1. कृषीपीडिया

लोकप्रिय पालेभाजी असलेली पालक भाजीचे वाण अन् खत व्यवस्थापन

पालक ही अतिशय लोकप्रिय पालेभाजी असून या भाजीपाल्याची लागवड वर्षभर करता येते. या भाजीला सतत मागणी असते. पालकातील पोषकमूल्ये लक्षात घेता पालकाची लागवड मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. पालकामध्ये पचनशक्ती मोठ्या प्रमाणात आहे. पालक हे कमी दिवसात तयार होणारे हिवाळी पीक आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
पालक भाजीचे वाण अन् खत व्यवस्थापन

पालक भाजीचे वाण अन् खत व्यवस्थापन

पालक ही अतिशय लोकप्रिय पालेभाजी असून या भाजीपाल्याची लागवड वर्षभर करता येते. या भाजीला सतत मागणी असते. पालकातील पोषकमूल्ये लक्षात घेता पालकाची लागवड मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. पालकामध्ये पचनशक्ती मोठ्या प्रमाणात आहे. पालक हे कमी दिवसात तयार होणारे हिवाळी पीक आहे. महाराष्ट्रात कडक उन्हाचे दोन-तीन महिने वगळून याची वर्षभर लागवड करता येते.

थंड हवामानात पालकाचा दर्जा चांगला राहतो आणि उत्पादनही भरघोस येते. तापमान वाढल्यास पीक लवकर फुलोर्‍यावर येते आणि पालकाचा दर्जाही खालावतो. पालकाचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते. खारवट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते. ज्या खारवट जमिनीत इतर पिके घेता येत नाहीत तेथे पालकाचे पीक हमखास येते.पालक ऑल ग्रीन, पुसा ज्योती, पुसा हरित या पालकाच्या भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित केलेल्या सुधारित जाती आहेत. महाराष्ट्रातील हवामानात पालकाची लागवड जवळजवळ वर्षभर करता येते. खरीप हंगामातील लागवड जुन-जुलैमध्ये आणि रब्बी हंगामातील लागवड सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने हप्त्याहप्त्याने बियांची पेरणी करावी.

उन्नत जाती :

पालकाच्या अनेक स्थानिक जाती असून त्यांचा वापर निरनिराळ्या भागात करतात. पालकाच्या काही सुधारीत जाती पुढीलप्रमाणे आहेत.

(1) ऑलग्रीन :

पालकाची ही जात भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली येेथे विकसित करण्यात आली आहे. ह्या जातीची पाने सारख्या आकाराची, कोवळी आणि हिरवी असतात. ह्या जातीची उत्पादन हेक्टरी 12.5 टन इतके येते. आणि हिवाळी हंगामातील लागवडीत 15 ते 18 दिवसांच्या अंतराने 3-7 वेळा पानांची कापणी करता येते.

(2) पुसा ज्योती :

पालकाची ही नवीन जात निवड पद्धतीने भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आली आहे. ह्या जातीची पाने मोठी, जाड, लुसलुशीत, कोवळी, ज्योतीच्या आकाराची असून त्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम, लोह आणि क जीवनसत्वाचे प्रमाण ऑलग्रीन ह्या जातीपे़क्षा जास्त असते. ही जात लवकर फुलावर येत नाही आणि हिवाळ्यात 8-10 कापण्या मिळतात. महाराष्ट्रात ही जात चांगल्या प्रकारे येते या जातीचे उत्पादन हेक्टरी 15 टनांपर्यत मिळते.

(3) पुसा हरित :

ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आली आहे. ही जात जोमदार उभट वाढते. ह्या जातीची पाने हिरवी, लुसलुसीत, जाड आणि भरपूर मोठ्या प्रमाणात येतात. या जातीच्या पानांच्या 3-4 कापण्या मिळतात आणि ही जात लवकर फुलावर येत नाही. या जातीची लागवड सप्टेंबर पासून फेब्रुवारीपर्यंत करता येते. या जातीचे उत्पादन हेक्टरी 10 टनापर्यंत मिळते.

 

खते आणि पाणी व्यवस्थापन :

पालक हे कमी कालावधीचे पीक असते. तरी हिरव्या टवटवीत पानांवर पिकाचे उत्पादन व प्रत अवलंबून असल्यामुळे पालकाच्या पिकाला नत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. तसेच पिकाला पाण्याचा नियमित पुरवठा करून जमिनीत ओलावा राखणे आवश्यक आहे.

पालकाच्या पिकाला जमिनीच्या मगदुरानुसार हेक्टरी 10 गाड्या शेणखत, 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. शेणखत पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश 1/ नत्र पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र 2 समान भागात विभागून पहिल्या आणि दुसर्‍या कापणीच्या वेळी द्यावे. ज्या जातीमध्ये दोनपेक्षा जास्त कापण्या करता येतात तेथे प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी 20 किलो नत्र द्यावे.

हेही वाचा : भरघोस उत्पादनासाठी अशा प्रकारे करा टोमॅटोची लागवड; जाणून घ्या वाणांपासून सिंचनापर्यंतची माहिती

पानांतील हिरवेपणा अधिक चांगल्या येऊन उत्पादन वाढविण्यासाठी बी उगवून आल्यानंतर 15 दिवसांनी आणि प्रत्येक कापणीनंतर 1.5% युरिया फवारावा. बियांच्या पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे किंवा वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. त्यामुळे बियांची उगवण चांगली होते. त्यानंतर पिकाला नियमित पाणी द्यावे. हिवाळ्यात पालकाच्या पिकाला 10-12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. काढणीच्या 2-3 दिवस आधी पिकाला पाणी द्यावे त्यामुळे पाने टवटवीत राहून पिकाचा दर्जा सुधारतो.

महत्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण :

पालकावर मावा, पाने कुरतडणारी अळी आणि भुंगेरे ह्यांचा उपद्रव होतो. ह्या किडीच्या नियत्रंणासाठी पीक लहान असतानाच 8-0 दिवसाच्या अंतराने 15 मिली. मॅलॅथिऑन (50% प्रवाही) 10 लिटर पाण्यात मिसळून फवरावे. काढणीच्या 8-10 दिवस अधी फवारणी करू नये.

पालकावर मर रोग, पानांवरील ठिपके, तांबोरा आणि केवडा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. मर रोगामुळे उगवण झाल्यावर रोपांची मर होण्यास सुरूवात होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्याचा योग्य निचरा करावा आणि पेरणीपूर्वी बियाण्यावर थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. हवेतील आर्द्रता वाढल्यास पानांवर गोल करड्या रंगाचे बांगडीच्या आकाराचे डाग पडतात. या बुरशीजन्य रोगामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशकाची उदा. ब्लॅयटॉक्स किंवा कॉपरऑक्झिक्लोराईड 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फावरणी करावी.

केवडा आणि तांबोरा रोगांचा फारसा उपद्रव होत नाही आणि शेतातील ओलावा नियंत्रित ठेवल्यास ह्या रोगाना आळा बसतो. तसेच गंधकयुक्त वेन्टासूल, सल्फेेक्स इत्यादी आणि ताम्रयुक्त ब्लायटॉक्स या बुरशीनाशकांची फवारणी केल्यास या रोगांचे नियंत्रण होते.

English Summary: Varieties of spinach with popular leafy vegetables Published on: 30 October 2021, 12:22 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters