देशात सर्वत्र मसाला पिकांची लागवड केली जाते, महाराष्ट्रात देखील मसाला पीक मोठ्या प्रमाणात लावले जातात. रात की विशेषता कोकणात मसाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड बघायला मिळते. हळद देखील एक प्रमुख मसाला पीक आहे. याची लागवड राज्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात बघायला मिळते. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात राज्यातील एकूण हळद उत्पादनाच्या 70 टक्के उत्पादन घेतले जाते. एवढेच नाही तर सांगली जिल्ह्यात घेतल्या जाणार्या हळद पिकाला जीआय टॅग देखील प्राप्त झाला आहे, त्यामुळे सांगली जिल्ह्याला हळद उत्पादनात एक विशिष्ट स्थान प्राप्त झाले आहे.
जर आपणास शेतीतून चांगले उत्पादन प्राप्त करायचे असेल, तर हळद लागवड एक चांगला पर्याय ठरू शकतो. आपल्या देशात सुमारे तीस प्रकारच्या हळदीच्या वाणांची लागवड केली जाते. हळद उत्पादक शेतकरी हळद पिकातून चांगले मोठे उत्पन्न अर्जित करताना दिसत आहेत, त्यामुळे आज आपण देशात घेतल्या जाणाऱ्या हळदीच्या वाणाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या विषयी सविस्तर.
देशात उगवल्या जाणाऱ्या हळदीचे प्रकार
लकाडोंग हळद- लकाडोंग हळद ही जगातील सर्वोत्तम हळदीपैकी एक मानली जाते. क्वालिटीचा विचार केला तर लकाडोंग हळदी ही जगातील सर्वात चांगल्या क्वालिटीची हळदी असल्याचे सांगितले जाते. या हळदीला मसाल्यांचा राजा म्हणून संबोधले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे या हळदीत इतर हळदीपेक्षा कर्क्यूमिनचे प्रमाण जास्त असते. ही अद्भुत हळद लकाडोंग गावातील प्राचीन टेकड्यांमध्ये जास्त आढळते म्हणुन या हळदीला लकाडोंग हळद म्हणुन ओळखले जात असावे. या हळदीला कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिकरित्या पिकवले जाते, ही याची सर्वात मोठी विशेषता आहे.
अलेप्पी हळद- अलेप्पी हळद भारतात प्रामुख्याने दक्षिण भागात सर्वाधिक पिकवली जाते. याचे क्षेत्र केरळ राज्यात सर्वाधिक बघायला मिळते, राज्याचे सौंदर्य अलेप्पी हळद अजूनच वाढवीत आहे. मसाल्या पिकात अलेप्पी हळदीला खूप महत्त्व आहे आणि त्यात सरासरी 5 टक्के कर्क्यूमिन असल्याचे सांगितलं जाते आणि त्यामुळे ही हळद कलरिंग एजंट आणि औषधी उपयोगात खूप फायदेशीर असते.
सांगलीची हळद- सांगलीच्या हळदीला जीआय टॅग प्राप्त आहे, याची लागवड ही महाराष्ट्र राज्यात सर्वदूर बघायला मिळते, विशेषता सांगली जिल्ह्यात याची लागवड लक्षणीय आहे. असे सांगितले जाते की सांगलीच्या हळदीमध्ये उत्कृष्ट औषधी गुणधर्म असतात त्यामुळे याची मागणी ही मोठ्या प्रमाणात असते, परराज्यात देखील याची मागणी असल्याचे बघायला मिळते. राज्यातील हळदीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 70% उत्पादनात या हळदीचा हिस्सा असल्याचे सांगितलं जात आहे.
Share your comments