कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून सोयाबीन कडे पाहिले जाते. या पिकाच्या लागवड क्षेत्रात प्रतिवर्षी झपाट्याने वाढ होत असून एकूण देशातील सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळपास 35 टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. सोयाबीनचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. सोयाबीन मध्ये 18 ते 20 टक्के तेलाचे आणि 38 ते 40 टक्के प्रथिनांचे प्रमाण असते. जनावरांसाठी आणि पोल्ट्री उद्योगात देखील सोयाबीन पेंड एक पौष्टिक आहार म्हणून वापरला जातो.
सोयाबीन हे पीक आंतरपीक, पीक फेरपालटीमध्ये अतिशय महत्त्वाचे पीक असून सोयाबीनच्या भरघोस उत्पादनासाठी त्याचे लागवड तंत्रज्ञान तसेच शिफारसीनुसार तण आणि किडींचा बंदोबस्त करणे देखील गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण सोयाबीन वर येणाऱ्या पिवळा मोझॅक या रोगाविषयी जाणून घेऊ.
सोयाबीन वरील 'पिवळा मोझॅक'
हा एक विषाणूजन्य रोग असून 'मूगविन येलो मोजेक' या विषाणूमुळे या रोगाचा प्रसार होतो. हा रोग खूपच गंभीर असून या रोगाचे वहन प्रामुख्याने पांढरी माशीच्या माध्यमातून होते.
या रोगाची सोयाबीन वरील लक्षणे
1- या रोगाचा जेव्हा सोयाबीनच्या झाडावर परिणाम होतो तेव्हा प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या पानांचा काही भाग हा हिरवट तर काही भाग पिवळसर दिसायला लागतो.
2- सोयाबीनच्या झाडाच्या शेंड्याकडील जे काही पाने असतात, ती पिवळी पडतात व त्यांचा आकार लहान होतो.
3- ज्या झाडावर या रोगाचा प्रादुर्भाव होतो त्या झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते
4- झाडाची पाने पूर्णपणे सुरकुतल्या सारखे होतात व अशा प्रादुर्भावित झाडाला फुले व शेंगा देखील खूप कमी प्रमाणात लागतात.
5- त्यामुळे सोयाबीनचे उत्पन्नात प्रचंड प्रमाणात घट येते व त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.
नक्की वाचा:Milk Fat: 'या' उपाययोजना करा आणि वाढवा दुधातील फॅट,तरच येईल घरी आर्थिक गंगा
अशा पद्धतीने करावे 'या' रोगाचे व्यवस्थापन
1- या रोगामध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टींमुळे या रोगाचा प्रसार होतो ते म्हणजे पांढरीमाशी होय. त्यामुळे मुळावरच घाव करणे उत्तम ठरते म्हणजे पांढऱ्या माशी चा बंदोबस्त करण्यासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करणे उत्तम ठरते. उदाहरणच द्यायचे झाले तर डायमिथोएट तीस टक्के प्रवाही दहा मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तरी उत्तम ठरते.
2- दुसरे महत्त्वाचे म्हणजे शेताचे निरीक्षण करणे गरजेचे असते. कारण आपल्याला निरीक्षण करत असतानाच बऱ्याच प्रकारच्या रोगांचा व किटकांचा प्रादुर्भाव लक्षात घेतो.
अशावेळी जर तुम्हाला काही रोगग्रस्त झाडे दिसली तर ती उपटून काढून नष्ट करणे फायद्याचे ठरते.
3- सोयाबीन पेरणी करताना जर सोयाबीन पिकामध्ये आंतरपिकांचा अंतर्भाव केला तर काही प्रमाणात या रोगाचे प्रमाण कमी आढलेले दिसते.
4- एक सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे या क्षेत्रात सोयाबीन लागवड केलेली आहे अशा क्षेत्रांमध्ये पिवळे चिकट सापळ्यांचा वापर केला तर नक्कीच वरदान ठरू शकते. यासाठी तुम्ही हेक्टरी 10 ते 13 याप्रमाणे सापळे लावू शकता.
Share your comments