केंद्र सरकारने सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आणि तंत्रज्ञान तसेच नवनव्या पिकांच्या जाती विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या अशा नवनवीन पिकांमध्ये चिया सीड्स हे पीक मोठी भूमिका बजावू शकते.चिया बियाणे पिकाला सुपरफुड देखील म्हटले जाते. या लेखात आपण चिया बियाणे विषयी माहिती घेऊ.
चिया सीड्सची माहिती
चिया सीड्स प्रामुख्याने फुलांचे रोप आहे.एपिक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व घाटे ग्वाटेमाला येथील आहे. गेल्या काही वर्षापासून या बियाण्याची लागवड भारतात होत आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर आणि निमचया जिल्ह्यांमध्ये आणि इतर काही भागात शेतकरी त्याची लागवड करत असून त्याचा प्रसार आता इतर राज्यांमध्ये देखील होत आहे.चिया बियाणे चे वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून अधिक नफा आणि कमी खर्चअसल्यामुळे बरेच शेतकऱ्यांचा कल आता याकडे वळतांनादिसत आहे. आरोग्याच्या दृष्टीने जागरूक असलेल्या देशांमध्ये चिया बियाण्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. भारतात तामिळनाडू आणि राजस्थान व्यतिरिक्त इतर अनेक राज्यांमध्ये देखील शेतकरीयाची लागवड करत आहेत.
चिया बियाण्याची शेतीची पद्धत
याची लागवड पूर्णपणे सेंद्रिय आणि सोपी आहे. चिया बियाण्याची पेरणी दोन प्रकारे करतात. सुमारे एक ते दीड किलो बियाण्याची फवारणी तंत्राद्वारे एक एकर शेतात पेरणी करता येते.दुसरी पद्धत म्हणजेचिया बियाण्याची रोपे तयार करतात व नंतर त्यांची पुनर्लागवड करतात. प्रथम नर्सरीमध्ये याची रोपे तयार केली जातात व नंतर भारतासारखी याची लागवड केली जाते. जर या पद्धतीने लागवड केली तर एका एकरात अर्धा किलो बियाणे वापरले जाते. फवारणीच्या पद्धतीमध्ये कष्ट कमी आणि बियाणे जास्त लागते तर लागवड पद्धतीमध्ये जादा कष्ट करावे लागतात.
लागणारी आवश्यक जमीन
या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम तापमान आवश्यक असते.थंड हवामान आणि डोंगराळ भाग वगळता संपूर्ण भारतात याची लागवड करता येते. कृषी तज्ञांच्या मते या बियाण्याचे उत्पादन तपकिरी मातीत चांगले येते.चिया बियाण्याचे उत्पादन चांगले व्हावे यासाठी शेताची चांगली मशागत करणे गरजेचे असते. लागवडीपूर्वी पहिल्यांदा दोन किंवा तीन वेळा नांगरणी करून माती बारीक करून घ्यावी.चिया बियाण्यांच्या पेरणीसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिना हीचांगली वेळ समजली जाते. चांगल्या उत्पादनासाठी खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवणे आवश्यक असते. चिया बियाणे हे फक्त 110 ते 115 दिवसांत तयार होते.सिंचनासाठी विशेष आवश्यकता नसते.चिया बियाणे ची रोपे कमजोर असल्याने शेतात पाणी साचले तर ते कोलमडण्याची भीती असते. त्यामुळे पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन या बियाण्याच्या लागवडीसाठी अधिक चांगले मानले जाते.
प्राण्यांपासून धोका नाही
चिया बियाणे वनस्पतीस एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. त्याच्या पानांवर केस वाढतात त्यामुळे प्राणी त्यापासून दूर राहतात आणि पिकाला हानी पोहोचत नाहीत. त्यामुळे प्राण्यांपासून होणारे नुकसान टळते.
काढणी पद्धत
चिया बियाण्याचे काढणेही पीक उपटून केली जाते.यानंतर हे पीक वाळवले जाते आणि मळणी द्वारे बियाणे वेगळे केले जाते.चिया बियाणे लागवडीच्या माध्यमातून एका एकरातून सरासरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन घेता येते.
विक्री आणि आर्थिक नफा
बियाण्याची किंमत सध्या एक हजार रुपये आहे अशा प्रसंगी एकरात सहा लाख रुपयांची कमाई शेतकऱ्यांना करतायेते. चिया बियाणे विकायला बाजारात जाण्याची गरज नसल्याचे अनेक शेतकरी सांगतात.कारण लागवड केल्यानंतर याची माहिती शेतकऱ्यांनी कंपन्यांना दिली तर त्यांचे एजंट शेतातून खरेदी करतात.याची खरेदी वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या दराने करतात.
Share your comments