कापूस हे भारतातील प्रमुख नगदी पीक आहे.महाराष्ट्राचा विचार केला तर कापूसविदर्भ, मराठवाडा,खानदेश चा पट्टा इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु मागील काही वर्षांपासून गुलाबी बोंड आळी मुळे कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्याच प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कापूस उत्पादनात कमालीची घट येत आहे. या लेखामध्ये आपण कापूस उत्पादन वाढीसाठी च्या काही साध्या पण आवश्यक गोष्टी पाहणार आहोत.
अशा पद्धतीने कपाशी पिकावर करा संजीवकांचा वापर
- संजीवकांचा वापर कपाशीपिकामध्ये करणे हा तिच्या लागवड अंतराशी संबंधित आहे.
- जर कपाशी ही पाच बाय एक फूट अंतरावर लावली असेल तर किंवा याच्या पेक्षा जास्त आंतर असेल तर लीहोसिन ची फवारणी कपाशी लागवड केल्यापासून 60 दिवसांनी दहा लिटर पाण्यात दोन मिली या प्रमाणात करावी.
- जेव्हा कपाशी 90 दिवसांची असतेत तेव्हाची जीए दहा पीपीएम व एक टक्का युरियाची फवारणी करावी.
- जर वर दर्शवलेल्या अंतरापेक्षा चालागवड अंतर कमी असेल तर फवारणीचा कालावधी हा दहा दिवस कमी करणे गरजेचे आहे.
- कपाशी लागवडीनंतर च्या 100 दिवसांनी पोटॅशियम हायड्रोजन अर्थोफोस्पेट 50 ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
कपाशी मधील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण कसे करावे?
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कपाशी लागवड केलेल्या क्षेत्राचे निरीक्षण करणे होय. दुपारी दररोज तीन नंतर कपाशी पिकामध्ये निरीक्षणे घ्यावीत. जर तुम्हाला झाडावर एखादे फूल पिवळे पडलेले दिसले तर ते लगेच तोडावे. अशा फुलाचे तोंड एकदम घट्ट चिकटलेले दिसते.
- यालाच आपण डोमकळी असेही म्हणतो. जर तुम्ही या पिवळ्या पडलेल्या फुलाच्या पाकळ्या वेगळ्या केल्या तर अशा फुलांमध्ये एक ते दोन गुलाबी बोंड आळी आपणास हमखास आढळून येतात
- तोडलेली ही फुले तात्काळ नष्ट करावीत.
- गुलाबी बोंड आळीच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
- जर आठ-दहा पतंग सलग तीन दिवस प्रति सापळा किंवा दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त ही बोंडे एक जिवंत वेळी प्रति दहा हिरवी बोंडे किंवापात्यामध्ये आढळल्यास आर्थिक नुकसानीची पातळी गाठली असे समजावे व खालीलपैकी कीटक नाशकाची फवारणी करावी.
कीटकनाशक प्रमाण प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे घ्यावे.
- प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली
- प्रोफेनोफोस 40% +सायपेरमेथरीन चार टक्के ईसी 20 मिली
- थायोडीकार्ब 75 डब्ल्यूयूपी 20 ग्राम
- फेनप्रोपेथरीनदहा ईसी 10 मिली
- डेल्टामेथ्रीन एक टक्का व ट्रायझोफॉस 35 टक्के इसीसोळा मिली
- इंडाक्साकार्ब 14.5 व असिटंप्रीड7.7टक्के एससी 10 मिली
महत्वाचे-कीटकनाशकाची फवारणी करताना ती सकाळी नऊच्या आधी किंवा संध्याकाळी चारनंतर करावी. वरील कीटकनाशकांचे प्रमाण हे साध्या पंपासाठी आहे. तसेच एकरी तीन ते पाच डेल्टास्टिकी ट्रॅप लावावेत.
महत्वाचे- कपाशीचे पीक साधारणतः 60 दिवसांचे झाल्यावर झाडांना 11 ते 13 फांद्या फुटलेल्या असतात अशावेळी शेंड्याकडील तीन फांद्या सोडून झाडावरील खालील फांद्यांवरील जुने मोठे पाने काढावे. ही तोडलेली पानेशेतातच पडूद्यावीत असे केल्यामुळे पीक उत्पादनात निव्वळ 20 टक्क्यांपर्यंत वाढ होते. झाडाचा खालचा भाग मोकळा होत असल्याने जुना पानांखाली लपलेल्या किड्यांपासुन व रोगांपासून संरक्षण होते.झाड मोकळे झाल्यामुळेफांदयासूर्यप्रकाशात येतात त्यामुळे बोन्डेलागण्याचे प्रमाण वाढते.( माहिती स्त्रोत-dip info news)
Share your comments