प्रमुख्याने ग्रामीण भागातील पशुपालक दूध व्यवसाय हा जोडधंदा म्हणून करत असतात. या व्यवसायाला मुख्य व्यवसाय म्हणून स्वीकारले तर प्रत्येक शेतकरी चार चाकी गाडी मधून नक्कीच फिरू शकतो.पण त्यासाठी गरज आहे आधुनिक माहिती आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून दूध व्यवसायातील महत्त्वाचा पाया असलेल्या गोठा उभारणी हे फार महत्वाचे असते.
ह्याच्या व्यवस्थापनामध्ये जनावरांचे आरोग्य व शरीरस्वास्थ्य कसे राहील तसेच गोठ्यामध्ये मजूर कसे कमी होतीललागतील, कमी खर्चात चांगला गोठा कसा बांधता येईल तसेच आपण किती जनावरे पाळू शकतो इत्यादी बर्याच गोष्टींचा विचार गोठा बांधणीमध्ये आवश्यक आहे. या लेखात आपण पंजाबच्या पशुपालकांचे बहुउद्देशीय मुक्त संचार गोठा तंत्रज्ञान बद्दल जाणून घेणार आहोत.
काय आहे हे तंत्रज्ञान?
- यामध्येकालवडींचे,वासरांचे तसेच दुधाळ आणि गाभण गाईचे कप्पे वेगळे असतात.
- या गोठ्यामध्ये 24 तास स्वच्छ थंड व गरम पिण्याच्या पाण्याची सोय असते.
- स्वच्छ, निर्जंतुक दूध वाढवण्यासाठी पशुपालक मिल्किंग पार्लरचा वापर करतात.
- दूध काढल्यानंतर गाईंना कासदाह आजार होऊ नये म्हणून टिटडिपिंग केले जाते.
- उन्हाळ्यामध्ये जनावरांचे तापमान नियंत्रित करण्यासाठी फॉगर सिस्टिम वापरली जाते.
- हिवाळ्यामध्ये जनावरांचे थंडीपासून संरक्षण व्हावे त्यामुळे शेडच्या अवतीभवतीगोणपाटाच्या आच्छादन केले जाते.
- या गोठ्याची रचना आणि निर्मिती दक्षिण उत्तर असते व त्यांची उंची 25 ते 30 पर्यंत असते.जेणेकरून गोठ्यामध्ये हवा खेळती राहते.
- या गोठ्या साठी वापरण्यात येणारी पत्रे सिमेंटचे असतातव त्यावर सोन्याचा मुलामा दिला असल्याने गोठ्यातील तापमान नियंत्रित राहते व जनावरे धापादेत नाहीत.
- जनावरांना खरारा करण्यासाठी ग्रूमिंग ब्रशचा वापर करतात.
- जनावरांचे केस जास्त वाढले असतील तर ट्रिमिंग करतात त्यामुळे शरीराचा मसाज होतो आणि जनावर तजेलदार दिसते.
- जनावरांच्या तोंडाला मोरखी, गळ्यात कंडातसेच पायात दोरीवगैरे बांधलेली नसते तर त्या जागीटॅगलावली जातात. यामध्ये जनावरांचे सगळी माहिती असते.
- लहान वासरांचा सिंग कळ्या लवकरच कुठल्या जातात तसेच वाढलेली खुरे वेळेवर कापले जातात.
- उन्हाळ्यात वातावरण थंड राहण्यासाठी मोठमोठे फॅन लावलेले असतात.
- धार काढणे आधी सर्व जनावरे धुऊन मिल्किंग पार्लर मध्ये येतात..
- प्रत्येक महिन्यानुसार मुरघासाची बंकर तयार केले जातात.
- वर्षभर पुरेल एवढा मुरघास साठा करून ठेवतात.
- पशु आहार तयार करण्यासाठी स्वतंत्र फिड मिलचीदेखील व्यवस्था असते.जनावरांच्या वाढीनुसार,कालवडींचा व वासरांचा तसेच दुधाळ जनावरांचा हंगामानुसार आहार तयार करतातत्यामुळे अधिक दूध उत्पादनात मदत होते.
- जनावरांच्या वजनानुसार खाद्य दिले जाते.
- सर्व प्रकारच्या गोळ्या,औषधे व खनिज मिश्रण यांचेवेगवेगळे विभाग असतात.
- दर तीन महिन्यांनी लसीकरणाची मोहीम राबवत आहोत जेणेकरून गोठ्यात आजार होणारच नाही.
- दुधाचे फॅट तपासण्यासाठी फॅट मशीन चा वापर करतात.
- जनावरांना संतुलित आहार उपलब्ध व्हावा यासाठी टोटल मिक्स राशन पद्धतीचा वापर करतात.
- त्याच्या आहार नियोजन हे पशू आहार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने करतात.
- जास्त वयाची जनावरे विकून टाकतात.
- गोठ्यातील जास्तीत जास्त कामेयंत्राच्या साहाय्याने केले जातात.
- गोठ्याच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी फार्ममॅनेजर तसेच मजूर असतात.
- गाईच्या दूध उत्पादनावर गाईच्या विक्रीचा दर ठरतो.
- गाई-म्हशींना विण्यासाठी प्रसूतिगृह तसेच आजारी जनावरांसाठी वेगवेगळे कंपार्टमेंट असतात.
Share your comments