आता पावसाळा काही दिवसांनी संपेल आणि हिवाळा ऋतू सुरू होईल व त्यासोबतच रब्बी हंगामाची तयारी देखील मोठ्या प्रमाणावर सुरू होऊन हंगामात विविध प्रकारचे पिकांची लागवड शेतकरी बंधू करतात. परंतु आपल्याला माहीत आहे की, वेगवेगळ्या ऋतूंचा पिकांवर देखील त्या हंगामानुसार सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो.
त्यामुळे आपल्याला देखील हंगामानुसार त्यासंबंधीच्या उपायोजना पिकांसाठी करायला लागतात. एकंदरीत वातावरण व त्या परिस्थितीनुसार पिकांवर जे काही रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव होतो त्याचे नियोजन करणे देखील महत्त्वाचे असते. या लेखामध्ये आपण हिवाळा ऋतूत पिकांची काळजी घेण्यासाठी काही छोट्याशा परंतु महत्वपूर्ण गोष्टी कोणत्या त्याबद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:रब्बी साठी मका पिकाचे हे नवीन वाण, बाजारातील सर्वोत्तम वान
पिकांची काळजी घेण्यासाठी खास टिप्स
थंडीमुळे पिकांवर होणारे दुष्परिणाम
1- जेव्हा थंडीचे प्रमाण वाढते तेव्हा पिकांच्या पानांचा आकार कमी होतो व रंग निळसर व्हायला लागतो व झाड कोमेजल्या सारखे दिसते.
2- अति थंडीमुळे झाडांची जी काही श्वासोच्छ्वास क्रिया असते ती मंदावते.
3- या सगळ्या परिस्थितीमुळे झाडांच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊन ती देखील मंदावते.
4- पिकांमधील पेशी गोठतात व त्यामुळे एकंदरीत सगळ्या भौतिक प्रक्रियेत बदल होतो.
अशा पद्धतीने करू शकता उपायोजना
1- दिवसा किंवा प्रामुख्याने रात्री कमी तापमानाची नोंद असते त्यावेळेस तुमच्या पिकाच्या प्लॉटला पाणी देणे खूप गरजेचे आहे. यामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. या कालावधीत पिकांना लोट( पाट) पाणी दिल्यास फायदा होतो.
2- थंडीच्या काळात हवेतील आद्रतेचा विपरीत परिणाम पिकावर होतो. यासाठी पिकांवर पाण्याचा फवारा घेणे खूप गरजेचे असते. कारण यामुळे पिकाच्या पानांवरती पाण्याचा फवारा मारल्यावर प्लॉटमधील आर्द्रतेमुळे वातावरणातील तापमानापेक्षा किमान दोन अंश सेंटिग्रेडने प्लॉटमधील तापमान वाढते.
नक्की वाचा:दुसऱ्याच्या शेड्युलच्या नादात शेतकरी होतात बरबाद, राहत नाही कोणतेही पिकांसाठी नियोजन
3- एमिनो एसिडयुक्त औषधांचे बोरॉनमध्ये मिसळून फवारणी घेणे फायद्याचे ठरते व यासोबत ड्रीपच्या माध्यमातून नत्रयुक्त खतांचा पुरवठा पिकांना करणे खूप गरजेचे असते. असे केल्याने पिकांची चयापचय क्रिया वाढण्यास मदत होते.
4- पिकाची परिस्थिती पाहून कॅल्शियम नायट्रेटचा ड्रिप मधून डोस देणे खूप महत्त्वाचे ठरते.यामुळे पेशी विभाजन होण्यास मदत होते.
5- एवढेच नाही तर सल्फरचा वापर स्प्रे मधून अथवा ड्रीपच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे. यामुळे पिकाच्या मुळ्या गरम राहतात क्रियाशील राहतात.
6- जर तुम्हाला शक्य असेल तर फळबागेमध्ये ठिकठिकाणी शेकोट्या करणे व तापमान संतुलित ठेवणे गरजेचे असते.
Share your comments