महाराष्ट्र मध्ये बरेच शेतकरी भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात करतात.विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड शेतकरी करत असतात. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा मिरची लागवडीकडे मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
कारण मिरची दैनंदिन वापरला जाणारा एक पदार्थ असून स्वयंपाक घरात मिरची ही लागतेच लागते. तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनाने देखील मिरची समृद्ध असून त्यामध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन ए, विटामिन सी, फॉस्फरस, कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात आढळते.
त्यामुळे मिरची हा आहारातील एक प्रमुख भाग आहेच, परंतु मिरचीचा वापर हा मसाल्यांसाठी देखील मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने बाजारपेठेत मिरचीला कायमच मागणी असते. म्हणून योग्य व्यवस्थापन करून मिरची लागवड केली तर कमीत कमी करता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. त्याबद्दल आपण या लेखात माहिती घेऊ.
मिरची लागवडीसाठी पोषक गोष्टी
1- हवामान- जर उष्ण व दमट हवामान असेल तर मिरचीसाठी ते खूप फायदेशीर असते. जर मिरची लागवडीसाठी लागणाऱ्या तापमानाचा विचार केला तर ते 15 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान असणे गरजेचे असते. तर मिरची ही वनस्पती 100 सेंटीमीटर पाऊस असलेल्या भागात वाढू शकतो.
2- मिरचीसाठी लागणारी माती- मिरचीसाठी सुपीक, कसदार आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आवश्यक असते.ज्या मातीचा पीएच साडेसहा ते साडेसात असणे आवश्यक आहे. अशी मातीत मिरची लागवड केल्याने फायदा होतो.
3- मिरचीचा लागवड कालावधी-मिरचीची लागवड उन्हाळी व पावसाळी या दोन्ही हंगामात केली जाऊ शकते. उन्हाळी मिरची साठी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान लागवड करावी आणि पावसाळी मिरचीसाठी मे ते जूनमध्ये लागवड करावी.
4- जमिनीची मशागत आणि लागवड- लागवडीसाठी जमीन तयार करताना ती खोल नांगरून घ्यावी व त्यामध्ये शेणखत किंवा कुजलेले जैविक खत दहा ते बारा टन प्रती एकर टाकून जमीन समतल करून घ्यावी.
5- सुधारित वाणांची निवड- उत्पादनवाढीसाठी संकरित सुधारित वाणांची निवड केल्यास उत्पादन अधिक मिळते. ज्या त्या प्रदेशानुसार मिरचीच्या वानांची निवड केलेली जास्तीत जास्त फायद्याचे ठरते.
नक्की वाचा:Health Tips:जिरे, धने आणि बडीशेपचे पाणी आहे अमृतासमान, शरीराला होतात भरपूर फायदे
6- पाणी व खत नियोजन- मिरची पिकाला जमिनीच्या गुणवत्तेनुसार व फुले व फळे येण्याच्या कालावधीत पाणी देणे गरजेचे असते या वेळी पाण्याचे नियोजन जर चुकले तर फुले व फळगळ होते. त्यामुळे उत्पादनात घट येण्याचा संभव असतो.
7- रोग व्यवस्थापन- रोग व्यवस्थापनासाठी मिरची लागवड करताना बियाण्याला योग्य ती बीजप्रक्रिया करून घ्यावी. त्यामुळे निरोगी रोपांची निर्मिती होते. लागवड केल्यानंतर काही रोगग्रस्त झाडे दिसली तर शेतातुन उपटून टाकावी.
मिरची पिकामध्ये किट थ्रिप्स, वाईट फ्लाय आणि माईट हे प्रमुख योग आहेत. त्यांच्या नियंत्रणासाठी डायथेन एम-45 किंव्हा मेटासीस्टॉक एक लिटर 700 ते 800 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
8- लागवड खर्च आणि उत्पादन- हिरव्या मिरचीचे एकरी सरासरी 35 ते 40 हजार रुपये खर्च येतो तर एकरी उत्पादन 60 क्विंटलपर्यंत अपेक्षित असते.
जेव्हा उत्पादन हातात येईल तेव्हा बाजारपेठेत मिरचीला चाळीस रुपये किलोचा दर जर बाजारात मिळाला तर एकरी शेतकऱ्यांना 40 ते 50 हजार रुपये पर्यंतचा नफा मिळू शकतो.
Share your comments