शेतकरी शेतीसोबत अनेक जोडव्यवसाय करीत असतात, ज्यामधून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. यामधील मुख्य व्यवसाय म्हणजे पशुपालन व्यवसाय. या व्यवसायातून शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. त्यामुळे आज आपण शेतकऱ्यांना उपयुक्त पडणाऱ्या टॉप देशी गायींच्या जातीविषयी माहिती जाणून घेऊया.
भारतात गाय आधारित नैसर्गिक शेतीची लोकप्रियता वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पादन तर मिळतेच, पण शेतकरी गायपालन मधूनही चांगले उत्पन्न मिळवत आहेत. महत्वाचे म्हणजे बाजारात फक्त गाईच्या दुधालाच नाही तर पनीर, दही, मावा आणि गाईच्या दुधापासून बनवलेले, शेण आणि गोमूत्रलाही मोठी मागणी आहे.
देशी गाईच्या सुधारित जाती
भारतात देशी गायीच्या अनेक जाती पाळल्या जातात परंतु काही जातींनी ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे. या जातींमध्ये साहिवाल गाय, गावलाव गाय, गीर गाय, थारपारकर गाय आणि लाल सिंधी गाय यांचा समावेश आहे. आज आपण या जातीविषयी माहिती जाणून घेऊया.
शेतकऱ्यांनो पुढचे 2 दिवस पावसाचा जोर कायम; कापूस, तूर, भुईमूग पिकांची अशी घ्या काळजी
1) साहिवाल गायी
साहिवाल गायीचा रंग लाल आणि पोत लांब असतो. लांब कपाळ आणि लहान शिंगे इतर गायींपेक्षा वेगळे करतात. सैल शरीर आणि जड वजन असलेल्या या जातीची एका वासरात 2500 ते 3000 लिटर दूध उत्पादन करण्याची क्षमता आहे. शेतकऱ्यांना या गाईचे पालन नफ्याचे ठरेल.
2) गीर गाय
पालन गुजरातच्या गीर जंगलातील गीर गायीची लोकप्रियता जगभरात पसरली आहे. गुजराती जातीची ही गाय एका वासरात 1500-1700 लिटर दूध देते. मध्यम शरीर आणि लांब शेपटी असते. गीर गायीच्या शरीरावर ठिपके असतात, त्यामुळे ती ओळखणे सोपे जाते. या गाईचे पालन बरेच शेतकरी करीत आहेत.
3) लाल सिंधी
विशेष म्हणजे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील लाल सिंधी गाय ही आज उत्तर भारतातील पशुपालकांसाठी उत्पन्नाचे साधन बनली आहे. लाल रंगाची आणि रुंद कपाल असलेली ही गाय एका वासरात 1600-1700 लिटर दूध देऊ शकते.
आनंदाची बातमी; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ४८ लाख ४९ हजार रुपयांचा निधी वाटप
4) गावलाव गाय
महत्वाचे म्हणजे या जातीची गाय साधारणपणे सातपुड्याच्या सखल भागात आढळते, जी चांगल्या प्रमाणात दूध देते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील वर्धा, छिंदवाडा, नागपूर, सिवनी आणि बहियार येथे गाय पाळण्याची प्रथा आहे. पांढरा रंग आणि मध्यम आकाराची ही गाय अतिशय चपळ असून, कान उंच करून चालते.
5) थारपारकर गाय
आपण पाहिले तर थारपारकर गाय ही उत्कृष्ट दूध उत्पादन क्षमतेसाठी ओळखली जाते. कच्छ, जैसलमेर, जोधपूर आणि सिंधच्या दक्षिण-पश्चिम वाळवंटातील ही गाय कमी काळजी आणि कमी आहारात जगते. थारपारकर गायी या दुग्धोत्पादक आहेत तसेच त्यांच्या खाकी, तपकिरी किंवा पांढर्या रंगामुळे त्यांना इतर गायींपेक्षा वेगळी ओळख मिळते.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो पुढचे 2 दिवस पावसाचा जोर कायम; कापूस, तूर, भुईमूग पिकांची अशी घ्या काळजी
दिवसा झोपल्याने खरंच नुकसान होते का? वाचा आयुर्वेदातील महत्वाच्या गोष्टी...
LIC च्या नवीन पेन्शन योजने संबंधित खास 10 महत्वाच्या गोष्टी; जाणून घ्या
Share your comments