Animal Husbandry

भारतातील बरेच शेतकरी शेतीसोबत पशुपालन व्यवसाय करीत असतात. विशेषता पशुपालन व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळतात. या व्यवसायातून शेतकऱ्यांना 12 महीने चांगली कमाई होऊ शकते.

Updated on 19 October, 2022 4:20 PM IST

भारतातील बरेच शेतकरी शेतीसोबत पशुपालन व्यवसाय (Animal husbandry business) करीत असतात. विशेषता पशुपालन व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळतात. या व्यवसायातून शेतकऱ्यांना 12 महीने चांगली कमाई होऊ शकते.

त्यामुळे आज आपण शेळी, म्हैस आणि गाय यांसारख्या प्राण्यांच्या (Cattle Breeds) जातींची (Top Animals Breeds) माहिती जाणून घेणार आहोत. ज्या व्यवसायामधून शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.

१) देशात शेळीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. शेळीपालन व्यवसायाला (Goat rearing business) शासनाकडून अनेक योजना आणि अनुदानही दिले जाते. पशुपालक शेळीच्या दुधापासून तसेच त्याच्या मांसापासून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. त्यामुळे आज आपण शेळीच्या महत्वाच्या जातीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याच्या पालनाने शेतकरी चांगले उत्पादन मिळवू शकतात.

शेळीच्या जाती

ब्लॅक बेंगाल, बारबरी,बीटल,सिरोही,अत्तापडी काला,चंगथगी,चेगु,गड्डी,गंजम

शेतकऱ्याची कमाल! बिबीएफ तंत्राद्वारे घेतोय लाखों रुपयांमध्ये उत्पन्न; जाणून घ्या पद्धती

२) शेतकऱ्यांचे आवडते म्हैस पालन दुसऱ्या क्रमांकावर येते. त्यांत कमी गुंतवणुकीतच शेतकऱ्यांना (farmers) भरपूर फायदा होतो. कारण म्हशीचे दूध भरपूर विकले जाते. काळाच्या ओघात दुधाची मागणी मोठ्या (Top Animals Breeds) प्रमाणात वाढत आहे. कारण म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण खूप जास्त असते.

म्हैशीच्या जाती

मुर्रा,सुरती,जाफराबादी,मेहसाना,भदावरी,गोदावरी,नागपुरी,सांभलपुरी,तराई,टोड़ा,साथकनारा

शेतकऱ्यांनो जनावरांना योग्य आहार देऊन वाढवा रोगप्रतिकारक्षमता; होईल चांगला फायदा

३) शेतकरी गाईचे संगोपन मोठ्या प्रमाणात करीत असतात. गाईच्या दुधापासून अनेक प्रकारची उत्पादनेही तयार केली जातात. आज आपण शेतकरी पाळू शकणाऱ्या महत्वाच्या गाईच्या जातीविषयी माहिती जाणून घेऊया.

गायीच्या जाती

साहिवाल गाय,रेड सिंधी गाय,कांकरेज गाय,मालवी गाय,नागौरी गाय,थारपारकर गाय,पोंवर गाय,भगनाड़ी गाय,दज्जल गाय,गावलाव गाय हरियाना गाय,अंगोल या नीलोर गाय, राठी गाय,गीर गाय,देवनी गाय, नीमाड़ी गाय.

महत्वाच्या बातम्या 
दिलासादायक! सांगली जिल्ह्यातील 61 हजार शेतकऱ्यांना उद्या मिळणार प्रोत्साहन अनुदान
रब्बी हंगामासाठी नवीन ज्वारीचे वाण विकसित; शेतकऱ्यांना होणार दुहेरी
एलआयसीची नवीन पॉलिसी लाँच; 15 वर्षांनंतर तब्बल 22 लाखांचा लाइफ कव्हर मिळणार

English Summary: Farmer friends follow these breeds cow buffalo goat big benefit
Published on: 19 October 2022, 04:13 IST