1. कृषीपीडिया

अन्नद्रव्यांचे प्रकार व त्यांचे महत्त्व

पिकांच्या वाढीसाठी जसे मुख्य अन्नद्रव्यांची गरज असते त्याप्रमाणे दुय्यम अन्नद्रव्ये ही तितकेच महत्वाचे असतात. मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा समावेश होता तर दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये लोह, मॅग्नीज, बोरान,झिंक इत्यादीचा समावेश होतो. पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्‍यक अन्नद्रव्ये जाणून घेऊन त्यांचा समतोल पुरवठा केल्यास पिकांच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ होऊ शकते. त्यासाठी त्याच्या कमतरतेची लक्षणे जाणून घेऊन व्यवस्थित उपायोजना करावी पिकांच्या रासायनिक विश्लेषण केले असता पिकांमध्ये सुमारे 90 मूलद्रव्य आढळतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
अन्नद्रव्यांचे प्रकार

अन्नद्रव्यांचे प्रकार

  पिकांच्या वाढीसाठी जसे मुख्य अन्नद्रव्यांची गरज असते त्याप्रमाणे दुय्यम अन्नद्रव्ये ही तितकेच महत्वाचे असतात. मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा समावेश होता तर दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये लोह, मॅग्नीज, बोरान,झिंक इत्यादीचा समावेश होतो.

 पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्‍यक अन्नद्रव्ये जाणून घेऊन त्यांचा समतोल पुरवठा केल्यास पिकांच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ होऊ शकते.  त्यासाठी त्याच्या कमतरतेची लक्षणे जाणून घेऊन व्यवस्थित उपायोजना करावी पिकांच्या रासायनिक विश्लेषण केले असता पिकांमध्ये सुमारे 90 मूलद्रव्य आढळतात. मात्र ती सर्वच पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असतात असे नाही. अण्ण द्रव्यांची कमतरता पिकांवर असते त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होतो, अशी सतरा प्रकारचे मूलद्रव्ये ही महत्त्वाचे मानले जातात. त्यातील मोठ्या प्रमाणात लागणारी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही अन्नद्रव्ये पिकांना हवा व पाण्यातून मिळतात. उर्वरित 14 अन्नद्रव्ये जमिनीतून मिळत असतात. जमिनीचा सामू हा सात  च्या  दरम्यान असला पाहिजे. अशा स्थितीत रासायनिक आणि जैविक क्रिया चांगल्या होऊन अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

 पीक वाढीसाठी आवश्यक मूलद्रव्ये ठरवण्याकरता महत्त्वाचे तीन बाबी

  • मूलद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांची शाकीय वाढ आणि उत्पादन वाढ पूर्णपणे होत नाही.
  • प्रत्येक मूलद्रव्यांची कमतरतेची लक्षणे ही विशिष्ट प्रकारची असतात.
  • मूलद्रव्यांच्या पिकाच्या वाडीमध्ये  घटक अन्नद्रव्य म्हणून प्रत्यक्षपणे सहभाग असला पाहिजे.

 

पिकांच्या वाढीसाठी लागणारे अन्नद्रव्य आणि त्यांचे स्त्रोत

  • हवा आणि पाणी या मधून पुरवठा होणाऱ्या अन्नद्रव्य – कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा पुरवठा हवा आणि पाण्यामधून होतो.
  • जमीन आणि खतांमधून पुरवठा होणाऱ्या अन्नद्रव्य – मुख्य अन्नद्रव्य = नत्र, स्फुरद आणि पालाश हे मुख्य अन्नद्रव्य आहेत.
  • दुय्यम अन्नद्रव्य – कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक त्यांना दुय्यम अन्नद्रव्य म्हणतात.
  • सूक्ष्म अन्नद्रव्य – लोह, मॅगेनीज, जस्त, तांबे, बोरॉन एखादी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत.

 

अ – मुख्य अन्नद्रव्य

 मुख्य अन्नद्रव्य मध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा समावेश होतो. हे अन्नद्रव्य पिकांना कडून मोठ्या प्रमाणात शोषले जात असल्याने त्यांना मुख्य अन्नद्रव्य म्हटले जाते. यापैकी ऑक्सिजन, हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड हे अन्न  द्रव्य पिकांना अधिक प्रमाणात लागतात. परंतु त्यांचा पुरवठा हा जमिनीतील पाणी आणि हवा याद्वारे सहजपणे होतो. वनस्पती मधील जैविक क्रियांमध्ये या तीन मूलभूत अन्नद्रव्यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. पिकांच्या एकूण वजन पैकी जवळजवळ 94 टक्‍क्‍यांहून जास्त भाग यातील अन्नद्रव्यांची व्यापलेला आहे. याव्यतिरिक्त नत्र आणि पालाश सारख्या अन्नद्रव्ये पिकांना मोठ्या प्रमाणात लागतात. जमिनीतील ओलावा यामध्ये विद्राव्य व मातीच्या कणांवर अधिशोषित असणाऱ्या या अन्नद्रव्यांचा वापर पिकांच्या मुळांद्वारे केला जातो. जमिनीमधून या अन्नद्रव्यांचा होणारा पुरवठा साधारणपणे मध्यम ते कमी प्रमाणात असतो.

 

ब – दुय्यम अन्नद्रव्य

 कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक या तीन अन्नद्रव्यांचा वनस्पतींचे दुय्यम अन्नद्रव्ये असे म्हणतात. यांची गरज मध्यम प्रमाणात असते. तेलबिया पिकांखालील जमिनीमध्ये गंधकाची कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

क – सूक्ष्म अन्नद्रव्य

 सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम, क्लोरीन इत्यादी अन्नद्रव्यांचा समावेश होता. सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना कमी प्रमाणात लागतात. सुपीक जमिनीमध्ये ही जमिनीतून नैसर्गिक  रित्या पुरेशा प्रमाणात मिळत असली काही स्थितीमध्ये कमतरता दिसून आल्यास या अन्नद्रव्यांचा पुरवठा सेंद्रिय किंवा रासायनिक खतांद्वारे करावा लागतो

 

English Summary: Types of food and their importance Published on: 30 May 2021, 07:06 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters