शेतकरी आणि पशु संगोपन एकमेकांना पूरक असे समीकरण आहे. गाई, म्हशी,शेळ्या आणि कुक्कुटपालन हे घरोघरी सांभाळून त्यातून शेतीला पूरक अर्थार्जनमिळते. यापैकी कुक्कुटपालन हे कमी जागेत करता येणाराव्यवसाय आहे आणि इतर व्यवसायात पेक्षा याला खर्चही कमी आहे.
जर आपण गावरान कोंबड्यांचा पालनाचा व्यवसाय केला तर आपल्या कमाईत वाढ होऊ शकते. या लेखात आपण अशाच उपयुक्त काही गावरान कोंबड्यांच्या जातींचा माहिती घेणार आहोत.
गावरान कोंबड्यांच्या महत्त्वाच्या आणि फायदेशीर प्रजाती
- ग्रामप्रिया-ही एक चांगली ब्रीड आहे.या जातीतील कोंबड्या 180 ते 200 अंडी देतात.
- देहलम रेड कोंबडी- या जातीच्या कोंबड्या दोनशे ते दोनशे वीस अंडी प्रत्येक वर्षाला देत असतात.
- गिरीराज कोंबडी- या जातीच्या कोंबड्या दोन महिन्यात एक किलो इतक्या वजनाच्या होत असतात. या कोंबड्या मांस विक्रीसाठी फायदेशीर ठरतात. अंडी उत्पादनासाठी या जातीच्या कोंबड्या मात्र थोडा इतर जातींपेक्षा आपल्याला महागड्या ठरतात. कारण या जातीच्या कोंबड्या एकाचक्रात दीडशे अंडी देत असतात.
- वनराज-या जातीच्या कोंबड्या दोन महिन्यात एक किलो वजनाच्या होत असतात. पण अंडी मात्र इतर जातींपेक्षा कमी देतात. एका वेतात 120 ते 160 अंडी देतात.
- कडकनाथ- जात सर्वाधिक प्रसिद्ध अशी जात आहे. त्या कोंबडी मध्ये औषधी गुणधर्म असल्याने या कोंबड्यांना विशेष मागणी असते. पण या जातीच्या कोंबड्या इतर जातीच्या तुलनेत कमी वेगात वजन वाढवत असतात.पाच महिन्यात या कोंबड्यांचे वजन फक्त एक किलो होत असते. तर एकाचक्रातह्या कोंबड्या फक्त साठ अंडी देतात.
- कुकुट पालन करत असताना जातीची निवड ही तुम्ही कोणत्या मार्केटसाठी व्यवसाय करू इच्छिता यावर अवलंबून आहे.
- आर आय आर-ही प्रजाती गावरान कोंबड्यांमध्ये प्रसिद्ध आहे.पण अंड्यांचे उत्पादन मात्र उशिरा सुरू होते. गावरान अंड्यांना बाजारातआणि रिटेल विक्री अधिक दर मिळत असतो. ही कोंबडी आपल्या एका चक्रात 220 ते 250 अंडी देत असते.
- ब्लॅक अस्ट्रालॉर्प-या प्रजातीची कोंबडी तीन महिन्यात दोन किलोपर्यंत वजन वाढवत असते.अंडी उत्पादनासाठी हे ब्रीड चांगले आहे.परंतु आर आय आर कोंबडी पेक्षामात्र कमी अंडी देते.या प्रजातीची कोंबडी एका चक्रात 160 ते 200 अंडी देत असते.
Share your comments