भुईमूग हे तेलबिया वर्गातील पीक असून संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर भुईमुगाची लागवड केली जाते. जर आपण जागतिक भुईमूग उत्पादनाचा विचार केला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जर आपण आहाराच्या दृष्टिकोनातून विचार केला तर स्निग्ध पदार्थ व प्रथिनांचा स्वस्त पुरवठा करण्याचे माध्यम म्हणजे भुईमूग होय. महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नासिक, सातारा आणि कोल्हापुरी इत्यादी ठिकाणी भुईमुगाचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
प्रामुख्याने हे उष्ण आणि कोरडे हवामानात येणारे पीक असून 18 ते 30°c तापमानात हे पीक चांगले येते. उन्हाळी हंगामामध्ये दहा ते बारा तास भरपूर आणि स्वच्छ सूर्यप्रकाश या पिकासाठी खूप महत्त्वपूर्ण असतो. भरपूर सूर्यप्रकाशामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव फार कमी असतो.
जर व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भुईमुगाचे उत्पादन वाढवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. तसेच मुख्य अन्नद्रव्यासोबतच काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील तितकीच गरज असते. या लेखामध्ये भुईमूग पिकासाठी आवश्यक असणारे सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती घेणार आहोत.
उन्हाळी भुईमुगासाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य
1- लोह म्हणजेच आयर्न- लोह भुईमुगासाठी खूप महत्त्वपूर्ण असून जमिनीमध्ये जर लोहाची कमतरता असेल तर भुईमुगाची वाढ खुंटते, त्यासोबतच पाने पिवळी व त्यानंतर पांढरे पडतात. यासाठी एकरी एक किलोग्रॅम फेरस सल्फेट, 400 ग्राम चुना आणि एक किलो युरिया 200 लिटर पाण्यात विरघळून पिकावर फवारणी करणे गरजेचे आहे.
2- जस्त म्हणजेच झिंक- जर जमिनीमध्ये जस्ताची कमतरता असेल तर झाडाची पाने लहान राहतात व पानाच्या शिरा मधील भाग पिवळसर होतो व पाने वाळल्यासारखे दिसतात. जर जमिनीमध्ये जस्ताची कमतरता असेल तर चार किलो प्रति एकरी झिंक सल्फेट करण्याच्या वेळेस जमिनीत मिसळून द्यावे किंवा उभ्या पिकांमध्ये कमतरता दिसत असल्यास एक किलो जिंक सल्फेट दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो पपई लागवडीसाठी ऑक्टोबर महिना सर्वोत्तम; कमवू शकता लाखों रुपयांमध्ये उत्पन्न
3- बोरॉन- समजा तुम्हाला जर हलक्या व मध्यम जमिनीमध्ये भुईमूग लागवड करायची असेल तर बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. याच्या वापरामुळे दहा ते पंधरा टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पेरणीनंतर 30 ते 50 दिवसांनी 100 ग्रॅम बोरीक आम्ल 200 लिटर पाण्यात विरघळून फवारले असता उत्पादनात वाढ होते. समजा एकरी दोन किलो बोरॅक्स पेरणीपूर्वी जमिनीत मिसळल्यास बोरॉनची कमतरता राहत नाही.
4- कॅल्शियम व गंधक म्हणजे सल्फर - कॅल्शियमचे प्रमाण जर 40 ग्रॅम/100 ग्राम पेक्षा कमी असेल तर अशा जमिनीत भुईमूग पिकासाठी प्रति एकर 200 kg जिप्सम पेरणीच्या वेळी आणि पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी दोन हप्त्यात झाडालगत पाच सेंटीमीटर अंतरावर आर्यांची वाढ होते
त्या भागात जमिनीत पेरून दिल्यास उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होऊ शकते. जिप्सम दिल्याने त्यामधून 24% कॅल्शियम आणि 18% पेक्षा अधिक गंधक मिळते. शेंगा चांगल्या पोसण्यासाठी याची मदत होते.
Share your comments