1. कृषीपीडिया

PH म्हणजे काय , फवारणीच्या पाण्याचा सामू (pH)किती असावा..

PH हा शेतीसाठी व आपल्या दैनदिन जीवनासाठी खुप महत्वाचा आहे. कारण PH मुळे हे समजते की, रसायन हे अॅसिडीक आहे किंवा नॉन अॅसिडीक आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
फवारणीच्या पाण्याचा सामू (pH)किती असावा..

फवारणीच्या पाण्याचा सामू (pH)किती असावा..

आपल्याला अॅसिडीटी झाली होती तेव्हा आपली परिस्थिती काय झाली होती हे आपल्यालाच माहिती. पण याचा अर्थ असा नव्हे की, नॉन अॅसिड चांगले आहे. कारण सजीवांच्या जीवनासाठी ठराविक स्तरापर्यंत अॅसिड हि महत्वाचे आहे. म्हणजेच आपल्याला हे समजले पाहिजे की, अॅसिड व नॉन अॅसिड कसे ओळखायचे व हे मोजायचे मापक म्हणजे PH

      

 PH =

Potential of Hydrogen,

 ( संभाव्य हायड्रोजन.....)

हायड्रोजन :-

 हे रसायन शास्त्रामध्ये Positive व Negative चार्ज मोजण्यासाठी वापरतात.

 PH ची व्याख्या अशी करता येऊ शकते की, “ PH हे नंबरांचे प्रमाण आहे. ते दाखवते द्रव्याचे अॅसिड व नॉन अॅसिड गुणधर्म " हे नंबर 1 ते 14 मध्ये मोजले जातात. जर नंबर 7 पेक्षा कमी आले. तर ते द्रव्य अॅसिड मानले जाते. व जर ते नंबर 7 पेक्षा जास्त आहे तर ते नॉन अॅसिड मानले जाते. व 7 ही संख्या तटस्थ मानली जाते.

            

नैसर्गिक पाण्याचा PH :- 7असतो. व तो तटस्थ मानला जातो. म्हणजेच अॅसिड पण नाही आणि नॉन अॅसिड पण नाही. PH जसे शेतीसाठी महत्वाचे आहे तसेच औषधशास्त्र, खाद्यशास्त्र, शरीरशास्त्र, पर्यावरण शास्त्र, बांधकाम शास्त्र या सर्वासाठी महत्वाचे आहे.

 

संख्यावरून साधारण पणे खालील प्रकार पडतात.

 

3.5 :- जहार अॅसिड.

3.5 - 4.4 :- अत्यंत अॅसिडिक.

4.5 - 5.0 :- अतिशय जोरदार अॅसिड.

5.1 - 5.5 :- जोरदार अॅसिड.

5.6 - 6.0 :- माफक अॅसिड.

6.1 ते 6.5 :- किंचित अॅसिड.

6.6 - 7.3 :- तटस्थ (नैसर्गिक).

7.4 - 7.8 :- किंचित नॉन अॅसिड.

7.9 ते 8.4 :- माफक नॉन अॅसिड.

8.5 - 9.0 :- जोरदार नॉन अॅसिड.

9 :- अतिशय जोरदार नॉनअॅसिड.

PH खूप महत्वाचा विषय आहे.

            फवारणीसाठी पाण्याचा सामू (ph) जास्त महत्वाचं असतो टीडीएस नाही.कोणतेही औषध मारताना जवळपास 1% औषध व 99% पाणी च आपण फवारणी करतो अशा वेळी पाणी जर योग्य गुणवत्तेचे नसेल तर फवारणीचा फारसा फायदा नाही.

 

लेखक - विनोद भोयर , मालेगाव

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

English Summary: what is ph and spraying water requird how ph Published on: 20 September 2021, 08:27 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters