Animal Husbandry

धार काढताना सुरुवातीच्या दुधात फॅट कमी असते ते माणसाच्या व वासराच्या आरोग्यासाठी ही चांगले असते. सुरुवातीचे प्रत्येक सडातील थोडे थोडे दूध घरी व वासरासाठी ठेवावे त्यानंतरचे व शेवटचे दूध एकत्रितरित्या दूध संस्थेस पाठवावे. शेवटच्या काही चिळांमध्ये २० ते ३० % पर्यंत फॅट (स्निग्धांश) असते त्यामुळे हे दूध आवर्जून काढावे.

Updated on 28 June, 2022 5:45 PM IST

धार काढताना सुरुवातीच्या दुधात फॅट कमी असते ते माणसाच्या व वासराच्या आरोग्यासाठी ही चांगले असते.
• सुरुवातीचे प्रत्येक सडातील थोडे थोडे दूध घरी व वासरासाठी ठेवावे त्यानंतरचे व शेवटचे दूध एकत्रितरित्या दूध संस्थेस पाठवावे.
• शेवटच्या काही चिळांमध्ये २० ते ३० % पर्यंत फॅट (स्निग्धांश) असते त्यामुळे हे दूध आवर्जून काढावे.

शेवटचे दूध वासरास पाजू नये नाहीतर अपचन होवुन वासरास पांढरी हगवण लागते व वासरे अशक्त होऊन मरतात
• वासराचा मृत्यूदर कमी करणे व आपला फायदा वाढविण्याकरिता योग्य प्रमाणातच वासराला दूध पाजावे जनावराची वाढ चांगली होईल म्हणून जास्त दुध पाजू नये.

• धार काढल्यानंतर दूध थंड ठिकाणी ठेवावे जेणेकरून करून ते लवकर खराब होणार नाही.
• दूध संकलन केंद्राकडे नेताना आदळ-आपट होणार नाही याची काळजी घ्यावी.
• घरी वजन करूनच दूध संकलन केंद्राकडे पाठवावे म्हणजेच वजनाबाबत असणारी शंका दूर होईल.
• दूध रॉकेल डिझेलच्या शेजारी ठेवू नये वास लागण्याची शक्यता असते.

एकीकडे आमदार फरार मात्र हा आमदार थेट पेरणीच्या औतावर, फोटो व्हायरल

कॅन मधील दूध हे संकलन केंद्रावर ओतल्यानंतर टोपणात दूध घेऊन विसळून टाकावे कारण टोपणात फॅट जमा झालेली असते.
• दुधात पाणी, सोडा, डालडा, साखर, निरमा मिसळू नये आपल्या दुधात भेसळ आढळून आल्यास कायदेशीर दंड होऊ शकतो.
• दूध घालताना आपल्याच नावावर त्याची नोंद होत आहे का त्याची काळजी घ्यावी कारण दररोज चा विश्वास एखाद्या वेळी तोटा आणू शकतो.


• दूध घातल्यानंतर ऑनलाईन नोंद व्यायला हवी किंवा किती लिटर दुध घातले त्याला किती भाव मिळाला ह्याचा मेसेज मोबाईल वर यायला हवा.
• आपले दूध दुसऱ्या पशुपालकाच्या कॅन मध्ये घेऊन संकलन केंद्रावर नेऊ नये कारण दूध खराब होण्याची शक्यता असते.

आसाममध्ये पुराचा हाहाकार! 50 लाख लोक बाधित, मंत्री मात्र ठेवत आहेत बंडखोर आमदारांवर लक्ष

दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोअर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा...
 लिंक -https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=XXPBY3

लेखक-
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
ईमेल-nitinpisal94@gmail.com

महत्वाच्या बातम्या;
काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल सगळं ओके!! सकाळी स्पा, मसाज, जीम; आमदारांचा दिनक्रम ऐकून व्हाल चकीत
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नाही ५० हजार रुपयांचे अनुदान? वाचा अटी
महाराष्ट्रातील तरुणाने भरला राष्ट्रपती पदासाठी अर्ज, चर्चांना उधाण...

English Summary: Do you take care of this while milking the dairy? Will benefit ..
Published on: 28 June 2022, 05:45 IST