महाराष्ट्रामध्ये कापूस लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. जर आपण आत्ताचा कालावधीचा विचार केला तर साधारणतः सात जून ची लागवड पकडली तरी सव्वा ते दीड महिन्याचे कपाशीचे पीक झाले आहे. या कालावधीमध्ये कापूस पिकावर सगळ्यात जास्त प्रादुर्भाव होत असेल तर तो तुडतुडे, पांढरी माशी आणि मावा इत्यादी रसशोषक किडींचा.
यामध्ये शेतकरी बांधव सर्रासपणे फवारणीची तयारी करतात व फवारणी करतात. परंतु असे न करता संबंधित कीटकांची नुकसान पातळी पाहून साधारणतः 50 ते 60 दिवस फवारणी टाळली पाहिजे. कारण असे केल्याने कापूस पिकामध्ये मित्र कीड यांची चांगल्या प्रमाणात वाढ होते.
याबाबतीत उदाहरणच घ्यायचे झाले तर, लेडी लिटिल बर्ड सारख्या मित्र किडींची मोठ्या प्रमाणात वाढ होते तसेच क्रायसोपा गांधील माशी, शिर फीड माशी इत्यादी मित्र किडे सुद्धा तुडतुडे बोंड आळी च्या लहान अवस्था वर आपली उपजीविका करतात.
त्यामुळे बऱ्याचदा कापूस पिकाचे नैसर्गिकरित्या कीटकांपासून संरक्षण होते. जास्त आवश्यकता असेल तर पाच टक्के निंबोळी अर्क व 0.5 टक्के तंबाकू अर्काची फवारणी करावी.
नक्की वाचा:हळद पिकासंदर्भात लागवड पश्चात सद्यस्थितीत अंगीकार करावयाच्या काही महत्त्वाच्या बाबी.
रासायनिक प्रतिबंधात्मक उपाय
1- बरेच शेतकरी इमिडाक्लोप्रीड हे कीटकनाशक मोठ्या प्रमाणात वापरतात. यासाठी 1- इमिडाक्लोप्रिड ( साधे ), इमिडाक्लोप्रिड ( सुपर) आणि इमिडाक्लोप्रिड( दाणेदार ) एकच कीटकनाशक तीन प्रकारांमध्ये मिळते व रसशोषक किडींसाठी शेतकरी बांधव नियमित मोठ्या प्रमाणात वापर करतात.
परंतु याच्या नियमित वापरामुळे रसशोषक कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते यामुळे नियंत्रण करणे कठीण जाते. त्यामुळे परत परत इमिडाक्लोप्रिडचा फवारणी करणे टाळावे.
2- पिवळे किंवा निळे चिकट सापळे शेतात लावावेत. ती आकाराचे बांबू पक्षी तांबे शेतात लावावे. आवश्यकता असेल तरच रासायनिक कीटकनाशके वापरावे. परंतु यासाठी काळजी अशी घ्यावी की एकच रासायनिक कीटकनाशक हे परत परत वापरू नये.
वेगवेगळ्या किटकनाशकांची आलटून पालटून वापर केला तर कीटकांमध्ये खासकरून रसशोषक कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही त्यामुळे त्यांचे नियंत्रण करणे सोपे जाते.
नक्की वाचा:संत्रा मोसंबी पिकांवर 'फायटोप्थोरा' व 'कोलेटोट्रीकम' बुरशीचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन
नियोनिकोटिन गटातील कीटकनाशके
इमिडाक्लोप्रिड, एसीटामाप्राईड, क्लोथीयानीडीन ही किटकनाशके प्रत्येक फवारणीत वापरल्यामुळे किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते. यामुळे त्यांचे पुढे नियंत्रण करणे कठीण जाते. त्यासाठी रासायनिक कीटकनाशके वापरायची असेल तर बुप्रोफेझिन( 25 एससी)
20 मिली, फिप्रोनील (5 एससी) 30 मिली, असिफेट 75 एसपी दहा ग्रॅम तर यापैकी एक कीटकनाशक पाच टक्के निंबोळी अर्क बरोबर वापरावे. हे प्रमाण जवळजवळ 15 लिटर पंपासाठी वापरावे. या प्रकारे कमी खर्चात एकात्मिक कीड नियंत्रण दीर्घकालीन होते.
Share your comments