सध्या मत्स्य पालन व्यवसाय हा आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत आहेत. या मच्छ शेती मध्ये बायोफ्लॉक तंत्रज्ञान हे फारच उपयुक्त आहे. या लेखात आपण मत्स्य पालनातील उपयुक्त बायॉफ्लोक तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेऊ.
मत्स्य पालनातील बायॉफ्लोक तंत्रज्ञान
बायो फ्लॉक म्हणजे शैवाल, जिवाणू, प्रोटोझोनस आणि इतर सेंद्रिय पदार्थ यांचा एकत्रित पुंजका. मत्स्यसंवर्धन करत असताना मलमूत्र, न खाल्लेले खाद्य आणि अमोनियाच्या स्वरूपात नत्रयुक्त कचरा तयार होतो. यामध्ये कर्ब आणि नत्राचे प्रमाण दहा च्या वर आपले जाते. तेव्हा हा नायट्रोजन युक्त कचरा परपोषी ते जीवाणू द्वारे वापरला जातो. हे जिवाणू श्लेष्मचिकट द्रव्य तयार करतात. त्यामुळे या जीवाणूंचा एकत्रित फोनच का तयार होतो. हा सूक्ष्मजैविक फ्लॉकप्राणी प्लवंग सजीवांसाठी अन्न म्हणून वापरले जाते. वायुवीजन चा वापर करून हे फ्लॉकनेहमी तरंगत ठेवले जातात. अशाप्रकारे मत्स्यसंवर्धन करत असताना तयार होणारा हा कचरा संवर्धन युक्त माशांसाठी खाद्यम्हणून वापरला जातो.
बायोफ्लॉक निर्मिती तंत्र
तलावाचे तयारी
- बायॉफ्लोक तंत्रज्ञानाद्वारे मत्स्यपालन करण्यासाठी पॉलिथिन आच्छादिततलाव शिवा सिमेंटचे तलाव यांचा वापर करावा.
- सुरुवात करताना तलावांमध्ये पन्नास टक्के एवढे पाणी भरावे. इतर मत्स्यसंवर्धन या तलावातून काढलेली माती हे विरजण म्हणून 50 किलो प्रति हेक्टर ( पाच किलो / टन ) या प्रमाणात मिसळावे.फ्लॉकच्या जलद उत्पादनासाठी प्रतिहेक्टरी पाच ते दहा किलो या दराने नायट्रोजन आणि कर्ब स्त्रोत म्हणून मळी किंवा साखर मिसळावी.
वायुविजन
- पाण्यामध्ये फ्लॉक तरंगत ठेवण्यासाठी ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि गाळ काढण्याच्या मार्गा जवळ गाळ केंद्रित करण्यासाठी योग्य प्रमाणात ऐरीॲटर्सचावापर केला जातो.
- वायु वीजन साठी पेडल व्हील,सबमर्सिबल पंप, एअर ब्लॉवर जोडलेला नोझल किंवा छिद्रित पाईप यांचा वापर केला जातो.
फ्लॉकची पातळी व गाळ काढणे
- फ्लॉगची इष्टतम पातळी ही संवर्धन योग्य माशांच्या जातीनुसार भिन्न आहे.
- कोळंबीच्या संवर्धनासाठी फ्लॉग ची पातळी ही 10 ते 15 मिली/ लिटर या प्रमाणात तर तिलापिया माशाकरिता पातळीही 25 ते 50 मिली/लिटर या प्रमाणात ठेवली जाते.
- कालांतराने फ्लॉकचा आकार वाढतो. ते जड होऊन तळाशी स्थिर होतात यामुळे अन एरोबिक विघटन होऊन हानिकारक वायू तयार होतात आणि त्यामुळे माशांवर ताण पडतो म्हणून तलावांमधून हा गाळ मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ड्रेन पाइपमधून गाळ पंपाच्या साहाय्याने किंवा गुरुत्वाकर्षणात द्वारे नियमितपणे काढला जातो. (संदर्भ-ॲग्रोवन)
Share your comments