
chicks
कुक्कुटपालन हा व्यवसाय अतिशय सोपा कमी खर्चात आणि कमी जागेत करता येऊ शकतो.आता सगळीकडे ब्रॉयलर कोंबड्या पाळण्याकडे कल दिसून येत आहे परंतु गावरान कोंबडी पालन हे हीतीतकेच फायदेशीर आहे.कुक्कुटपालनामध्ये सुरुवातीला लहान पिलांची काळजी घेणे व त्यांची व्यवस्थित निगा राखणे हे एक घराच्या पाया भक्कम करण्यासारखे आहे. या लेखात आपण एक दिवसाच्या पिल्लांची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती जाणून घेऊ.
कोंबड्यांच्या एक दिवसाच्या पिल्लांची काळजी कशी घ्यावी?
अंडी उबवणी केंद्रात व खाजगी हॅचरी मधून एक दिवसाचे पिल्लू बॉक्समध्ये पॅक करून दिली जातात. कधीही पिल्ले विकत घेताना ती व्यवस्थित पाहून घ्यावी म्हणजे ती पिल्ले सुदृढ, निरोगी आणि चपळ असावीत. तसेच त्या पिल्लांना पहिल्या दिवशी मरेक्स ही लसदिल्याची खात्री करावी.पिल्ले उबवण केंद्रातून फार्ममध्येआणत असताना जास्त हेलकावे न देता आणावेत फार्मर पोचल्यानंतर बॉक्स उघडून झालेले पिल्लांची मरतूक पहावी व मेलेली पिल्ले वेगळे काढावे. नंतर पिल्लांना एक लिटर उकळलेल्या पाण्यात 100 ग्रॅम गुळ किंवा इलेक्ट्रॉल पावडर मिक्स करून हे पाणी थंड करून पाजावे.
.पिल्लांची चोच दोन-तीन वेळापाण्यात बुडवून त्यांना पाणी पिण्यास शिकवावे.आणि नंतर नियंत्रित तापमान तयार केलेल्या ब्रुर्डर मध्ये सोडावे. गुळ पाण्याचे महत्व असे आहे की गूळ पाण्यामुळे पिल्लांच्या आतड्यात असणारा चिकट पदार्थ बाहेर येऊन पोट वाहण्यास मदत होते. तसे न झाल्यास विष्टेची जागा तुंबून मरतूकहोऊ शकते.
पील्ले फार्ममध्ये आल्यानंतर साधारण दहा चार तासानंतर मका भरडा किंवा तांदळाची कनी खाऊ घालावी. दुसऱ्या दिवशी चीक स्टार्टर हे खाद्यपदार्थ सुरू करावे.साधारण दहा 21 दिवसांपर्यंत ब्रूडींग करावे. त्यानंतर पिल्लांच्या अंगावर पिसे तयार होऊ लागताच ते स्वतःचा तापमान स्वतः नियंत्रित करतात. त्यानंतर काही दिवस पिल्ले शेडमध्ये सोडावेत आणि नंतर कंपाऊंडमध्ये मोकळी सोडावीत. पिल्लांना एक महिना पूर्ण झाल्यानंतर चेक फिनिशर हे खाद्यपदार्थ सुरू करावे.
पिल्लांची वाढीच्या अवस्था
वाढीच्या अवस्थेत पक्षांची वाढ किती होते हेपहाणे महत्वाचे असते. या अवस्थेमध्ये नर आणि मादी पक्षी वेगळे करावेत आणि अनावश्यक नर विकून टाकावेतकिंवा मांस उत्पादनाच्या दृष्टीने स्वतंत्र वाढवावी.या काळात योग्य शारीरिक वाढ अत्यंत महत्त्वाचे असते. या अवस्थेत त्यांना मुक्त संचार उपलब्ध करावेव ग्रॉवर फीड खाऊ घालावे ज्यात15 ते 16 टक्के प्रोटीन असेल. या काळात योग्य प्रमाणात खनिज मिश्रण आणि जीवनसत्त्वांचा पुरवठा करावा. कोंबड्यांना लसीकरण करताना लासोटा बूस्टर आणि फॉल्फॉक्स बुस्टरया लसी द्याव्या.
Share your comments