ऑक्टोंबर महिना सुरू झाला असून आता पावसालाही परतीचे वेध लागले आहेत राज्यात अजूनही काही ठिकाणी पाऊस पडत आहे बहुतांशी भागात खरीप पिके काढणीस आलेली आहेत.
शेत शिवारात वाफसा नसल्यामुळे रब्बीसाठी शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत रब्बी ज्वारी, हरभरा, जवस, करडई, गहू इत्यादी पिकांसह या हंगामात पुढील नोव्हेंबर महिन्यापर्यंत राज्यातील शेतकरी कमी-अधिक प्रमाणात लसुन पिकाची लागवड करतात. या पिकातून चार महिन्यात चांगले उत्पादन व पैसाही मिळतो काढणीनंतर वर्षभर या पिकाची चांगला भाव मिळेपर्यंत साठवण नाही करता येते म्हणून दररोज प्रत्येक घरातील स्वयंपाकाची चव वाढविणाऱ्या शिवाय औषधी गुणधर्म असणाऱ्या या पिकाची लागवड ते काढणी ची संपूर्ण माहिती आम्ही आणली आहे खास तुमच्यासाठी
1) लसुन पिकासाठी जमिनीची निवड करताना…
लसूणाचे कंद जमिनीत वाढत असल्याने पाण्याचा उत्तम निचरा होणारी भुसभुशीत कसदार जमीन या पिकासाठी निवडावी.
2) कसे हवामान लागते?
लसूण लागवड करण्यासाठी थंड हवामान लागते ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात लागवड करावी लसुन पक्व होत असताना व काढणीच्या काळात कोरडे हवामान आवश्यक आहे.
पिकाची जात - फुले नीलिमा, फुले बसवंत,गोदावरी, श्वेता, यमुना सफेद,फाऊंलाईट इत्यादी.
3) लागवडीचा कालावधी….
लसणाची लागवड सपाट वाफ्यात करावी कारण लसून जमिनीत खोल वाढतो जमीन कुजलेले शेणखत 25 ते 30 टन मिक्स करून घ्या व जमिनीच्या उतारानुसार वाफे बांधून 4×2/3×2 मीटर अंतरावर सपाट वाफे करावीत. जमिनीला जास्त उतार असेल तर 1.5 t2 मीटर रुंद 10t12 सेमी लांबीचे वाफे करून लागवड करावी सपाट वाफे ची रुंदी 15 सेमी अंतरावर त्याच्या सहाय्याने रेघा पाडून त्यात दहा सेमी अंतरावर उभ्या पाकळ्या रोवून मातीने झाकावेत. लागवडीच्या वेळी बियाणे दहा लिटर पाण्यात 20 मिली कार्बोसल्फान व पंधरा गरम कार्बनडाझिम च्या द्रावणात दोन तास बुडवून लागवड करावी.
4) खत व्यवस्थापन….
लागवडीच्या वेळी कुजलेले शेणखत 25 ते 30 टन जमिनीत मिसळावे व 100 किलो नत्र 50 किलो स्फुरद 50 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावी. नंतर उरलेली दुसरी नत्राची मात्रा दोन वेळा विभागून द्या पहिली मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी दुसरी मात्रा लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी तसेच लागवडीच्या वेळी अमोनियम सल्फेट व सिंगल सुपर फॉस्फेट या खतांचा उपयोग केल्यास गंधकाची मात्रा तयार होते.
5) पाणी व्यवस्थापन….
लसणाची लागवड केल्यानंतर लगेच पाणी द्यावे अंबावणे चार ते पाच दिवसांनी द्यावी. लसणाची मुळे 15 ते 20 या थरात असतात. त्यामुळे वरच्या थरात ओलावा असणे आवश्यक आहे या पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
6) रोगनियंत्रण….
1) किडी - फुलकिडी आणि नुकसान कारक कीड आहे सकाळी किंवा रात्रीच्या वेळी आक्रमण करते ही पानावरील रस शोषून घेते. त्यामुळे पाच पांढरी पडून वाकडी होते पाच वाकली झाल्यास लसणाचे पोषण होत नाही उपाय 10 लिटर पाण्यात स्टिकर घेऊन + कार्बोसल्फान 20 मिली + सापर मीथ्रीन 10 मिली घेऊन फवारणी करावी.
2) कीड 2 - करपा उपाय करपा हा बुरशीजन्य रोग आहे या रोगामुळे पाने पिवळी पडतात आणि पानावर चट्टे वाढतात पाणी सुकतात उपाय 25 ते 30 मिली डायथेन m45 आणि कार्बेन्डाझिम 20 मिली गरम स्टिकर 15 मिली घेऊन फवारणी करावी.
3) कीड 3 - कंदकूज उपाय ही बुरशी लसणामध्ये वाढते. ही बुरशी आत शिरल्याने पाकळ्या मऊ होतात व काळ्या रंगाचा थर जमा होतो उपाय निरोगी बियाणे वापरावे लागवडीच्यावेळी वापरत भरपूर पाणी द्यावे.
7) किती हेक्टरी उत्पादन मिळते?...
लसणाची पिक 120 ते 130 दिवसांत काढणीस तयार होते. याची वाढ झाली की पानांची वाढ थांबते पाने पिवळी पडतात.पाने वाळवून यापूर्वी काढणी करावी जेणेकरून पेंडी बांधणे सोपे जाईल. लसुन खुरप्याने किंवा कुदळीच्या सहाय्याने काढणे करावे लसुन दोन दिवस येतात. तसाच ठेवावा का तिने योग्य झाकावा. त्यानंतर जुन्या बांधणी करावी व झाडाखाली किंवा घरात वर बांधणी करावी हेक्टरी उत्पन्न 10 ते 15 टन मिळते.
8) तणनाशक जमते का?
लसन लागवडीपूर्वी कोरड्या जमीन असताना तयार वाफ्यावर पेंढा मेथिलीन या तणनाशकाची प्रतिपंप 80 मिली याप्रमाणे फवारणी करावी. यानंतर लसणाच्या पाकळ्यांची लागवड केली असता, तणाचा बंदोबस्त करता येतो.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:खरं काय! भाड्याची जमीन घेऊन तुम्हीही खोलू शकता पेट्रोलपंप; वाचा या भन्नाट बिजनेसविषयी
नक्की वाचा:Small Business Idea : फक्त 3 हजारात सुरु करा हा व्यवसाय आणि कमवा बक्कळ नफा; वाचा याविषयी
Share your comments