमाण अचानक जास्त वाढल्यास पोटाचे विकार होऊ शकतात त्यासाठी खुराक विण्यापुर्वी एक आठवडा अगोदपासूनच चालू करावा व विल्यानंतर वाढवत जावा.
शेळीच्या शरीरातील ऊर्जेची गरज भागवण्यासाठी शेळीच्या आहारामध्ये गहू, भुसा, मका भरडाचा समावेश करावा.
पिण्यासाठी २४ तास पाणी उपलब्ध करून द्यावे
दूध काढतांना शेळ्यांना निर्जंतुक केलेला स्वच्छ जागेवर बांधावे.
दूध काढतेवेळी कास डेटॉलने धूवुन मग दूध काढावे, त्याचप्रमाणे दूध काढण्याआधी कासेवरील केस कापून स्वच्छ कोरड्या हाताने दूध काढावे.
दूध काढून झाल्यानंतर शेळीला खाण्यासाठी द्यावे जेणेकरून दूध काढून झाल्यानंतर शेळ्या खाली बसणार नाहीत, स्तनदाह म्हणजेच मस्टायटीस होण्याची शक्यता कमी होईल.
व्यायलेल्या शेळ्यांच्या आहारामध्ये वजनाच्या एक टक्के खुराक, दोन टक्के वाळलेला चारा, दीड टक्के हिरवा चारा, शुष्क प्रमाणात असावा.
आहारातील चारा दीड ते दोन सेंटिमीटरची कुट्टी करून म्हणजेच तुकडे करून द्यावा, जेणेकरून योग्य पचन होण्यास मदत होईल
साधारणतः ३० किलो वजनाच्या व्यायलेल्या शेळीसाठी एक लिटर दूध देत असल्यास ३५० ते ४०० ग्रॅम खुराक, १ ते २ किलो वाळलेला चारा, २ किलो एकदल वर्गीय, २ किलो द्विदलवर्गीय हिरवा चारा द्यायला हवा.
व्यायलेल्या शेळ्यांच्या दररोजच्या आहारामध्ये २० ते ३० ग्रॅम मिनरल मिक्स्चर असायला हवे.
वरील आहार व्यायल्यानंतर एक महिने द्यायला हवा, त्याचबरोबर वेळोवेळी जंतनाशक करून घ्यायला हवे.
शेळ्यांच्या दूध काढण्याच्या वेळा ठरलेल्या असाव्यात त्यानुसारच दूध काढावे.
दूध काढतांना शेळ्यांना खुराक द्यावा दूध काढून झाल्यानंतर हिरवा चारा द्यायला हवा.
व्यायलेल्या शेळ्यांना वेगळे ठेवून सुरवातीचे ८ दिवस करडांना सोबत ठेवावे, त्यानंतर दिवसातून २ ते ३ वेळा करडे शेळ्यांमध्ये सोडावे.
व्यायलेल्या शेळ्यांना सकाळी २ ते ३ तास कोवळ्या सूर्यप्रकाशात शेडच्या बाहेरील मोकळ्या जागेत सोडावे.
दर २ ते ३ दिवसांनी शेळ्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे.
कास धुतल्यानंतरच करडांना दूध पाजण्यासाठी सोडावे..
संकलन - प्रवीण सरवदे , कराड
Share your comments