अधिक दुग्धोत्पादनासाठी मुरघास तंत्र फायदेशीर. चारा अडचणीवर मात करण्याचा मुरघास रामबाण उपाय आहे. तसेच मुरघास केल्यास शेतकऱ्यांना जास्तीचे कष्ट देखील करावे लागत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होतो. मुरघास तयार करण्यासाठी लागणारी चारा पिके व त्यांची निवड करणे यावर सगळं गणित अवलंबून असते.
• चाऱ्याची पौष्टिकता टिकवून ठेवण्यासाठी हवाबंद साठवणूक करण्याच्या प्रक्रियेला मुरघास म्हणतात.
• मुरघास पिकांची निवड करताना पिके लवकर फुलोऱ्यात येणारे व लवकर तयार होणारे असावे.
• मूरघास करण्यासाठी एकदल पिकांची निवड करावी कारण, त्यामध्ये साखरेचे प्रमाण व कर्बोदके जास्त असतात त्यामुळे आंबवण्याची प्रक्रिया चांगली होते.
• सर्व हिरव्या चाऱ्याचा मूरघास तयार करता येतो. तृणधान्य वर्गात मका, ज्वारी, बाजरी या पिकांचा समावेश होतो.
• ज्वारी आणि मका तर उत्तमच परंतु उसाचे वाढे, नागली, बाजरी, गिनी गवत, हत्तीगवत, पॅरा गवत इत्यादी चारा पिकापासून ही चांगला मुरघास तयार करता येतो.
• चारा पिकाची कापणी करताना त्यातील पाण्याचे प्रमाण ६५ ते ७० % असावे.
मुख्यमंत्री साहेब, आम्ही बिहारमध्ये राहतो का? शेतकऱ्याचे रक्ताने लिहिलेले पत्र व्हायरल..
चारा पीक कापणी ची योग्य वेळ
• मका ५० % पीक फुलोऱ्यामध्ये आल्यानंतर म्हणजेच पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी कापणी करावी.
• ज्वारी ५०% पीक फुलोऱ्यात आल्यानंतर पेरणीनंतर ५० ते ६० दिवसांनी कापणी करावी.
• बाजरी ३०-४०% पीक फुलोऱ्यात आल्यानंतर पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी कापणी करावी.
• बहुवर्षीय वैरण पीके: संकरित जाती गवताच्या प्रजाती यशवंत, जयवंत, गुणवंत, संपूर्ण इत्यादी सर्वसाधारण पहिली कापणी ६० ते ७० दिवसांनी व त्यानंतरच्या कापण्या ३० ते ४० दिवसांनी कराव्या.
चांगला मुरघास कसा ओळखावा?
• तयार झालेल्या चांगल्या मुरघासाचा वास आंबट-गोड येतो.
• फिक्कट हिरवा किंवा तपकिरी रंग दिसतो.
• उत्तम मुरघासाचा सामू (पी. एच.) ३.५ ते ४.५ असतो.
• काळा पडलेला सडलेला बुरशीयुक्त मुरघास हा निकृष्ट प्रतीचा मानला जातो.
जनावरांना मूरघास किती व कसा खाऊ घालावा?
• उग्र वास येणारा काळसर, करड्या रंगाचा मूरघास कमी प्रतीचा समजावा.
• सुरुवातीला जनावरांना सवय होईपर्यंत मुरघास इतर खाद्यातून थोडा मिसळून द्यावा.
• दुभत्या जनावरांना दररोज १० ते १५ किलो मूरघास खाऊ घालावा. बैलांना ७ ते ८ किलो पेक्षा जास्त देऊ नये.
• वासरांना त्यांच्या वयोमानाप्रमाणे मूरघास द्यावा.
• दुभत्या जनावरांना नेहमी धार काढल्यानंतर मूरघास द्यावा, नाहीतर दुधास आंबट वास येतो.
लम्पीरोग झालेल्या गाई म्हशींचे दूध प्यावे का? दुधाबाबतच्या अफवेला आलाय ऊत...
मुरघासचे मका उत्पादकांसाठी फायदे-
• ८० ते ९० दिवसात मका काढणी.
• त्वरित दुसरे पीक घेण्याची संधी.
• काढणी व कुट्टी मजुरी शुल्कात बचत.
• अधिकाधिक फायद्याचे मका उत्पादन.
लेखक,
• सोनाली म.पाटील
• विषय विशेषज्ञ (पशु विज्ञान) कृषी विज्ञान केंद्र तडसर, ता.कडेगाव जि.सांगली
• नितीन रा.पिसाळ
• प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
• धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
महत्वाच्या बातम्या;
कांद्याच्या दरात घसरण, तरीही राज्यात मोठ्या प्रमाणावर लागवड
लम्पी रोगानंतर शेतातही आला चायनीज व्हायरस, शेतकऱ्यांनी पिके केली नष्ट
साखरेची किमान विक्री किंमत 3100 वरून 3600 रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी, कारखान्यांना अतिरिक्त बँक कर्ज मिळेल..
Share your comments